Posts

Showing posts from March, 2021

तिथी प्रमाणे राहुरीत शिवसेनेच्यावतीने शिवजयंती साजरी/ जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत संपन्न...

Image
राहुरी /सार्वमंथन वृत्तसेवा   तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्या जयंती निमित्त राहुरी शहरातील शनि चौकात जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,माजी खा.प्रसाद तनपुरे,फेडरशेनचे राज्य अध्यक्ष सुरेश वाबळे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब मुसमाडे ,युवा सेनेचे ता. अध्यक्ष गणेश खेवरे,भाजपाचे मा.अध्यक्ष साहेबराव म्हसे,जिल्.आ परिषेदेचे सदस्य धनराज गाडे, शिवसेनेच शहर प्रमुख कैलास शेळके, सुनिल हिवाळे, प्रमोद आढाव, पत्रकार राजेद्र वाडेकर,अनिल कोळसे सुभाष कडु ,रामभाउ सगट,रुषी सिरसाट,दत्तात्रय कोकाटे,संकेत खेवरे,भरत धोत्रे अदिसह छत्रपतींच्या  पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन साजरी करण्यात आली.

समाज प्रभोधनकार इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल

Image
                                                                                संगमनेर/सार्व मंथन वृत्तसेवा प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत या प्रकरणी त्यांच्यावर न्यायालयात खटला सुरु होता. संगमनेर सत्र न्यायालयाने यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सदर वक्तव्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेरच्या दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. इंदोरीकर महाराज यांनी केलेलं वक्तव्य कोणतीही जाहिरात नव्हती त त्यास ग्रंथाचा आध...

घारगावच्या पोलिस ठाणेतील दचाकी वाहनांचा लिलाव संपन्न...... संगमनेरचे पोलिस उपधिक्षक राहुल मदने यांनी केले बोलीचे तिनवार..

Image
संगमनेर/सार्वमंथन वृत्तवेध संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाणेत दुचाकी स्कॅर्प वाहनांचा लिलाव संपन्न झाला यामधे तब्बल ५३ वाहनांचा लिलाव करण्यात आला. तर ५२ लिलाव धारकांनी सहभाग घेतला होता. घारगाव पोलिस ठाणेत बेवारस असलेल्या वाहनांच्या लिलाव प्रक्रीयेत पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांनी सर्व नियम व अटी लिलाव धारकांना वाचुन दाखवुन लिलावास सुरवात केली यामधे आर टि ओ कार्यालयातुन आलेल्या मुल्यंकन दिल्या नुसार १लाख ६४ हजार ६०० रूपये सर्व वाहनाची रक्कम ठरविण्यात आली होती. या लिलाव प्रसंगी संगमनेर पोलिस उपधिक्षक राहुल मदने,घारगाव पोलिस ठाणेचे पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला  लिलावास पहिली बोली राहुरीचे संजय प्रकाश जाधव यांनी लावली तर या नंतर अनेकांनी लिलावात सहभाग घेतला होता.सदर लिलावातीव ५३ वाहने नगर येथिल भंगारचे व्यापारी सलिम भाई यांनी २ लाख १५ हाजारास घेतला या लिलावात संगमनेर,श्रीरामपुर,कोल्हार,लो णी,आळेफाटा,भिंगार,शेंडी, अहमदनगर,ओझर,राहाता,राहुरी साकुर नगर, श्रीगोंदा ,बेलापुर, कोपरगाव, शिरुर,महालगाव,पुणे,औरांगाबाद, बुलढाणा अदि ठिकाणच्या भंगार ...

