आपल्यासूनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याने सुनेच्या मदतीने आपल्या तरुण मुलाचा केला खून....
राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा
कोरोना महामारीने जगाला मोठा धडा दिला आहे. माणुसकी, नाती जपण्याचा संदेश दिला आहे. मात्र या संकटात गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिली आहे. लोकांना अजूनही नात्याची किंमत कळली नसल्याचे राजस्थानातून एका घटनेवरून उजेडात आले आहे. नात्याला कलंक लावणारी घटना राजस्थानच्या जैसलमेर शहरात घडली आहे.आपल्यासूनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याने आपल्या तरुण मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा मागील 15 दिवस कुणालाच मागमूस लागलेला नाही. सून आणि सासऱ्याने दोघांनी मिळून केलेल्या हत्याकांडाने राजस्थानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलिस तपासात बुधवारी या घटनेचा खुलासा झाला.पोलिसांनी सांगितले की, हत्या झालेल्या पुरुषाच्या पत्नीने पतीला लिंबू सरबत दिले होते. त्या सरबतमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. नंतर दोघांनी करंट लावून हत्याकांड केले. मुलाला विजेचा धक्का लागला, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे आरोपी सासऱ्याने सर्वांना सांगितले. पोलिसांना या घटनेची खबर मिळताच त्यांनी अधिक तपास सुरू केला. या तपासातून धक्कादायक खुलासा झाला आहे. नाचना पोलिस डीसीपी हुकुमार राम बिष्णोई यांनी या हत्याकांडा बाबत विस्ताराने माहिती दिली. तरुणाच्या हत्येचा त्याची पत्नी आणि पित्याने पद्धतशीर कट रचला होता. तरुणाला रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा सरबत दिले. त्यात टाकलेल्या झोपेच्या गोळ्यांमुळे तरुण बेशुद्ध झाला. तो बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर दोघांनी विजेचा करंट लावला. आरोपी सासऱ्याने आपल्या मुलाला कायमची झोप दिली. नंतर आपले गुन्हेगारी कृत्य लपवण्यासाठी सकाळी-सकाळीच मुलाचे अंत्यसंस्कार केले.
अशी उलगडली हत्या
हिरालाल असे मृत तरुणाचे नाव आहे. हिरालालच्या मृत्यूबाबत संशय आल्यानंतर त्याच्या छोट्या भावाने वहिनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता. या तपासासाठी पोलिसांनी दफन केलेला मृतदेह दहा दिवसांनंतर कबर मधून बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पुढे पाठवण्यात आला. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर हिरालालच्या मृत्यूमागील धक्कादायक कारणाचा उलगडा झाला. त्याआधारे पोलिसांनी हिरालालच्या पत्नीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली. तिने हत्याकांडा मागील कारणाचा पोलिसांसमोर खुलासा केला. आरोपी महिलेचे तिच्या सासऱ्या सोबत अनैतिक संबंध होते. यात हिरालालचा अडथळा येत होता. त्यामुळे सूनेसोबतच्या संबंधातील मुलाचा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी हिरालालच्या हत्येचा कट रचला गेला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.
Comments
Post a Comment