राहुरी खुर्द येथिल आरोग्य केन्द्रांत आज पासुन जेष्ठ नागरीकांना कोविड लस देण्यास सुरवात..... ना. तनपुरे

राहुरी खुर्द/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी खुर्द व गोटुंबे आखाडा हे गाव बारागाव नांदुर आरोग्य केन्द्रा पासुन लांब असल्याने नागरीकांना प्रवासाचा  त्रास सहन करावा लागेल तेव्हा लसी करण केन्द्र राहुरी खुर्द येथे घ्यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या कडे केली होती त्या नुसार नामदार तनपुरे यांनी  संबंधित खात्याला सुचना केल्याने राहुरी खुर्द येथिल आरोग्य केन्द्रांत आज पासुन जेष्ठ नागरीकांना कोविड लस देण्यास नामदार प्राजक्त  तनपुरे  यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला 
या वेळी मुळा प्रवरा विज संस्थेचे मा़जी संचालक अय्युब पठाण,गेणुभाऊ तोडमल,पंचायत समिति चे उपसभापति प्रदिप पवार,सतिष पावटे,बाळासाहेब चोपडे, उप सरपंच तुकाराम बाचकर, आंबादास साखरे,युवराज तोडमल ,आण्णा पा, तोडमल, पोलीस पाटील बबनराव आहीरे,, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ तोडमल, असफ पठाण, नरेन्द्र शेटे,बाळासाहेब कटारनवरे, योगेश कांबळे, राहुल पाटोळे, ग्रामसेवक संभाजीराव निमसे, सोमनाथ होले, अशोक जगधने, दतात्रय वाघ,अशोक वाघ आदी उपस्थितीत होते, 
आरोग्य केन्द्रा वर नागरीकांना सावलीची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सोशल डिस्टंटचे नियम  पाळुन  लस देण्यात आली, लस केन्द्रा वरील व्यवस्था पाहुन नामदार प्राजक्त  तनपुरे यांनी समाधान व्यक्त करुन लसी करणा बाबत नागरीकांची कुठली ही तक्रार येणार नाही याची काळजी घेण्यात यावी  अशी सुचना डाॅक्टरांना केली,

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....