Posts

Showing posts from April, 2021

कोविड लस देताना प्राथमिक शिक्षक व नगरपालिका कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे* - *आप्पासाहेब ढुस*

Image
देवळाली प्रवरा/सार्वमंथन  कोविड लस देताना प्राथमिक शिक्षक व नगरपालिका कर्मचाऱ्यांना प्राधान्य क्रम द्यावा अशी विनंती देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले स यांना ईमेल द्वारे केली आहे.  व त्याची प्रत राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना पाठविली आहे.   जिल्हाधिकारी साहेबाना पाठविलेल्या ईमेल मध्ये ढुस यांनी म्हंटले आहे की, सध्या नगरपालिकेचे कर्मचारी, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांना घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य  तपासणी करण्याचे काम दिले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सर्व कर्मचारी काम करीत असताना त्यांना अद्यापही कोविड लस देताना प्राधान्यक्रम दिलेला नाही.   कोविडच्या फ्रंट लाईन मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लस देने आवश्यक असल्याने कृपया जिल्हा परिषदेचे सर्व प्राथमिक शिक्षक, नगरपंचायत, ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगार दिनाचे औचित्य साधून कोविड लस देनेचा निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना लस देताना प्राधा...

बँक कर्ज हप्ते थांबवा अन्यथा ५ मे.रोजी आंदोलन- देवेंद्र लांबे पाटील....

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा अखिल भारतीय छावा संघटनेचे नगर जिल्हाकार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसिलदार यांच्या माध्यमातून व ऑनलाईन अर्ज करुन व्यावसायिक कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावे व लॉकडाऊन काळात व्यवसायिक दुकानांचे लाईट बिल माफ करण्याची मागणी १५ एप्रिल२१ रोजी केली होती,परंतु सरकारने ३० एप्रिल २०२१ पर्यन्त कुठलाही निर्णय घेतलेला नाही. निवेदनात म्हंटले आहे की,सन २०२० या सालात करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे व्यापार्‍यांचे पूर्ण वर्ष नुकसानीत गेले होते.मागील वर्षाचा झालेले नुकसान भरून काढता काढता २०२१ लागले. सर्वसामान्य व्यापारी कसाबसा या परिस्थितीशी झुंज देत व्यवसाय करत होता. त्यात पुन्हा लॉक डाऊन पुकारल्या मुळे सर्व सामान्य व्यावसायिक पुर्णपणे हवालदिल झालेला आहे.सरकारच्या अवाहनाला दाद देत छोटे मोठे व्यापारी आपले व्यवसाय बंद देखील ठेवले आहेत. परंतु व्यवसाय बंद ठेवून देखील दुकानातील लाईट बिल,कामगारांचे पगार,जागेचे भाडे,व्यापारी देणे तसेच व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते भरावी लागणार आहेत.   व्यवसाय बंद असल्यानंतर व्यापा...

आपला प्लाझ्मा दिल्याने जर कोणाला जीवदान मिळत असेल तर त्या सारखे भाग्य नाही - आप्पासाहेब ढुस

Image
देवळाली प्रवरा/सार्वमंथन  आपला प्लाझ्मा दिल्याने जर कोणाला जीवदान मिळत असेल तर त्या सारखे भाग्य नाही.  तेंव्हा पात्र प्लाझ्मा दात्यांनी त्यांचा प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे विनंतीवजा आवाहन  आंतरराष्ट्रीय खेळाडू  आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे.  काल आप्पासाहेब ढुस यांच्या जीवनात  पहिल्यांदा प्लाझ्मा दान करण्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले की.. ,  अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या  राहुरी येथील एका कोरोना रुग्णाला तातडीने B +ve प्लाझ्माची आवश्यकता असून इच्छुक दात्यांनी पुढे यावे. असा संदेश सायंकाळी ५.०० च्या जवळपास सोसिएल मेडिया वर  वाचला आणि कोरोनाचे अशक्तपणामुळे झोपून असलेला  मी अंथरूणावर ताटकन उठून बसलो, आणि मनात पहिला विचार आला की, आपला प्लाझ्मा दिल्याने जर कोणाला जीवदान मिळत असेल तर त्या सारखे दुसरे भाग्य नाही.! लगेच नगरला निघणेची मानसिकता तयार करून मी आवरायला सुरुवात केली व त्या मेसेज खाली दिलेल्या फोन क्रमांकावर फोन केला आणि माझा प्लाझ्मा चालेल का?  ते डॉक्टर ला विचारून पहा म्हंटले.  पलीकडू...

