Posts

Showing posts from May, 2021

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

Image
राहुरी पोलिसात छेडछाड केल्याचा 21 जणांवर गुन्हा दाखल.. राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा तु आमच्या घराकडे सारखा चकरा का मारतो व आमच्या मुलीला का त्रास देतो ?असे जाब विचारणारया संजय गरड यांना तब्बल 21 जणांनी गैर कायद्याची मंडळी जमावुन लाकडी दांडक्याने  मारहाण केली तसेच एका महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना राहुरी तालुक्यात केंदळ खुर्द परिसरात घडली आहे. या बाबत राहुरी पोलिस ठाणेत संजय ज्ञानदेव गरड राहणार केदळ खुर्द वय वर्ष 40 यांनी  आरोपी.1)दिपक गोविंद जाधव 2)किरण बाळा जाधव, 3)कृष्णा बाळा जाधव 4)अमोल गोविद जाधव, 5)बाळु अंकुश बर्डे,6) श्रीकांत बाळु बर्डे 7)अदित्य बाळु बर्डे ,8)मयुर पडोळे 9)संतोश रोहिदास तुपसुंदर10) नवनाथ जाधव11) दिगंबर ज्ञानदेव तारडे 12)अक्षय कचरु जाधव 13 अंदुबंर नामदेव तारडे 14) दिगंबर प्रभाकर भुसे 15) सोमनाथ तुपसुदर 16 दत्ता प्रभाकर भुसे 17 साईनाथ भुसे 18 रामेश्वर विठ्ठल तारडे 19 अशोक रामचंद्र बर्डे 20 शरद रामचंद्र बर्डे 21 बाबासाहेब अशोक बर्डे सर्व राहणार आरडगाव व केंदळ खु.येथिल यांच्या विरोधात गु रजि नं 419/21 भा.द.वी कलम 354,324,427,143...

पोलिसांना पाहताच राहुरीत सार्वजनिक ठिकाणी दारु पिणारे मद्यपी दचाकी वाहने सोडुन पसार`पोलिस ठाणेत गुन्हा दाखल....पोलिसांनी वाहने केली जप्त.

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी शहरात सार्वजनिक ठिकाणी दारु पिणारयांनवर कारवाई करण्यासाठी पोलिस गेले असता पोलिसांना बघुन मद्यपी आपली दुचाकी वाहेन टाकुन पसार झाली असुन पसार मद्यपींचा शोध ते पोलिस घेत आहे. राहुरी शहरतील नगर मनमाड रोडवर असलेल्या गाडगे महाराज काॅम्प्लेक्स समोरील मोकळ्या जागेत दिनांक २६ मे रोजी रात्री काही मद्यपी दारु पित बसले होते. यावेळी पोलिस पथक शहरात गस्त घालत होते. या दरम्यान त्यांना गाडगे महाराज काॅम्प्लेक्स समोर काही तरुण दारु पित बसलेले दिसून आले.  पोलिसांना पाहताच ते दारुडे पसार झाले. मात्र.ज्या ठिकाणी दारुडे दारु पित बसले होते त्या ठिकाणाहून 1) होंडा डियो कंपनीची स्कूटी नंबर एम. एच. 17 सी 9508 2) कावासाकी कंपनीची बॉक्सर मोटरसायकल नंबर एम. एच. 17 एन 8715 3) हिरो होंडा कंपनीची सीडी डॉन मोटरसायकल एम. एच. 17 एस 4926 या तीन दुचाकीसह इंपिरियल ब्लू कंपनीच्या दोन दारुच्या बाटल्या असा एकूण 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  याबाबत पोलिस हवालदार आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प...

मदुरा मायक्रोफायनांन्स लिमिटेड ब्रंचच्या वतिने कोरोनाच्या संकट काळात झगडणारया पोलिस प्रशासनाचा सन्मान....

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा मदुरा मायक्रोफायनान्स लि . बॅच राहुरी . यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी अंतर्गत कोरोना संकट काळात जोखीम घेवून लढणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सन्मान म्हणून आज २७ मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यासह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात अन्य ५७ पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ आणि विविध सुरक्षा वस्तूचे ( मास्क , सॅनीटायझर ) वाटप करण्यात आले . यावेळी पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी शिवाजी खरात , राधिका कोहाकडे , दिपक कुंदे , सचिन ताजने , सोमनाथ जायभाये , तसेच मदुराचे शाखाधिकारी सचिन आल्हाडे आणि सहकरी सचिन हारदे , भुजंग लोखंडे , बचत गटातील लक्ष्मी रांशीणगे , निलिमा पवार आदि उपस्थित होते . आरबी आय मान्यताप्राप्त मदुरा कं . ग्रामीण , शहरी व निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्याकरिता कायमच प्रयत्नशील राहिली आहे . तसेच सामाजिक बांधिलकी अंतर्गत यापूर्वीही रक्तदान शिबीर , वृक्षारोपण ,आरोग्य तपासणी, पुरग्रस्त मदत असे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत.