राहुरीतील विद्यामंदिर शाळे जवळील चप्पल दुकान व्यापारयास जातीवाचक शिविगाळ पोलिसात गुन्हा दाखल...आरोपी अद्याप पसार

Image
राहुरी/ सार्वमंथन वृत्तवेध  राहुरी शहरात विद्यामंदिर शाळे लगत चप्पल दुकान व्यापारयास तिघांनी जातिवाचक शिविगाळ करत दमबाजी केल्याची घटना घडली असुन पोलिस ठाणेत याबाबत अनुसुचित जाती जमाती नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झाली नसल्याचे पोलिस सुत्राकांडुन समजले आहे. राहुरी शहरातील विद्यामंदीर शाळा जवळ चप्पलच्या दुकान गाळ्याच्या जून्या भिंतीची डागडूजी करत असताना दुकान मालक साखला यांना बिहाणी बंधुनी येवुन जातिवाचक शिविगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. जातीवाचक शब्द वापरल्याने  तिघां  बिहाणी बंधुवर अनुसूचित जाती जमाती कायदा कलम नूसार गुन्हा दाखल करण्यात आला . राहुरी शहरातील विद्यामंदीर शाळे जवळ साखला फुट वेअर नावाचे दुकान आहे. या दुकानचा मालक मिलिंद नंदकिशोर साखला हे दिनांक २६ मार्च रोजी विद्यामंदीर शाळे जवळील साखला फुट वेअर दुकानाच्या पाठीमागील भिंतीची डागडुजी करत होते . यावेळी १ ) सुरज सतिष बिहाणी २ ) मनोज अशोक बिहाणी ३ ) अनुप अशोक बिहाणी सर्व रा . राहुरी बु . ता . राहुरी हे त्या ठिकाणी आले . आणि फिर्यादी व त्याचा भाउ मनोज यास तुम्ही भिं...

राहुरीत घर मलाकाला न सांगता मावशी घर घुसली कशी घुसली तर म्हणे माझे घर आहे........ती मावशी कुठली?

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तवेध बिल्डींगमधल्या खोलीवर कब्जा करुन एका ' मावशी'ने कोरडे नावाच्या वृद्धाला पोलिसात छेडछाडीची खोटी तक्रार देवून तुला जेलमध्ये बसविल , अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे . याप्रकरणी राहुरी शहरात तनपुरे गल्ली भागात राहणारे विजय रंगनाथ कोरडे , वय वर्ष ८० यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी महिला सुभद्रा उर्फ (मालन मावशी) दगडू वाढेकर , हल्ली रा.मल्हारवाडी रोड , कोरडे बिल्डींग , राहुरी हिच्याविरुद्ध भादवि कलम ४५४ , ४५२ , ४४८ , ३२३ ,५०४ , ५०६ प्रमाणे गु.र.नं २४८ दाखल करण्यात आला असून विजय कोरडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की ,  ४ च्या सुमारास आरोपी महिलेने माझी मालकीची मिळकत लुबाडण्यासाठी माझ्यामालकीचे मिळकतीमधील कोरडे बिल्डींग येथील चौथ्या मजल्यावरील दक्षिण बाजूची पूर्वेकडील २ नंबर खोलीस मी लावलेले कुलूप माझे संमतीशिवाय तोडून घरात अनाधिकृतरित्या प्रवेश करुन वास्तव्य करीत असल्याने याबाबत सुभद्रा उर्फ मालन मावशी हिच्याकडे कोरडे यांनी विचारणा केली असता मालन मावशी म्हणाली की , तुझा मला बोलायचा काही एक संबंध नाही , ही जागा माझी आहे . मी येथेच रा...