स्वस्त धान्य मिळत नसल्याने नवीन रेशनकार्ड धारकांवर उपासमारीची वेळ - आप्पासाहेब ढुस

Image
देवळाली प्रवरा/सार्वमंथन देवळाली प्रवरा व लगतच्या बत्तीस गावांसह संपुर्ण राहुरी तालुक्यात नवीन रेशन कार्ड धारक नागरिक प्राधान्य कुटुंब योजनेत नसल्याने रेशन दुकानातील मोफत व स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असल्याने तातडीची उपाययोजना करणे कामी आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब, राज्यमंत्री प्रजक्तदादा तनपुरे, आमदार लहुजी कानडे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, प्रांत डॉ दयानंद जगताप व राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन दिले आहे.   ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,  कोरोना लॉकडाउनमुळे बहुतेक नागरिकांच्या हाताला काम नसल्याने या नवीन रेशन  कुपन धारकांची सर्व भिस्त स्वस्त धान्य दुकानातील धान्यावर अवलंबून आहे. तथापि प्राधान्य कुटुंब योजनेपासून हे सर्व नवीन रेशन कुपन धारक कुटुंबे वंचित असल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळत नाही. म्हणून आज लॉकडाउन काळात त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे.  राहुरी तालुक्याचा इष्टांक शिल्लक नाही, नवीन इष्टांक वाढवून मिळेपर्यंत ...

कोवीड सेंटरसाठीचे दरपत्रक, नियमावली जाहीर करा, गोर-गरीबांची लुट थांबवा; अन्यथा सपातर्फे आंदोलन - जोयफ जमादार

Image
श्रीरामपुर/सार्वमंथन वृत्तसेवा कोरोना महामारीने संपूर्ण देशात हांहाकार माजविला असून, त्यातच आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे, श्रीरामपूर तालुक्याततर वैद्यकीय सेवेच्या नावाखाली भरपूर खाजगी कोविड सेंटर निर्माण झाले आहेत, परंतू डिपॉझिटच्या नावाखाली गोर- गरीबांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्याचा गोरखधंदा सध्या यातील अनेकांनी मांडला आहे, पहीलेच लॉकडाऊनमुळे प्रचंड प्रमाणात आर्थिक टंचाईने भरडत असलेल्या लोकांच्या हाताला काम-धंदा नाही,मुबलक बेरोजगारीही वाढली आहे, यामध्ये कोविड सेंटरवाले महागडी औषधे, ऑक्सिजन आणावयास सांगत असल्याने लोकं सोने /मौल्यवान वस्तू गहाण ठेवून तर  कोणी व्याजाने पैसे घेऊन पूर्तता करत आहे, एवढे करून सुद्धा पैसे संपल्यावर कोविड सेंटरवाले सांगतात रुग्ण दुसरीकडे हलवा,अशातच पैशाअभावी दुसरीकडे ट्रीटमेंट न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत, त्यासाठी राज्य शासनाने खाजगी कोविड सेंटरसाठी जी नियमावली,जे दरपत्रक लागू केले आहे, ते त्यांनी कोविड सेंटरच्या बाहेरच दर्शनी भागावर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावेत, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना द...

मंत्री प्राजक्त तनपुरे ऑक्सिजन निर्मि तीमुळे ठरले संकटमोचन...