कलगीतुरा थांबवा आणि आमच्या मागण्या मान्य करून गरिबांना मोफत उपचार द्या - आप्पासाहेब ढुस*

Image
देवळाली प्रवरा/सार्वमंथन वृत्तसेवा गेली अनेक वर्षे नगरपालिकेत सत्ता,  स्वतःच्या घरात नगराध्यक्षपद, घरातच आमदारकी, काही वर्ष होती, गल्ली ते दिल्ली सरकार, असे कित्येक वेळा जनतेने यांना संधी देऊन सुद्धा गावात यांना ग्रामीण रुग्णालय आणता आले नाही. गावात ग्रामीण रुग्णालय झाले असते तर अद्यावत इमारतीसह सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर, सर्जन गावातच उपलब्ध झाले असते. परंतु तसे न झाल्याने 'हाता पाया पडत डॉक्टर आणले' असे म्हणायची वेळ आली म्हणजेच नगराध्यक्षांना स्वतःच्याच पक्ष्याचा नाकर्तेपणा मान्य आहे हे स्पष्ठ होते. त्यामुळे कलगीतुरा थांबवून कृपया आमच्या मागण्या मान्य करा आणि देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना मोफत उपचार द्या असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी बोलतांना  सांगितले.  पुढे बोलताना ढुस म्हणाले की,यांनी ठरवले असते तर यांच्याच ताब्यात असलेल्या  त्रिंबकराज स्वामी महाराज आणि ग्राम सुधारणा मंडळाच्या सारख्या  कित्येक एकर जमीनिपैकी एक जागा देऊन यांना ग्रामीण रुग्णालय करता आले असते. पण केवळ गावाला वेठीस धरण्यासाठी यांनी कधीच गावात ग्रामीण र...

अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे छापा मारत 5 जुगारयांना जरबेद केले....वांबोरी पोलिसांच्या नाकावर टिच्चुन कारवाई..

Image
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची पुन्हा राहुरीत कारवाई राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दिनांक २४ मे रोजी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जूगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे . तसेच सुमारे पाच हजार रूपये रोख व जूगार खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले . राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून जूगार अड्डा सुरू होता . याची खबर मिळताच अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने दिनांक २४ मे रोजी साडेचार वाजे दरम्यान अचानक छापा टाकला . यावेळी काही जूगारी गोलाकार बसून स्वतःचे आर्थिक फायद्या करिता तिरट नावाचा हार जीतचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले . तसेच त्यांच्याकडून ४ , ९९ ० रुपये रोख रक्कम व तिरट नावाचे जुगारा साहित्य असा मुद्देमालासह मिळून आला . स्थानिक गुन्हे अन्वेष विभाग पथकातील हवालदार रोहित येमुल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी १ ) अंकुश गंगाधर मकासरे वय ३२ वर्ष २ ) राहुल विठ्ठल धनवटे वय ३० वर्षे ३ ) विकास नारायण कुसमु वय २५ वर्षे ४ ) राजेंद्र पांडुरंग व्यव...

राहुरी तालुक्यातील या गावात मतिमंद मुलीवर अत्याचार? पोलिसात छेडछाडीचा गुन्हा दाखल...स्थानिक राजकीय दबाव ? की पोलिस अंधारात?

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी तालूक्यातील पुढाऱ्यांच्या दबावामुळे मतीमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची गंभीर घटना विनयभंग दाखवून रफादफा करण्यात आली. मात्र बलात्कार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मिळविण्यासाठी राहुरी पोलिसात धाव घेतली आहे.  राहुरी तालूक्यातील बाभुळगांव येथे एक कुटुंब शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यांना एक १४ वर्षीय मतीमंद मुलगी आहे. दिनांक ३१ मार्च रोजी ती अल्पवयीन मतीमंद मुलगी तीच्या घरी एकटीच होती. दुपारी तीन वाजे दरम्यान त्या मुलीचे वडील जेवण करण्यासाठी घरी गेले असता त्यांच्या मतीमंद मुलीवर विकास साहेबराव ससाणे हा तरूण बलात्कार करत होता. सदर घटना त्या मुलीच्या वडिलांनी समक्ष पाहिली. यावेळी त्यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन बलात्काराचा खुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी बाभुळगांव येथील काही गाव पुढाऱ्यांनी सदर पिडीत कुटुंबावर दबाव तंत्राचा वापर करून गप्प बसवीले. तसेच बलात्कार केलेला विकास साहेबराव ससाणे याचे त्या पिडीत मुलीशी लग्न लावून देतो. अशी समजूत काढून बलात्कारा सारखा गंभीर गुन्हा विनयभंग दाखवण्यात आला....

राहुरी तालुक्यात अवैध दारु विक्री करणार्यावर पोलिसांची कारवाई......पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांची धडक कारवाई.....

Image
वांबोरी,देवळाली प्रवरा,रेल्वे स्टेशन येथे पोलिसांचा छापा. राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा  गेल्या काही दिवसांपासून राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी तालुक्यातील  अवैध दारू विक्री करणारयावर धाडसत्र सुरु केल्याने दारु अवैध दारु विक्री करणारयामधे चांगलीच खळबळ उडाली आहे .दिनांक २५ मे रोजी तालुक्यातील वांबोरी, देवळाली प्रवरा, व रेल्वे स्टेशन या ठिकाणी दारु विक्री करणारयावर छापे मारी करत सुमारे तीन हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन मुंबई प्रो.का.कलम 65ई प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत..  राहुरी तालूक्यातील अनेक गावांत तसेच राहुरी शहरात राजरोसपणे दारु विक्री सुरू आहे. सर्वत्र लाॅकडाऊन सुरु असताना दारू विक्री मात्र सर्रास सुरू आहे. काही दारू दुकाने बंद करण्याची मोहिम पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे. दिनांक २५ मे रोजी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील वडारवाडा येथे राहुरी पोलिस पथकाने छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी आरोपी दादा दिंगबर डुकरे वय ३० वर्षे यास पकडले त्याच्याकडून ७२० रूपये किंमतीच्या १२ देशी दारूच्या बाटल्या जप्त क...