राहुरीच्या या भागात महिलेची छेडछाड पोलिसात गुन्हा दाखल ..आरोपी पसार

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तवेध तु मला फार आवडते असे म्हणुन विवाहित असलेल्या ३० वर्षिय शिक्षिकेच्या अंगावर पडुन तिच्या तोंडाचे चुंबन घेवुन विनयभंग केल्याची घटना राहुरीत घडली असुन पोलिस ठाणेत ३० वर्षिय महिलेने गुन्हा रजि नंबर २४९/२०२१ भादवी कलम ३५४ ब,४५२ प्रमाणे संतोष शिवलाल धनवडे राहणार जोगेश्वरी आखाडा याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेचे कळताच आरोपी फरार झाला. फिर्यादी हि आपल्या घराच्या किचन मध्ये स्वयपाक करीत होती तसेच फीर्यादीची सासु ,जाव,मुले हे घराच्या वरील खोली मध्ये होते . त्यावेळी फिर्यादी. किचन मध्ये कामात असताना तिस आवाज आला की घरात कोणी आहे का असा आवाज आल्याने पडित किचन मधुन घराच्या दरवाज्यात आले . तेव्हा पाहीले असता आमच्या गावातील ओळखीचा संतोष शिवलाल धनवडे राहणार जोगेश्वरी आखाडा हा आमच्या घराच्या दरवाज्यात उभा दिसला . त्यावेळी पिडीताने त्यास विचारले की काय काम आहे तेव्हा आरोपी म्हणाला की तुझा नवरा व दिर कोठे आहे. असे म्हणाला असता ती त्यास म्हणाले की ते बाहेर गेले. आहे . तुझी सासु कोठे आहे ? तेव्हा  पिडित त्यास म्हणाली की ...

राहुरीत मायक्रो फायनंन्स कंपनीकडुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली.... प्रशासन कारावाई करणार का?जनतेत चर्चा..

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तवेध मायक्रो फायनंन्स च्या महिला बचत गटाकडून शासनाने घालुन दिलेल्या कोरोनाच्या नियमाला हरताळ फासले जात असल्याचा प्रकार समोर आला असुन याषठिकाणीससोशल डिस्टन्सिंग तर नाहीच मात्र तोंडाला मास्क पण नाही, सदर प्रकरामुळे महिला बचत गटांची  बैठक असलेल्या आजु बाजुच्या नागरीकांनी प्रशासना बाबत संशय व्यक्त केला आहे. सबंधित ठिकाणी पोलिस,नगरपालिका,व तहसिलच्या  प्रशासनाने कारावाई करावी अशी मागणी होत आहे. एकीकडे महाराष्ट्र राज्य शासन कोरोना बाबत सर्व स्तरातुन जनतेमधे कोरोना संसर्ग वाढवु नये याबाबत जनजागृती करत असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरी खाजगी महिला बचत गट फायनन्स कंपन्याकडुन अहमदनगर जिल्हा अधिकारयांनी घालुन दिलेल्या नियमाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.  तालुक्यात तहसिलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी तर शहरातील नगरपारिषेद प्रशासन ठिक..ठिकाणी जावुन कोरोना संसर्ग बाबत जनजागृती  करत आहे. शासनाने घालुन दिलेले नियम मोडणारयावर प्रशासन फिरुन कारवाई करत दंड आकारत आहे. राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी मायक्रो फायनन्सचे जाळे पसरले आहे.यामधे स्थानिक मह...

नोकरीला लावुन देतो म्हणुन बीडच्या महाराजासह पाथर्डीच्या दोन शिक्षकाने राहुरीच्या पोस्ट खात्यातील सेवा निवृत्त कर्माचारयाची 5 लाखाची केली फसवणुक...पोलिसात होणार गुन्हा दाखल...

Image
राहुरी-पाथर्डी /सार्वमंथन वृत्तवेध. राहुरी येथील पोस्ट खात्यातील सेवा निवृत्त कर्मचारयाच्या मुलाला शिक्षण शिक्षण संस्थेत नोकरी लावुन देतो असे म्हणुन ५ लाखाला फसविल्याचा प्रकार समोर आला असुन याबाबत लवकरच पोलिसात गुन्हा होणार आहे.संबंधिताची फसवणुक झाल्या बाबत सर्व पुरावे पोलिसांनी देणार असल्याचे सेवानिवृत्त कर्मचारयाने सांगितले आहे.  सेवा निवृत्त कर्मचारी हे शेवगाव येथे पोस्ट विभागात  कर्माचारी होते. त्यांना बीड येथिल मठातील एका महाराजाने काही शिक्षकांना हाताशी धरून संस्थेत शिक्षकाची नोकरी लावून देतो म्हणून एका सेवानिवृत्त पोस्टातील कर्मचाऱ्याला ५ लाखाला गंडा घातला असल्याचे समजले आहे.. येथील पोस्टखात्यातील सेवानिवृत्त ढगे नामक व्यक्तीने आपल्या मुलाला नोकरीला लावण्यासाठी मठातील महाराज , कदम व जायभाय नामक शिक्षकांना ढगे यांनी आपल्या मुलाला नोकरी लागावी म्हणून पाच  लाख रुपये 2017 साली दिले.. आज नोकरी लावतो उद्या लावतो पुढच्या महिन्यात लावतो थोडे थांबा नियोजन चालु आहे,असे म्हणुन चाल ढकल पणा केला .तसेच  वारंवार  दिलेल्या रकमेची मागणी करूनही संबं...