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा ऑक्सिजन हा संपुर्ण महाराष्ट्रात चर्चाचा विषय ठरला होता.मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑक्सिजन निर्मीतीची शक्कल लढवत यास पुर्ण विराम दिला आहे.वैद्यकिय सेवा देणारयांना भटकंती करावी लागत असल्याचे पाहून आपणच जर ऑक्सिजन निर्मिती केली तर असा  मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनात विचार आणला आण आता अहमदनगर जिल्ह्यात  ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे. आज अहमदनगर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.कोरोनाचे संकटात संपूर्ण राज्यभर ऑक्सिजनचा प्रचंड मोठा तुटवडा भासत आहे.  त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ४००  लिटर पर मिनिट ऑक्सिजन निर्माण करणारा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन ची कमतरता भासणार नाही.आणि रुग्णांना ऑक्सिजनसाठी वणवण फिराव लागणार नाही .गेले कित्येक दिवस जिल्ह्यात साधारण ४० टन ऑक्सिजन बाहेरून आणण्यात येतोय त्यामुळे हा प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला  आहे.  अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे मागील वर्षापा...

राहुरीत प्रभागनिहाय कोविड लसीकरण करण्यात यावे /भा ज पा युवा शहराध्यक्ष अजित डावखर

Image
राहुरी/ सार्वमंथन‌ वृत्तसेवा राहुरी शहरात प्रभागनिहाय कोविड लसीकरण करण्यात यावे अशी मागणी (भा.ज.पा.युवा शहराध्यक्ष अजित डावखर यांनी तहसिलदार यांना निवेदन देत मागणी केली आहे.  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असून त्याप्रमाणात कोविड लसीकरण कमी प्रमाणात झालेले आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा भाग आहे. राहुरी शहरात लसीकरण पूर्ण करण्यासाठी राहुरी शहरातील प्रत्येक प्रभाग निहाय कोविड लसीकरण करणे आवश्यक आहे. याकामी स्वयंसेवक म्हणून मदत करणे कामी भाजपा कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळे राहुरी शहरात त्वरित प्रभाग निहाय कोविड लसीकरण करण्यात यावे अशी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची  प्रत- १)माजी आ. शिवाजीराव कर्डिले  २)मां.खासदार सुजय दादा विखे-पाटील ३)वैद्यकीय अधिकारी, राहुरी ग्रामीण रुग्णालय, राहुरी. ४)मुख्यधिकारी, राहुरी नगरपरिषद.यांना‌‌ दिली‌ आहे.

पोलिसांची जनता देशी दारु दुकानावर कारवाई..

Image
राहुरी/सार्वमंथन वृतसेवा राहुरी शहरातील आझाद चौक परिसरामध्ये असलेल्या जनता देशी दारू दुकानातुन दारू विक्री होत असल्याने राहुरी पोलिसांनी या ठिकाणी जावुन सदर दुकानावर छापा टाकला . पोलिसांना पाहाताच ग्राहकांनी धुम ठोकली . या कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क ला अहवाल पाठवणार असल्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले . आज मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहरात पो . नि.नंदकुमार दुधाळ सह पो . कॉ . अदिनाथ पाखरे , किरण ठोंबरे , शिवाजी खरात आदिंच्या पथकाची पोलिसांची गस्त सुरू असताना दारू दुकानाबाहेर काही ग्राहकांची गर्दी असल्याचे निदर्शनास आले मात्र पोलिस गाडी पाहताच सदर ग्राहकांनी या ठिकाणाहुन धुम ठोकली मात्र पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलिसी खाक्या दाखवत माजी नगरसेवकाला चांगलेच खडे बोल सुनावले. सध्याच्या काळात गोरगरिबांना वैद्यकीय मदत लोकप्रतिनिधींनी करण्याचे सोडुन असे उद्योग करता का? असे पोलिस निरिक्षक दुधाळ यांनी दारू दुकानदारास सांगत चांगलीच कान उघडणी केली. जर कुनी शहरात व तालुक्यात हात भट्टी दारू विक्री केली तर याद राखा जेथे दारू विक्...

