पै.अक्षय दादा कर्डीले यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाग्रस्त रूग्णांना उपयुक्त वस्तुचे वाटप..
राहुरी/सार्वमंथन वृतसेवा
राहुरी/शुभकीर्ती कोविड सेंटरला उपयुक्त साहित्य दिले.समाज्याचे काहितरी देणे लागतो हा हेतु डोळ्यासमोर ठेवुन पै.अक्षय कर्डिले व मित्र मंडळाच्या वतिने राहुरी तालुक्यातील विविध कोविड सेंटरला रुग्णासाठी उपयुक्त साहित्य देण्यात आले.
राहुरी तालुक्यातील,कृषि विद्यापीठ, वांबोरी ग्रामीण रुग्णालय, बालाजी मंगल कार्यालय,शुभ किर्ती लाँन्स व देवळाली प्रवरा येथील कोव्हिड केअर सेंटर मधिल कोरांटाईन असलेल्या रुग्णाना अत्यावशक वस्तुचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंडी , वाफेची मशिन, मास्क तेल,साबन, ब्रश, कोलगेट,सिनीटाइझर अदि उपयुक्त साहित्य देण्यात आले.राज्यात कोरोनाचा कहर सुरुच असुन जिल्हयासह राहुरी -नगर -पाथर्डी मतदार संघात मोठ्या प्रमाणात रूग्णांची संख्या वाढली आहे.या रुग्णांना मदतीचा हात म्हणुन आमचे कडून प्रयत्न असुन हे सर्व रुग्ण बरे होवुन घरी जावेत हिच परमेश्वरास प्रार्थना हिच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा असे मत पै.अक्षय कर्डीले यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर कोव्हीड सेंटर वर काम करणारे डॉक्टर नर्स.कर्मचारी यांचे अभिनंदन केले.या वेळी आरोग्य खात्याच्या डॉ . गायकवाड मॅडम डॉ. गवते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड. निसारभाई शेख, गणेश खैरे,राजेंद्र उंडे,नयन शिंगी, सचिन मेहेञे,नारायण धोंगडे, जब्बार पठाण, प्रभाकर हरिचंद्रे,अमोल घाडगे.मयुर गवळी .कुंदन बाचकर.सुनिल देशमुख , अदित्य दहिफळे, बाळासाहेब भगत,संकेत पाटील,सतिश आढाव, जिशान शेख,सागर केदारी, आफनान आत्तार, व्यवहारे मँडम,उदय मुथ्था,मंगेश ढुस या सह अक्षय दादा मिञ मंडळाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
Comments
Post a Comment