राहुरी कृषी विद्यापीठात कारकुन पदावर काम नोकरी लावून देतो म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केली..

Image
राहुरी कृषी विद्यापीठात कारकुन पदावर  नोकरी लावून देतो म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केली..  राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कारकून म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगत एका भामट्याने दोघांकडून साडे सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे . याप्रकरणी दिपक बापू जाधव ( रा . वासखेडी , ता . साक्री , जि.धुळे ) याला शनि‌पेठ पोलिसांनी आज मंगळवारी अटक केली . वंदना अशोक मराठे उर्फ वंदना सचिन बुचडे ( वय 31 , रा.जोशी पेठ , जळगाव , ह.मु.मुंबई ) यांनी तसेच त्यांचे चुलत भाऊ वाल्मीक सुरेश पाटील यांनी दीपक जाधव याला 2018 व 2018 या दोन वर्षात 6 लाख 40 हजार 100 रुपये वेळोवेळी दिलेले आहेत . काही रक्कम बँक खात्यात तर काही रक्कम ऑनलाईन वर्ग केली . राहुरी कृषी विद्यापीठात दोघांना लिपिक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष जाधव याने दिले होते , तीन वर्षात त्याने ना नोकरीला लावले ना पैसे परत केले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वंदना यांनी शनि पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली . त्यानुसार जाधव याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला .

राहुरी खुर्द येथिल आरोग्य केन्द्रांत आज पासुन जेष्ठ नागरीकांना कोविड लस देण्यास सुरवात..... ना. तनपुरे

Image
राहुरी खुर्द/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी खुर्द व गोटुंबे आखाडा हे गाव बारागाव नांदुर आरोग्य केन्द्रा पासुन लांब असल्याने नागरीकांना प्रवासाचा  त्रास सहन करावा लागेल तेव्हा लसी करण केन्द्र राहुरी खुर्द येथे घ्यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या कडे केली होती त्या नुसार नामदार तनपुरे यांनी  संबंधित खात्याला सुचना केल्याने राहुरी खुर्द येथिल आरोग्य केन्द्रांत आज पासुन जेष्ठ नागरीकांना कोविड लस देण्यास नामदार प्राजक्त  तनपुरे  यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला  या वेळी मुळा प्रवरा विज संस्थेचे मा़जी संचालक अय्युब पठाण,गेणुभाऊ तोडमल,पंचायत समिति चे उपसभापति प्रदिप पवार,सतिष पावटे,बाळासाहेब चोपडे, उप सरपंच तुकाराम बाचकर, आंबादास साखरे,युवराज तोडमल ,आण्णा पा, तोडमल, पोलीस पाटील बबनराव आहीरे,, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ तोडमल, असफ पठाण, नरेन्द्र शेटे,बाळासाहेब कटारनवरे, योगेश कांबळे, राहुल पाटोळे, ग्रामसेवक संभाजीराव निमसे, सोमनाथ होले, अशोक जगधने, दतात्रय वाघ,अशोक वाघ आदी उपस्थितीत होते,  आरोग्य केन्द्रा वर नागरीका...

देवळाली प्रवराच्या शासकीय कोविड सेंटर साठी आमरण उपोषण---आप्पासाहेब ढुस

Image
देवळाली/सार्वमंथन वृत्तसेवा देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेले खाजगी कोविड सेंटर शासकीय करावे किंवा नागरिकांना मोफत सुविधा देणेसाठी नगरपालिकेने स्वतः ते कोविड सेंटर चालवावे अन्यथा नगरपालिकेच्या गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले साहेब यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे.   इमारत नगरपालिकेची, पाणी नगरपालिकेचे, वीज नगरपालिकेची, सफाई कामगार नगरपालिकेचे ... मग कोविड सेंटरच खाजगी का? असा देवळाली प्रवराच्या नागरिकांना प्रश्न पडला आहे. नगरपालिकेच्या मालमत्तेमध्ये खाजगी कोविड सेंटर चालवून रुग्णाला भरमसाठ बिलाची आकारणी कशी काय करू शकता असा सवाल आप्पासाहेब ढुस यांनी विचारून तात्काळ हे कोविड सेंटर शासकीय करा नाहीतर चले जाव आंदोलन छेडावे लागेल असा इशारा दिला होता.  तसेच चार दिवसाचे चाळीस हजार रुपये बिल भरायला पैसे नसलेणे या खाजगी कोविड सेंटरमध्ये अडकून पडलेल्या देवळाली प्रवरा येथीलच रुग्णाला सोडवायला आंदोलन करायची वेळ आल्याने ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी यांना आम...