राहुरी येथे पिंजरयात बिबट्या कैद' वन खात्याचे कर्मचारी उशीरा आल्याने नागरीकांनी व्यक्त केली नाराजी..

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा नागरीकांच्या मागणी नुसार वन विभागाने लावलेल्या पिंजरयात बिबट्या अलगदपणे  अडकल्याची  घटना घडली आहे. राहुरी शहरातील नगर मनमाड रोड लगत एस आर हाॅटेल समोर सातभाई वस्ती परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजरयात बिबट्या अलगद अडकला मात्र बिबट्या पिंजरयात आडकवुन दोन तासाचा कालावधी उलटला असतांनाही वन विभागाचे कोणीही कर्मचारी घटनेच्या ठिकाणी फिरकले नाही. गेली अनेक दिवसापासुन या परिसरात बिबट्याने मोठा  उच्छाद मांडले होता. राहुरी पालिकेचे नगरसेवक गजानन सातभाई यांच्या मळ्यातील शेतकरयांच्या शेळी, बोकड बिबट्याने काही दिवसापुर्वी फस्त केल्या होत्या तसेच गेली अनेक दिवसापासुन या भागातील शेतकरयांची मागणी होती की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरया लावावा तोच दोन दिवसापुर्वी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता. आज सोमवार दि  १९.ऐप्रिल रोजी बिबट्या रात्री ७.वाजे दरम्यान पिंजरयात आडकल्याने या भागातील शेकरयांनी सुटकेचा निश्वास सोडला. पिंजरयात अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी येथे नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र दोन तासापेक्षा जास्त कालावधी झाला...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्याची क्रांतीसेनेची मागणी..

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा अहमदनगर जिल्ह्यात आजच्या कोरोना महामारीत रुग्णांची होत असलेली हेळसांड टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.  निवेदनात नमूद केले आहे की,अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक व आर्थिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असून या जिल्ह्यात रुग्णांची संख्या देखील अधिक आहे.परंतु या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी पुणे, औरंगाबाद व मुंबईस जात असतात. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.जर नगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तर अनेक रुग्णांना तज्ञ डॉक्टरांतर्फे आधुनिक उपचार, नवीन तपासणी यंत्रणेद्वारे अचुक निदान व कर्करोग निदान व इतर आजारांसंबंधी उपचार इत्यादी अनेक सुविधा जिल्ह्यातच प्राप्त होतील.       तसेच आजच्या काळात जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत.जर जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असते ...

राहुरी शहरासह विद्यापीठ, वांबोरी परिसरामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तहसील-पोलिस पथकाची धडक कारवाई.

Image
गोविंद फुणगे/ राहुरी सार्व मंथन  पंधरा दिवस जनता कर्फ्यू चा आदेश आल्यानंतर देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर उपविभागीय प्रांतअधिकारी दयानंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, राहुरी पालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे यांनी यांच्या संयुक्त पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. वांबोरी येथे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या देणाऱ्या सुधीर नागपाल या मेडिकल दुकानदारांवर पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.तर महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर असणाऱ्या फळ विक्रेत्यांवर देखील  दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. येथीलच असणा-या विद्यापीठात कॅनाल ला पोहणा-या तरुणावर देखील हि कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळपासून या संयुक्त पथकाने ठिकठिकाणी धडक कारवाई केली आहे.यापुढे देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे नागरीकांनी देखील नियमांचे तंतोतंत पालन करावे अन्यथा कारवाईला सामोरं जावं असा इशारा देखील या पथकाकडून देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध ; काय चालू व काय बंद राहणार!

