राहुरी तालुक्यातील या गावात मतिमंद मुलीवर अत्याचार? पोलिसात छेडछाडीचा गुन्हा दाखल...स्थानिक राजकीय दबाव ? की पोलिस अंधारात?

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी तालूक्यातील पुढाऱ्यांच्या दबावामुळे मतीमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची गंभीर घटना विनयभंग दाखवून रफादफा करण्यात आली. मात्र बलात्कार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मिळविण्यासाठी राहुरी पोलिसात धाव घेतली आहे. 
राहुरी तालूक्यातील बाभुळगांव येथे एक कुटुंब शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यांना एक १४ वर्षीय मतीमंद मुलगी आहे. दिनांक ३१ मार्च रोजी ती अल्पवयीन मतीमंद मुलगी तीच्या घरी एकटीच होती. दुपारी तीन वाजे दरम्यान त्या मुलीचे वडील जेवण करण्यासाठी घरी गेले असता त्यांच्या मतीमंद मुलीवर विकास साहेबराव ससाणे हा तरूण बलात्कार करत होता. सदर घटना त्या मुलीच्या वडिलांनी समक्ष पाहिली. यावेळी त्यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन बलात्काराचा खुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी बाभुळगांव येथील काही गाव पुढाऱ्यांनी सदर पिडीत कुटुंबावर दबाव तंत्राचा वापर करून गप्प बसवीले. तसेच बलात्कार केलेला विकास साहेबराव ससाणे याचे त्या पिडीत मुलीशी लग्न लावून देतो. अशी समजूत काढून बलात्कारा सारखा गंभीर गुन्हा विनयभंग दाखवण्यात आला. असा आरोप पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. 
लग्न लावून देतो असे सांगितल्या नंतर लोकांनी दोन महिने घालवले. मात्र लग्न लावले नाही. आपल्या मुलीवर बलात्कार झाला तसेच आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या आई वडीलांनी आज दिनांक २६ मे रोजी राहुरी पोलिसात धाव घेऊन न्याय मागीतला. एकतर आमच्या मुलीशी लग्न करा किंवा बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिक्षा द्या. अशी मागणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. आता या कुटुंबाला तसेच त्या अल्पवयीन मतीमंद मुलीला कोण न्याय देणार. याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....