कमलबाई चोथे यांचे निधन

Image
राहुरी/ सार्व मंथन वृत्तवेध राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथील सौ कमल केरुजी चोथे यांचे नुकतेच  अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कमलबाई या अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्या अहमदनगर जिल्हा पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम पतसंस्थेचे संचालक श्री केरुजी चोथे पा यांच्या पत्नी व राहुरी येथील विघ्नहर फाउंडेशन चे डॉ गौरव चोथे व आप्पासाहेब चोथे यांच्या  मातोश्री होत्या.

दिव्यांगांना विनोद अंत्योदय राशन कार्ड द्या शिवसेना अपंग सेल ची मागणी

Image
राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा दिव्यांगांना दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय चे रेशन कार्ड  ७  दिवसाचे आत विनाविलंब देण्यात यावे या या मागणीचे निवेदन राहुरीचे तहसीलदार योग दिन शेख यांना शिवसेना अपंग सहाय्यसेनेचे वतीने देण्यात आले आहे . यावेळी राहुरी तालुका अघ्यक्ष संजय शामराव  झांबरे व सौ.सुनिता संजय  झांबरे शिवसेना अपंग सहाय्य सेना महिला आघाडी प्रमुख व शिव सैनिक रवींद्र भुजाडी , वैभव भालेराव, राजेंद्र पवार, आशाताई पवार, व  शिवसेना अपंग सहाय्य सैनिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, आपले कार्यालय व पुरवठा विभागात अपंगांचे रेशन कार्ड तयार झाले असुन ते अपंगांना मिळत नसुन अपंग बंधु-भगीनी हे वारंवार पुरवठा विभागात चकरा मारत असुन त्यांना दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय कार्ड बाबत उडवा उडवी ची उत्तरे  संबंधित विभागाकडुन मिळत  आहेत, सबंघित विभागाकडुन अपंगांची हेळसांड होत असुन सबंघित विभाग अपंगाच्या विविध प्रश्नाबाबत उदासिनता दाखवत आहे. तरी आपण अपंगाच्या प्रश्नाबाबत स्वतः लक्ष घालून अपंगांना ७  दिवसाच्याआत अपंगांना  दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय...

राहुरीच्या युवकाची लोणी येथे दगडाने ठेचुन खुन

Image
राहुरी खुर्द येथे तणावपुर्ण वातावरण/मयताचा फोटो राहुरी/सार्वमंथन वृत्तवेध राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथिल १९ वर्षिय युवकाची लोणी परिसरात दगडाने ठेचुन हत्या करण्यात आली असुन मयताचे मेव्हणे गोरख अशोक बर्डे यांनी लोणी पोलिस ठाणेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. अजुन यामधे कोण ...कोण आरोपी आहे याचा छडा पोलिस लावत आहे. सदर पकडलेले आरोपी हे राहुरी खुर्द येथिल आहे. मयत अर्जुन अनिल पवार वय वर्ष १८ राहणार राहुरी खुर्द यास आरोपी दिपक विजय डोळसे,विठ्ठल (उर्फ भिवा) कैलास कावळे,दोघे राहणार राहुरी खुर्द यांनी  मयतास  नाजुक प्रकरणातुन खुन केला असावा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत  समजलेले माहिती अशी की  मयत व आरोपी हे एकाच गावातील रहिवाशी आहेत. यांचे कुठल्यातरी कारणातुन वाद झाले होते. मयत पवार यास वरिल आरोपींनी कट कारस्थान रचुन मद्य प्रशान करुन लोणी भागात नेवुन तेथे पुरावा नष्ठ करण्याच्या हेतुने डोक्यात दगड घालुन खुन केला. मयताची ओळख पटवु नये या हेतुने डोक्यात दगड टाकुन चेंदामेदा करण्यात आला होता. सदर घटना का...

