निळवंडेच्या कामाला राज्य सरकार एक रुपयाही कमी पडु देणार नसल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांची ग्वाही......
निळवंडे धरणाच्या कालव्याला महाविकास आघाडी सरकारने गती दिलेली असुन या कामासाठी राज्य सरकार एक रुपयाही कमी पडु देणार नसल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी सांगितले .काल राहुरी तालुक्यातील कानडगांव येथे जलसंपदा मंत्री मा . नामदार जयंत पाटील , राज्यमंत्री ना . प्राजक्त तनपुरे व मा.खा. प्रसाद तनपुरे यांनी भेट देवून तेथील कालव्याच्या स्लॅब कलर्वट व माती भराव कामांची पहाणी करुन आढावा घेतला . यावेळी नामदार पाटील म्हणाले की , महाविकास आघाडी सरकारने अर्थ संकल्पात यावर्षी 500 कोटी रुपयांची तरतुद या कालव्यासाठी केलेली आहे . या कालव्यांचे काम डिसेंबर 2022 अखेर पुर्ण करण्याचे उद्दीष्ठ आहे . या कामामुळे कालव्यात पाणी येवुन या जिरायत भागातील शेती समृध्द होवुन येथील परीसर सुजलाम सुफलाम होणार असल्याचे नामदार पाटील यांनी सांगितले . यावेळी कणगर येथील भागडा चारी देखभाल दुरुस्तीसाठी येथील लाभधारक शेतकरी सुयोग नालकर , अनिल घाडगे , सोन्याबापु उ हे , दादासाहेब पवार , किशोर गागरे यांनी 1 कोटी 50 लाख निधीची मागणी नामदार पाटील यांचेकडे केली . यावर नामदार पाटील यांनी सदर प्रस्तावा बाबत औरंगाबाद येथील गोदावरी खोरे विकास महामंडळ अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क करुन सदर प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याची सुचना दिली असल्याचे सांगितले . प्रस्ताव प्राप्त होताच निधी त्वरीत मंजुर करण्यात येईल . असे यावेळी आश्वासित केले . यावेळी उर्ध्व प्रवरा ( निळवंडे -2 ) पाटबंधारे विभागातील अधिकारी तसेच जि . प . मा . अध्यक्ष बाबासाहेब भिटे , जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कपिल पवार , राष्ट्रवादी राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव , अमोल जाधव , अँड . अभिषेक भगत , नंदकुमार गागरे व परीसरातील लाभधारक शेतकरी सोपान हिरगळ बापुसाहेब गागरे , राजु सिनारे , संदिप गागरे , अनिल शिरसाठ , डॉ . रविंद्र गागरे , विनोद मुसमाडे , तुकाराम गागरे , मंगेश गाडे , जालिंदर मुसमाडे , सागर मुसमाडे , पांडुरंग गाडे , सुधीर गावडे आदि उपस्थीत होते .
Comments
Post a Comment