देवळालीचे पत्रकार श्रीकांत जाधव यांना पितृशोक

Image
देवळाली/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी तालुक्यातील कनगर परंतु मुक्काम राहुरी फॅक्टरी येथील ह.भ.प.जगन्नाथ धोंडिराम जाधव ( वय ५८ ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे . 99 शांत , संयमी धार्मिक , गायन कार्याची आवड असणारे जाधव हे ओम गुरूदेव भजनी मंडळाचे अध्यक्ष होते . माजी सहाय्यक सुरक्षा अधिकारी , माजी होमगार्ड समादेशक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.तसेच नाट्य संगित , गायन या क्षेत्रात अनेक कलावंत घडविण्यात त्यांचा मोठा वाटा शांत , संयमी धार्मिक , गायन कार्याची आवड असणारे जाधव हे ओम गुरूदेव भजनी मंडळाचे अध्यक्ष होते . माजी सहाय्यक सुरक्षा अधिकारी , माजी होमगार्ड समादेशक म्हणून त्यांनी काम केलेले आहे.तसेच नाट्य संगित , गायन या क्षेत्रात अनेक कलावंत घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता.अल्पशा आजाराने त्यांना ग्रासले होते.उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यांच्या मागे वडील , पत्नी , दोन मुले , एक मुलगी , भाऊ , भावजयी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार श्रीकांत जाधव यांचे ते वडील होत .

निळवंडेच्या कामाला राज्य सरकार एक रुपयाही कमी पडु देणार नसल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांची ग्वाही......

Image
राहुरी /सार्वमंथन वृत्तसेवा निळवंडे धरणाच्या कालव्याला महाविकास आघाडी सरकारने गती दिलेली असुन या कामासाठी राज्य सरकार एक रुपयाही कमी पडु देणार नसल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी सांगितले .काल राहुरी तालुक्यातील कानडगांव येथे जलसंपदा मंत्री मा . नामदार जयंत पाटील , राज्यमंत्री ना . प्राजक्त तनपुरे व मा.खा. प्रसाद तनपुरे यांनी भेट देवून तेथील कालव्याच्या स्लॅब कलर्वट व माती भराव कामांची पहाणी करुन आढावा घेतला . यावेळी नामदार पाटील म्हणाले की , महाविकास आघाडी सरकारने अर्थ संकल्पात यावर्षी 500 कोटी रुपयांची तरतुद या कालव्यासाठी केलेली आहे . या कालव्यांचे काम डिसेंबर 2022 अखेर पुर्ण करण्याचे उद्दीष्ठ आहे . या कामामुळे कालव्यात पाणी येवुन या जिरायत भागातील शेती समृध्द होवुन येथील परीसर सुजलाम सुफलाम होणार असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले . यावेळी कणगर येथील भागडा चारी देखभाल दुरुस्तीसाठी येथील लाभधारक शेतकरी सुयोग नालकर , अनिल घाडगे , सोन्याबापु उ हे , दादासाहेब पवार , किशोर गागरे यांनी 1 कोटी 50 लाख निधीची मागणी नामदार पाटील यांचेकडे केली . यावर नाम...

राहुरीत नगर आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाकडुन छापा मारत 150.कीलो गोमांस जप्त....राहुरीच्या गोमास मार्केटवर नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई नगरच्या पथकाने कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांनवर नामुष्की ओढवली....

Image
राहुरीत नगर आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने  छापा मारत 150.कीलो गोमांस जप्त.... राहुरीच्या गोमास मार्केटवर नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई  स्थानिक पोलिसांनवर नामुश्की ओढवली.... राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा महाराष्ट्र राज्यात गोमांस विक्री करण्यास बंदी असताना देखील समिर पठाण हा राहुरी शहर हद्दीत दिनांक २१ मे रोजी गोमांस विक्री करताना आढळून आलाय . अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने त्याच्यावर कारवाई करून १५० किलो गोमांस व इतर मुद्देमाल ताब्यात घेतला आहे . महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांचे गोमांस कब्जात बाळगणे व विक्री करण्याची बंदी असतानाही राहुरी तालुक्यात गोमांस विक्री सुरू असल्याचे दिसून आले .  दिनांक २१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजे दरम्यान समीर चाँद पठाण वय ४५ वर्षे राहणार खाटीक गल्ली , राहुरी . हा इसम गोमांस विक्री करताना मिळून आला . अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले . यावेळी त्याच्याकडून अंदाजे २२,५०० रूपये किंमतीचे १५० किलो गोमांस , ५०० रूपये किंमतीचा एक सुरा व एक लाकडी ठोकळा तसेच ५०० रूपये किंम...

