शरिर संबंध ठेवुन अश्लील व्हिडिओ बनवून एक कोटींची खंडणी मागणाऱ्या महिलेसह एक जणास पोलिसांनी केले गजाआड.


राहुरी/नगर/सार्वमंथन वृत्तसेवा
शरिरसंबध ठेऊन आमीष दाखवत अश्लील व्हीडीओ बनवुन लाखोंचा गंडा घालणारे एका महिलेसह  एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
यामधे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या प्रकरणात पोलिस सुत्रांकडुन  दिलेल्या माहिती नुसार 26 एप्रिल 2021 रोजी या गुन्ह्यातील आरोपींनी संगणमत करुन शरिरसंबधाचे अमिष दाखवून त्यांचेतील महिलेसोबत शरिरसंबध ठेवण्यास भागपाडुन त्याचे अश्लील व्हीडीओ बनवला होता.
तसेच आम्हास एक कोटी रुपये आणुन दे नाहीतर सदर अश्लील व्हीडीओ हा पोलीसांना दाखवुन तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु अशी धमकी गुन्ह्यातील आरोपींनी दिली होती . सदर वेळी फीर्यादीच्या गळ्यात असणारे 5 तोळे वजनाची दोन लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन हातातील साडेसहा तोळे वजनाच्या 4 अंगठ्या व रोख रक्कम 84300 / - रुपये असा एकुण 544300 / -रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी नामे अमोल सुरेश मोरे ( रा . कायनेटिक चौक याच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे .
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक  मनोज पाटील .अपर पोलीस अधिक्षक. सौरभ कुमार अग्रवाल, . उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप नगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत .दि .15 मे 2021 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप यांनी पोलीस पथकासह जखनगाव परिसरात राहणारी आरोपी महिला हिस ताब्यात घेवुन तीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा हा तिने व तिचा साथीदार यास सोबत घेवुन गुन्हा केल्याची कबुली दिली असता तिचा साथीदार यास तात्काळ ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.सदर महिलेने सदरची चेन ही भिगार अर्बन बँक येथे तिने तिच्या भावाच्या नावे गहाण ठेवली होती ती बँक मधुन ताब्यात घेण्यात आली आहे.तसेच तिच्या घरामधे सदर गुन्ह्यातील अंगठी व रोख रक्कम 69,300 / -रुपये जप्त करण्यात आली व तिचा साथीदार याचेकडुन गुन्ह्यातील 15 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलिस करत आहे.


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....