राहुरीत नगर आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाकडुन छापा मारत 150.कीलो गोमांस जप्त....राहुरीच्या गोमास मार्केटवर नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई नगरच्या पथकाने कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांनवर नामुष्की ओढवली....

राहुरीत नगर आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने  छापा मारत 150.कीलो गोमांस जप्त....

राहुरीच्या गोमास मार्केटवर नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई 
स्थानिक पोलिसांनवर नामुश्की ओढवली....

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्यात गोमांस विक्री करण्यास बंदी असताना देखील समिर पठाण हा राहुरी शहर हद्दीत दिनांक २१ मे रोजी गोमांस विक्री करताना आढळून आलाय . अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने त्याच्यावर कारवाई करून १५० किलो गोमांस व इतर मुद्देमाल ताब्यात घेतला आहे . महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांचे गोमांस कब्जात बाळगणे व विक्री करण्याची बंदी असतानाही राहुरी तालुक्यात गोमांस विक्री सुरू असल्याचे दिसून आले . 
दिनांक २१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजे दरम्यान समीर चाँद पठाण वय ४५ वर्षे राहणार खाटीक गल्ली , राहुरी . हा इसम गोमांस विक्री करताना मिळून आला . अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले . यावेळी त्याच्याकडून अंदाजे २२,५०० रूपये किंमतीचे १५० किलो गोमांस , ५०० रूपये किंमतीचा एक सुरा व एक लाकडी ठोकळा तसेच ५०० रूपये किंमतीचा एक छोटा लोखंडी वजन काटा असा एकूण २३,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय . तसेच समिर चॉद पठाण याला ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.
त्याकडुन एकूण २३,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . तसेच पठाण याला ताब्यात घेऊन गजाआड केले . स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील हवालदार शिवाजी ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत गुन्हा रजि . नं . व कलम - || 389/21 भादंवि कलम -369 , 34 महाराष्ट्र पशुसंरक्षण ( सुधारण ) अधिनियम सन 1995 चे कलम 5 ( क ) , 9 ( अ ) प्रमाणे समिर  पठाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .
राहुरीच्या भरवस्तीत असलेल्या खाटीक गल्ली परिसरात मटन मार्केट मधे  गोमांस विक्री होत असतांना जिल्हा स्थानिक गुन्हे  पोलिसांना याची गुप्त खबर लागते तर स्थानिक पोलिस प्रशासानास याची माहिती नव्हती का? असा सवाल नागरीकांनमधुन उपस्थित केला जात आहे.
नगरच्या पथकाने छापा मारल्याने स्थानिक पोलिसांची निषक्रीयता चव्हाट्यावर आली आहे.
सदर कारवाई हि नगर स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
संबधित ठिकाणी स.फौ.मन्सुर सय्यद,सचिन आडबल,रणजित जाधव,विनोद मासाळकर,मयुर गायकवाड यांनी छापा मारत स्थानिक पोलिस कर्मचारी शिवाजी खरात,मनोज राजपुत,एस.एस.शेख यांना माहिती देण्यात येवुन पंचांना बोलवुन कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई नगर स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गोमांस विक्रीच्या ठिकाणी  छापा मारत करण्यात आली.
तर या  घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मनोजसिंह राजपुत हे करीत आहेत. 


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....