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

Image
श्रीरामपूर / सार्व मंथन कुठलेही सामाजिक कार्य हे निर्पेक्ष असले पाहिजे,त्यात कुठलाही स्वार्थ,जोर-जबरदस्ती किंवा मी म्हणेल तसेच न करता व वागता सामाजिक कार्य एक कार्यशिलतेने परीपूर्ण निस्पृह असले पाहिजे,जसे एखादे विशाल  वटवृक्ष असते,भर उन्हात त्याच्या सावलीखाली अनेक गरजवंत पशु,पक्षी,मानव येतात, बसतात,जरासा विसावा घेतात तथा उन कमी झाले अथवा मार्गस्थ होण्याची वेळ आल्यावर मार्गस्थही होतात,त्या बदल्यात त्या विशाल वटवृक्षास त्या सावली घेणाऱ्यांकडून काय अपेक्षा असते ? तसेच एक थंड पाण्याच्या विहिरीचेही असेच काही असते ज्यावेळी मानव,पशू,पक्षी यांना तहान लागते तेव्हाच ते या थंड पाण्याच्या विहिरीजवळ येतात आणि पाणी पेऊन आपली तहान भागवितात त्याबदल्यात ती विहिरी त्यांच्याकडून काय अपेक्षा  ठेवते ? असेच निस्पृह समाजसेवेचेही असते,ज्यावेळेस लोकांना तुमची गरज वाटते,आवश्यक्ता भासते त्यावेळी ते आपल्याकडे येतात, आवश्यकतेनुसार थांबतात आणि मार्गस्थही होतात,जसे विशाल वटवृक्षाकडे गार सावली असते,विहिरीकडे थंड पाणी असते त्याप्रमाणेच एका समाज सेवकाकडे निस्पृह समाजसेवा असते,कधी स्वत:हुन तर कधी स...

गावचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास वांबोरी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा.....

Image
वांबोरी/सार्वमंथन वृत्तसेवा  (राधेशाम कुसमुडे)  राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत हे लोकवस्ती बाबत तालुक्यात सर्वाधिक मोठी, उत्पन्नाबाबत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांकची ग्रामपंचायत आहे.  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छतेचे आवाहन केले जात असले, तरी वांबोरीतील काही भागांत नागरिकांना पाण्याचीच समस्या भेडसावत आहे. मागील आठवड्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वांबोरीत काही भागांतील नागरिक सध्या त्रस्त असून स्वच्छता करणार तरी कशी ? असा प्रश्न त्यांना पडला आहे.   वांबोरी गावामध्ये दर आठ दिवसानंतर पाणी सोडले जाते आणि ३६५ दिवसांची पाणीपट्टी सक्तीने वसुली केली जाते. पाण्यासाठी माता भगीनींना कामधंदे सोडुन डोक्यावर हंडे घेऊन पायपीठ करावे लागत आहे. त्यामुळे पाठीचे, मणक्याचे, मानेचे आणि मानसिक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनता अतिशय त्रस्त झाली आहे कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना अशा परिस्थितीत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आणखी रोगराई वाढण्याची शक्यता आहे.  गावातील नेत्यांचे या गोष्टीकडे अजिबात लक्ष नसल...

शरिर संबंध ठेवुन अश्लील व्हिडिओ बनवून एक कोटींची खंडणी मागणाऱ्या महिलेसह एक जणास पोलिसांनी केले गजाआड.

Image
राहुरी/नगर/सार्वमंथन वृत्तसेवा शरिरसंबध ठेऊन आमीष दाखवत अश्लील व्हीडीओ बनवुन लाखोंचा गंडा घालणारे एका महिलेसह  एकाला पोलिसांनी अटक केली आहे. यामधे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या प्रकरणात पोलिस सुत्रांकडुन  दिलेल्या माहिती नुसार 26 एप्रिल 2021 रोजी या गुन्ह्यातील आरोपींनी संगणमत करुन शरिरसंबधाचे अमिष दाखवून त्यांचेतील महिलेसोबत शरिरसंबध ठेवण्यास भागपाडुन त्याचे अश्लील व्हीडीओ बनवला होता. तसेच आम्हास एक कोटी रुपये आणुन दे नाहीतर सदर अश्लील व्हीडीओ हा पोलीसांना दाखवुन तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु अशी धमकी गुन्ह्यातील आरोपींनी दिली होती . सदर वेळी फीर्यादीच्या गळ्यात असणारे 5 तोळे वजनाची दोन लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन हातातील साडेसहा तोळे वजनाच्या 4 अंगठ्या व रोख रक्कम 84300 / - रुपये असा एकुण 544300 / -रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी नामे अमोल सुरेश मोरे ( रा . कायनेटिक चौक याच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे . सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक  मनोज पाटील .अपर पोलीस अधिक्षक. सौरभ ...

आपल्यासूनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याने सुनेच्या मदतीने आपल्या तरुण मुलाचा केला खून....

Image
राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा कोरोना महामारीने जगाला मोठा धडा दिला आहे. माणुसकी, नाती जपण्याचा संदेश दिला आहे. मात्र या संकटात गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिली आहे. लोकांना अजूनही नात्याची किंमत कळली नसल्याचे राजस्थानातून एका घटनेवरून उजेडात आले आहे. नात्याला   कलंक   लावणारी   घटना राजस्थानच्या जैसलमेर   शहरात   घडली आहे.आपल्यासूनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याने आपल्या तरुण मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा मागील 15 दिवस कुणालाच मागमूस लागलेला नाही. सून आणि सासऱ्याने दोघांनी मिळून केलेल्या हत्याकांडाने राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलिस तपासात बुधवारी या घटनेचा खुलासा झाला.पोलिसांनी सांगितले की, हत्या झालेल्या पुरुषाच्या पत्नीने पतीला लिंबू सरबत दिले होते. त्या सरबतमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. नंतर दोघांनी करंट लावून हत्याकांड केले. मुलाला विजेचा धक्का लागला, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आरोपी सासऱ्याने सर्वांना सांगितले. पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी अधिक तपास सुरू केल...