राहुरीत रस्त्यालगत तरुणीच्या डोक्यात दगड घालुन खुन/हातावर लिहले सितल बोटावर लिहले S P..पोलिस छडा लावत आहे,

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा फोटो- अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे,पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके, पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे,पोलिस उपनिरिक्षक गणेश शेळके अदि दिसत आहे. डोक्यात घातलेला दगड, घटनेच्या ठिकाणी पोलिस पथक मृतदेह तपासणी करतांना  राहुरी कारखाना नगर मनमाड रोड लगत गुंजाळ नाक्याजवळ चिंचविहीरे हाद्दित एका २१ ते २४  वर्षिय अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना आज दि.१५ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. अज्ञात सदर घटनेमुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली असुन पोलिस खुन करणारयाचा छडा लावत आहे. घटनेच्या ठिकाणी  रक्ताने माखलेला एक मोठा दगड, मयत तरुणीचे  नकली कानातील व डोक्याची क्लिप असे आढळुन आले आहे. घटनेची माहिती कळताच अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे,पोलिस उपधिक्षक संदिप मिटके,पोलिस निथिक्षक हनुमंत गाडे,पी एस आय गणेश शेळके,निलेशकुमार वाघ, मधुकर शिंदे,पोलिस कॉन्स्टेबल , उत्तरेश्वर मोराळे , दिनेश आव्हाड ,जानकीराम खेमनर , अण्णासाहेब चव्हाण , जालिदंर साखरे, वैभव साळवे,गृहरक्षक दलाचे सचिन पवार ,यासह...

देवळाली प्रवरा येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेची अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांच्याकडून पाहणी

Image
राहुरी \ सार्वमंथन  मंथन वृत्तवेध  दि. १५ मार्च देवळाली प्रवरा येथील नियोजित पोलीस ठाण्याच्या जागेची आज सोमवार  दि. १५ मार्च २०२१ रोजी स. ११.०० वा. श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे मॅडम यांनी पाहणी केली.  देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती साठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक डॉ प्रताप दिघावकर, श्रीरामपूर चे आमदार लहुजी कानडे यांची वेळोवेळी भेट घेऊन तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून देवळाली प्रवरा येथील स्वतंत्र पोलीस स्टेशन प्रश्नी केलेल्या पाठपुराव्याला आज काही अंशी यश आले.  आप्पासाहेब ढुस व शिस्टमंडळाने केलेल्या मागणीनुसार विधानसभेत आमदार लहूजी कानडे यांनी अधिवेशनात नुकताच प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने आज  श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे  यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेसह देवळाली प्रवरा येथील नवीन पोलीस ठाण्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जागेंची पाहणी केली. या मध...

