राहुरी तालुक्यात अवैध दारु विक्री करणार्यावर पोलिसांची कारवाई......पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांची धडक कारवाई.....


वांबोरी,देवळाली प्रवरा,रेल्वे स्टेशन येथे पोलिसांचा छापा.

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा 
गेल्या काही दिवसांपासून राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी तालुक्यातील  अवैध दारू विक्री करणारयावर धाडसत्र सुरु केल्याने दारु अवैध दारु विक्री करणारयामधे चांगलीच खळबळ उडाली आहे
.दिनांक २५ मे रोजी तालुक्यातील वांबोरी, देवळाली प्रवरा, व रेल्वे स्टेशन या ठिकाणी दारु विक्री करणारयावर छापे मारी करत सुमारे तीन हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन मुंबई प्रो.का.कलम 65ई प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.. 
राहुरी तालूक्यातील अनेक गावांत तसेच राहुरी शहरात राजरोसपणे दारु विक्री सुरू आहे. सर्वत्र लाॅकडाऊन सुरु असताना दारू विक्री मात्र सर्रास सुरू आहे.
काही दारू दुकाने बंद करण्याची मोहिम पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे. दिनांक २५ मे रोजी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील वडारवाडा येथे राहुरी पोलिस पथकाने छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी आरोपी दादा दिंगबर डुकरे वय ३० वर्षे यास पकडले त्याच्याकडून ७२० रूपये किंमतीच्या १२ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार टिक्कल हे करीत आहेत. 
दुसरी कारवाई ही तालूक्यातील वांबोरी येथे केली. वांबोरी येथील सडे चौक परिसरात पोलिसांनी छापा मारला. यावेळी आरोपी परसराम नामदेव देवकर वय ४५ वर्षे. याच्या घरातून सुमारे १ हजार ४० रूपयांच्या २० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या घटनेचा तपास हवालदार ई.बी. आव्हाड हे करीत आहेत.
तिसरी कारवाई ही रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली. आरोपी अशोक मुरलीधर निकम वय ५२ वर्षे राहणार राहुरी स्टेशन, ता. राहुरी. याच्या ताब्यातून १ हजार रूपये किंमतीची १० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. देवळाली प्रवरा येथील आरोपी दादा दिंगबर डुकरे, वांबोरी येथील आरोपी परसराम नामदेव देवकर तसेच रेल्वे स्टेशन येथील आरोपी अशोक मुरलीधर निकम या तिघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून देशी व गावठी दारू असा एकूण २,७६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिन्ही घटनांचा तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....