आता तर महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची चर्चा सरकार पावले उचलत आहे.....जिल्हाधिकारी डाॅ भोसले

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा महाराष्ट्रामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे . अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण फैलावले असून रुग्णसंख्या रोज वाढत असताना दिसत आहे . आता तर महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची चर्चा होत असून सरकार पावले उचलत आहे . याच पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी थेट ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे .जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले यांनी गावाचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना विविध मार्गदर्शन करत विविध गोष्टींचे आवाहन देखील केले आहे . ' जूनच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट सक्रीय होईल . पुढील वर्षभर तरी आपल्या तोंडावरील मास्क आणि हातावरील सॅनिटायझर कायम राहील , असा अंदाज सांगत हे गृहीत धरूनच काम करण्याचे आवाहनही त्यांनी केलं . प्रशासनाला सहकार्य म्हणजे गावाने गावकऱ्यांनाच करण्यासारखे आहे . त्यामुळे स्थानिक पातळीवरच सर्वांनी मिळून आता या कोरोनाचा सामना करायला हवा  जिल्हाधिकारी डॉ . भोसले , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी नगर , नेवासा , श्रीरामपूर , राहुरी , अकोले आणि संगमनेर त...

एकाच आठवड्यात शेख दाम्पत्यांच्या निधन..

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा राहरी शहरातील बालाजी रोड परिसरात राहत असलेले नबीभाई शेख व आशाबी शेख या वयोवृद्ध दाम्पत्यांचे एकाच आठवड्यात अल्पशा आजाराने निधन झाल्याची घटना घडली . नबीभाई शेख हे मुळा प्रवरा मध्ये स्थापने पासूनचे प्रथम वाहन चालक होते . काही वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह राहुरी शहरातील बालाजी रोड परिसरात आपल्या राहत्या घरात सेवानिवृत्त जिवन जगत होते . काही दिवसांपूर्वी ते आजारी पडले . या अल्पशा आजारात त्यांचे शनिवार दि . १ मे रोजी निधन झाले . याच दरम्यान त्यांची पत्नी आशाबी नबीभाई शेख ह्या आजारी पडल्या . एकीकडे पती सोडून गेल्याचे दुःख तर दुसरीकडे अल्पशा आजाराने त्यांना ग्रासले . या अल्पशा आजारातच त्यांनी दि .८ मे रोजी अखेरचा श्वास घेतला . मृत्यू समयी नबीभाई शेख यांचे वय ८१ वर्षे तर आशाबी शेख यांचे वय ७४ वर्षे होते . एकाच आठवड्यात या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने राहुरी परिसर , मित्र , नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यांच्या मागे चार मुली चार जावई असा मोठा

लोकमत परिवारातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय कौतुकास्पद आणि दिलासा देणारा - प्रकाश कुलथे

Image
श्रीरामपूर/सार्व मंथन वृत्तसेवा लोकमत परिवारातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रूपये देण्याचा लोकमत व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय दिलासा देणारा आहे.राज्यातील अनेक पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ज्येष्ठ व नवोदित पत्रकार भीतीच्या छायेत काम करत आहेत. जोखीम पत्करून  पत्रकार फिल्डवर काम करत आहेत, त्यातील अनेकांना त्यांच्या कंपन्यांचे कोणतेही सुरक्षा कवच नाही. त्यामुळे दुर्दैवाने जर काही अनुचित प्रकार घडला तर पत्रकारांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. अशा वेळी लोकमत समूहाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे पत्रकारांना निश्चितच काम करण्यास अधिक बळ मिळेल. वृत्तपत्र अडचणीच्या काळात आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही ही भावना सकारात्मक परिणाम घडवून आणणारी आहे. कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे जाहिरात व्यवसाय आटलेला आहे. अनेक आव्हानांना वृत्तपत्रांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी लोकमतने आपल्या दिवंगत पत्रकारांना 10 लाख रुपयांपर्यंतची मदत करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे.  लोकमतचे मनापासून अभिनंदन /आभार  संजय मलमे - अध्यक्ष, महाराष्ट्र संपादक परिषद मु...

वळणमधे ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर लवकरच रूग्ण सेवेत...डाॅ.मकासरे

Image
राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण गावामधे ऑक्सिजन बेडसह सुजज्य  कोविड केअर  सेंटर लवकरच रूग्ण सेवेत सुरू होणार असल्याची माहिती येथील डॉक्टर विजय मकासरे यांनी दिली आहे. शुक्रवार दि. १४ मे  रोजी अक्षय तृतीया,रमजान ईद,धर्मवीर संभाजी महाराज जयंती,परशुराम जयंती या शुभ दिनी वळण (ता राहुरी) परीसरातील रूग्णसेवेसाठी अद्यावत असे मॅक्सकेअर कोविड सेंटर सुरू करण्यात आले  आहे.तसेच याच ठिकाणी सर्व सोई सुविधेसह विलगिकरण कक्ष देखील या वेळी सूरु करण्यात येत आहे.सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर १०  ऑक्सिजन बेड, ५ आयसीयू बेड व उर्वरित २५ जनरल बेड अशा प्रकारे एकूण ४० बेड व्यवस्था करण्यात येणार असून माफक दरात सेवा देण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी २४ तास तज्ञ डॉक्टर्स,प्रशिक्षित सिस्टर व इतर स्पेशालिस्ट डॉक्टर यांच्या भेटी असणार आहे.तसेच शासकीय नियमाप्रमाणे बिले देखील आकारणी होईल त्यामुळे आता  ग्रामीण भागातील रूग्णांना बेडसाठी व उपचारासाठी शहरी भागात जाऊन जी धावपळ करावी लागत होती ती आता करावी लागणार नाही आपल्याच गावात आपल्याला उपचार अल्प दरा...

