शिर्डीच्या वाहतूक शाखेची लाचखोरी चव्हाट्यावर..! पोलीस दादा अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात.. ;
शिर्डी / विशेष सार्वमंथन साई नगरीतील शिर्डी वाहतूक शाखेत परराज्यातुन येणाऱ्या साई भक्तांना व सर्व सामान्य वाहनचालकांना वेठीस धरण्याचे काम सुरु असुन काही दिवसांपुर्वी शिर्डी वाहतूक शाखेबाबत वरिष्ठ अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सफशल दुर्लक्ष केल्याने अखेर हाप्ते घेणारा वाहतूक पोलिस दादा लाच स्वीकारतांना लाचलुचपतच्या जाळ्यात अलगद अडकल्याने शिर्डीच्या वाहतूक शाखेची लाचखोरी उघड झाली असुन यामधे वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यास आरोपी करावी अशी मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या विरोधात नाशिक अॅन्टी करप्शन कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे समजले आहे. याबाबत सविस्तर शिर्डी ते नगरसूल दरम्यान तीन खासगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे साडेतीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून काल मंगळवारी शिर्डी पोलीस स्टेशनसमोर साडेतीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक प्रकाश दशरथ पिलोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत ला...