Image
अहमदनगर/सार्वमंथन वृतसेवा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेत या बैठकीनंतर जिल्ह्यामध्ये नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करत कठोर निर्बंध लावण्याचे सांगत याबाबत जिल्हाधिकारी सुधारित आदेश काढतील असे सांगितले होते. पालकमंत्री यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा हद्दीमध्ये रविवार दि. 18 एप्रिलच्या रात्री 12 वाजल्यापासून ते शनिवार दि. 1 मे च्या सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर निर्बंध घातले आहेत. यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय व अस्थापना बंद असणार आहेत. मात्र काही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी निर्धारित वेळ देण्यात आला आहे. ही वेळ सकाळी 7 ते 11 अशी राहणार आहे. या आदेशानुसार किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री (फक्त द्वार वितरण), फळे विकी (फक्त द्वार वितरण), अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्रीची दुकाने, कृषी संबधित सर्व सेवा अथवा दुकाने, पशुखाद्य विक्रीची दुकाने, पेट्रोल पंपावर खाजगी वाह...

राहुरीत एस टी खड्ड्यात चालक जखमी प्रवासी बालबाल बचावले....

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा एस टी बसच्या चालकाचा स्टेरिंगवरिल ताबा सुटून बाजुला असलेल्या खड्ड्यात एस टि बस गेल्याने डस मधिल 12 प्रवासी सुखरुप तर चालक  किरकोळ जखमी झाल्याची घटना आहे. श्रीरामपूर -अहमदनगर  एस टी बसचा राहुरीतील नगर मनमाड रोड लगत सूर्या पेट्रोल पंप  महामार्गावर अपघात झाला आहे. बस मध्ये असलेले 12 प्रवासी सुखरूप असून वाहकास किरकोळ  जखम झाली आहे. घटनेची माहिती कळताच अपघाताच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके ,पो ना.शिवाजी खरात,पाखरे यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.राहुरी नगरपरिषेचे  अग्निशामन दलाचे जवान नंदू मोरे  सह अदिंनी मदत कार्य केले. अपघात झाल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

कुटुंबा समोर वडिलांना‌ मारहाण मुलगी वाद सोडविण्यासाठी गेली असता तिच्यावर‌ ‌ब्लेडने वार.. राहुरीतील घटना....

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा  पंकज खपके यांना आरोपी मारहाण करत असताना त्यांची पत्नी व मुली भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण करून ब्लेडने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे दिनांक 1 एप्रिल रोजी घडली आहे. पंकज दगडु खपके वय 43 वर्षे धंदा मजुरी, रा. लाख रोड टाकळीमियॉ ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. 1 एप्रिल रोजी सायं साडेसात वाजे दरम्यान फिर्यादी पंकज खपके त्यांच्या घरासमोर असताना आरोपी हे फिर्यादीचे घरासमोर मोटार सायकलवर बसून आले. आणि फिर्यादीस मारहाण करू लागले. यावेळी फिर्यादीची पत्नी व मुली मनिषा, सोनाली व प्रांजली हया घराबाहेर आल्या असता त्यांना पण आरोपींनी चापटीने व चप्पलाने मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीची मुलगी मनिषा हिला आरोपी पप्पु जगधने याने ब्लेडने डाव्या हाताच्या तळव्यावर मारहाण करुन शिवीगाळ केली. जाताना फिर्यादीस व फिर्यादीचे पत्नी मुलीना आरोपी म्हणाले कि, आता कमी मारहाण केली. नंतर जास्त मारहाण करु. अशी धमकी दिली. पंकज दगडू खपके यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आ...

महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात लागणार कडक निर्बंध, आरोग्यमंत्री राजेश टोपे ....

Image
महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यात लागणार कडक निर्बंध, ? आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई/सार्वमंथन वृत्तसेवारा ज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये निर्बंध लावण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत असताना त्यांनी हे संकेत दिले. सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे, मुंबई , ठाणे , नागपूर , नाशिक, ओरंगा बाद, नांदेड आणि अहमदनगर या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे.   केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 30 मार्चला पत्रकार परिषद घेऊन देशातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारी मधील टॉप टेन जिल्ह्यांची माहिती दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश होता. त्याचं आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचं राजेश टोपेंनी सांगितंलं. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. या अनुषंगाने संपूर्ण आढावा घेण्याचं काम ...