15 मे नंतर पुन्हा 15,दिवस लाॅकडाउनचा उद्या बुधवारी निर्णय?

Image
मुंबई/सार्वमंथन वृत्तसेवा महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनाची रुग्ण संख्या अजूनही कमी झालेली नाही. दररोज होणारी मोठी वाढ कायम आहे. त्यामुळे राज्यात आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढू शकतो. बुधवारी कॅबिनेट बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळते आहे. अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे 30 मेपर्यंत हेच निर्बंध कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील, असे  काही दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होता. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी अनेक जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर वाढताना दिसतो आहे. त्यामुळं लॉकडाऊन कायम राहणार अशी शक्यता आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही 50 हजारांच्या आसपास आहे. राज्याचा पॉझिटिव्ह रेट कमी झालेला नाही. काही जिल्ह्यात कोरोनाचा वाढता दर कायम आहे. काही शहरात आता कडक लॉकडाऊन लागू करण्य...

लसिकरण प्रक्रीयेतील अडचणी दुर करा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांची मागणी ....तहसिलदार यांना निवेदन

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी तालुक्यात नागरिकांना लसीकरण प्रक्रियेत अनेक अडचणी येत असून ऑनलाईन नोंदणी मध्ये तालुक्या बाहेरील नागरिक येथे येऊन लस घेऊन जातात. मात्र येथील नागरिक लसीची प्रतीक्षा करत असतात. त्यामुळे याबाबत असलेल्या अडचणी दूर कराव्यात. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे केली आहे. तहसीलदार यांना निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप लसीकरण प्रक्रिया सुरळीत झालेली नाही. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे तालुक्याच्या बाहेरील नागरिक राहुरीत येऊन लस घेत आहेत. मात्र स्थानिक नागरिकांना लसीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच आता लस घेण्यासाठी कोविड चाचणी करणे अनिवार्य करण्यात आल्याने नागरिकांची लस घेण्याची मानसिकता दिसत नाही. या अटीबाबत शिथिलता करावी. लसीकरण केंद्रांवर होणारी अनावश्यक गर्दी कमी करावी. राहुरी शहरात तालुक्याप्रमाणे बुथ निहाय लसीकरण सुरू करावे. प्रथम डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य द्यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राहुरी तालुका भाजपा अध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सु...

सरपंच पतिची करामत गावातील महिले बरोबर केले हे कृत्य....राहुरीच्या या गावात घडली घटना...

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील महिला सरपंचाचा पति काशिनाथ ढवण याने एका ४० वर्षीय महिलेला तू मला खूप आवडतेस असे म्हणून तू कोणाला काही सांगितले तर तूला आणि तूझ्या कुटूंबाला संपवून टाकीन अशी धमकी दिली . तसेच शिवीगाळ केली . ही घटना दिनांक ९ मे रोजी सायंकाळी घडली आहे . या घटनेतील ४० वर्षीय महिला ही तिच्या कुटूंबासह राहत आहे . दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान सदर महिला ही तिच्या घरासमोर एकटीच उभी होती . यावेळी कुरणवाडी येथील  आरोपी सरपंच पती " काशिनाथ भागवत ढवण " राहणार कुरवाडी , तालूका राहुरी .हा तेथे आला . आणि त्या महिलेला म्हणाला की , तुझा नवरा कोठे आहे? . त्यावेळी ती महिला म्हणाली माझा नवरा नदीवर माश्याचे जाळे सोडण्यासाठी गेला आहे . त्यानंतर आरोपी काशिनाथ ढवण हा त्या महिलेला म्हणाला तू मला खुप आवडतेस . त्यावेळी महिला त्याला म्हणाली तू असे का बोलतो . मी तुझे नाव माझ्या नवऱ्याला सांगण . असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने आरोपी काशिनाथ ढवण याने तिला शिवीगाळ करत तू जर हे कोणाला सांगीतले तर तूला व तूझ्या कुटुंबाला संपवून टाकीन , असा ...

पै.अक्षय दादा कर्डीले यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाग्रस्त रूग्णांना उपयुक्त वस्तुचे वाटप..

Image
   राहुरी/सार्वमंथन वृतसेवा राहुरी/शुभकीर्ती कोविड सेंटरला उपयुक्त साहित्य दिले. समाज्याचे काहितरी देणे लागतो हा हेतु डोळ्यासमोर ठेवुन पै.अक्षय कर्डिले व मित्र मंडळाच्या वतिने राहुरी तालुक्यातील विविध कोविड सेंटरला रुग्णासाठी उपयुक्त साहित्य देण्यात आले. राहुरी तालुक्यातील,कृषि विद्यापीठ, वांबोरी ग्रामीण रुग्णालय, बालाजी मंगल कार्यालय,शुभ किर्ती लाँन्स व देवळाली प्रवरा येथील कोव्हिड केअर सेंटर मधिल कोरांटाईन असलेल्या रुग्णाना अत्यावशक वस्तुचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंडी , वाफेची मशिन, मास्क तेल,साबन, ब्रश, कोलगेट,सिनीटाइझर अदि  उपयुक्त साहित्य देण्यात आले.राज्यात कोरोनाचा कहर सुरुच असुन जिल्हयासह राहुरी -नगर -पाथर्डी मतदार संघात मोठ्या प्रमाणात रूग्णांची संख्या वाढली आहे.या रुग्णांना मदतीचा हात म्हणुन आमचे कडून  प्रयत्न असुन हे सर्व रुग्ण बरे होवुन घरी जावेत हिच परमेश्वरास प्रार्थना हिच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा असे मत पै.अक्षय कर्डीले यांनी  व्यक्त केले. त्याच बरोबर कोव्हीड सेंटर वर काम करणारे डॉक्टर नर्स.कर्मचारी यांचे अभिनंदन केले.य...

शासनाने कोरोना रुग्णांची होणारी लुटमार थांबवावी-सुरेश लांबे पाटील,

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा कोरोनाने सर्वत्रच पळापळ सुरु असतांना सध्या चालु असलेली कोरोना पाॅझीटिव रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्याचा गैरफायदा काही हॉस्पिटल मधील डाॅक्टर घेत आहेत, यामुळे नातेवाईकांची मोठी अर्थिक लुट होत आहे,1200 रुपयाचे रेमडीसिवर इंजेक्शन तब्बल 25 ते 40 हजार रुपये विक्री होत आहे. या सर्व गोष्टीशासनाचे अधिकारी व पदाधिकारी याच्या संमतीनेच चालु असल्याचा आरोप श्री. लांबे यांनी केला आहे.,  सध्या काही पेशंटची ऑक्सिज लेव्हल कमी असल्याने त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांना मृत्यूस सामोरे जावे लागते.तरी शासनाने व प्रशासनाने ऑक्सिजन चा पुरवठा करून ऑक्सिजन बेड वाढवावे, हि विनंती करण्यात आली आहे. गेली एक दीड वर्ष संपुर्ण भारतात कोरोना प्रादुर्भाव होत संपुर्ण भारतात शेतकरी,शेतमजुर,व्यापारी यांचे सर्व  उत्पादन बंद झाले आहे, त्यांना आपले कुटुंबांचा मुलभुत गरजा,अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टींला व्याकुळ  झाला, त्यात ज्यांना थोडीशी सर्दी व खोकला आल्यावर खाजगी हॉस्पिटल मधे जाऊन एक दोन हजार रुपये  गोरगरीब मजुरी काम करणारे,लोक  य...

देवळालीत चैतन्य विकास प्रतिष्ठान ,सुरेंद्र थोरात मित्र मंडळाच्या वतिने गरिबांसाठी रुग्णवाहिका सुरु..

Image
देवळाली प्रवरा/सार्वमंथन राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सुरेंद्र थोरात मित्र मंडळ, चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान व  चालक मालक संघटनेच्यवतीने मंगळवारी रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न झाले. सध्या कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असून अनेक रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने हाल सहन करावे लागते.हीच गरज ओळखून देवळाली प्रवरा व परिसरासाठी सुरेंद्र थोरात मित्र मंडळ, चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान व चालक-मालक संघटना यांनी ऑक्सिजनयुक्त व अल्पदरात रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज मंगळवारी देवळाली प्रवरा  बाजारतळावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न झाले.  यावेळी आ.लहू कानडे, नाशिक म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे,प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार एफ. आर.शेख मुख्याधिकारी अजित निकत, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशराव भांड, आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे आदी उपस्थित होते.

आमदार निधीतून देवळाली प्रवरा साठी अद्ययावत रुग्णवाहिका मिळावी - आप्पासाहेब ढुस*

Image
देवळाली प्रवरा/सार्वमंंथन वृत्तसेवा देवळाली प्रवरा साठी आमदार निधीतून अद्ययावत  कार्डियाक अँबुलन्स मिळावी असे निवेदन देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब  ढुस यांनी श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहुजी कानडे यांना दिले आहे.   ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा शहर हे जवळपास ४० हजार लोकसंख्येचे मोठे शहर आहे.  सध्या कोरोनाचा कहर सुरू असून काही खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची अक्षरशः लूट सुरू आहे. काही खाजगी रुग्णवाहिका रुग्णांना वेठीस धरीत असून रुग्णांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. तसेच देवळाली प्रवरा शहरामध्ये अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णालयात पोहचण्या अगोदरच उपचाराआभावी काही रुग्ण दगावत आहेत.        तरी आपणास विनंती की, देवळाली प्रवरा शहराला सर्व सुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका अत्यंत गरजेची आहे. तसेच  देवळाली प्रवरा शहर हे आपल्या मतदारसंघात येत असल्याने कृपया कोरोनासाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या स्वतंत्र निधीतून किंवा आपल्या स्थानिक विकास निधीतून स...