उद्योजकाने महाराजांना दिले व्हिलचर

Image
राहुरी/ सार्व मंथन वृत्तसेवा  राहुरी फॅक्टरी येथील उद्योजक नरेंद्र चव्हाण व सुधीर पठारे यांच्या वतीने वाघाचा आखाडा येथील दोन्ही पायाने दिव्यांग असणारे ह.भ.प. साहेबराव जाधव यांना नवीन  व्हीलचेअर देण्यात आली. नरेंद्र चव्हाण मित्र मंडळ सामजिक बांधिलकी जोपासत समाजातील दिव्यांगासाठी काम करत असतात. या वेळी चव्हाण यांनी सांगितले की, असे काही समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आम्ही कधीही माघे राहणार नाही. आमचा सहभाग नेहमीच राहील. यावेळी राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त सांगितले की,  आपल्या राहुरी तालुक्यात दिव्यांगांसाठी सहकार्य करणारे बऱ्याच संघटना आहेत त्याचे कायमच सहकार्य असते .कोरोणा काळात सर्वांच्या सहकार्यामुळे 250 दिव्यांगांसाठी जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. वाघाचा आखाडा येथील मंदिरातील पुजारी साहेबराव जाधव दोन्ही पायाने दिव्यांग आहे ते 20 वर्षापासून मंदिरात सेवा करतात. त्यांना कोणीही नातेवाईक नाही. आज पर्यत त्यांना कोणता शासकीय लाभ घेता आला नाही. कारण त्यांना  रेशनकार्ड नव्हते प्रहार संघटनेच्या पदाधिकारी मधुकर ...

रेखा जरे हत्याकांडातील फरार बोठेला अखेर पोलिसांनी केले जेरबंद..

Image
अहमदनगर/सार्वमंथन वृत्तसेवा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. हैद्राबाद येथील गुहेतून त्याला शनिवारी पहाटे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. गत तीन महिन्यापासून बोठेने पोलिसांना गुंगारा दिला होता. पोलिसांनी बोठे यास ताब्यात घेतले असून नगरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, बोठे याच्या संपर्कात असलेल्या पाईपलाईन रस्त्यावरील लॉटरी विक्रेता महेश तनपुरे याच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.  सुमारे साडेतीन महिन्यांपासून बोठे फरारी होता. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकूनही पोलिसांना तो सापडत नव्हता. शेवटी हैद्राबाद भागात तो असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन करून त्या भागात पाठविली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बो...

परप्रांतीय महिलेची छेडछाड प्रकरणी एक जण निर्दोष ..अॅड संसारे

Image
राहुरी / सार्व मंथन वृत्तसेवा काही महिन्यांपूर्वी शिर्डी शिंगणापूर दर्शनासाठी आलेल्या एका पर प्रांतीय महिलेला गौतम विनायक दुशिंग यांनी मारहाण करुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप करण्या त येऊन पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . राहुरी न्यायालयात या गुन्ह्याचा नुकताच निकाल लागला असून गौतम दुशिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली . या बाबत सविस्तर हकीकत अशी की , दिल्ली येथील परप्रांतीय महीला तिचे नातेवाईकासह शिर्डी व शिंगणापूर येथे दर्शनासाठी आली होती . सदर महिलेने शिर्डी वरून शिंगनापूर येथे दर्शनाला जाण्यासाठी आरोपी गौतम विनायक दुशिंग यांची गाडी ठरवली होती . त्यानुसार शिंगनापूर येथून परत येताना ब्राम्हणी गावाचे शिवारात शनिशिगंनापूर ते राहूरी रस्त्यावर एका हॉटेल लगत फिर्यादी महीलेने आरोपी चालकास गाडी हायवे रोड ने घे असे म्हटले , याचा राग येउन आरोपीने हायवे ने गाडी घेण्यास नकार देउन फिर्यादी महीलेच्या तोंडात चापट मारुन लाथाबुक्याने मारहान करुन लज्जा उत्पन्न होइल असे वर्तन केले व फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे मारण्याची धमकी दिली . यावरून फिर्यादी महिलेने र...

राहुरीत प्रेमयुगलास नातेवाईकांनी पकडत धुतले.

Image
राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा स्पेशल रिपोर्ट.. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील  नगर - मनमाड रोड लगत एका हाॅटेलातुन प्रेमयुगल जोडप्याला वाहनातुन 30 ते 40 जणांच्या टोळक्याने येवुन मारहाण करत त्यांना गाडीत टाकुन दोघांना नगर दिशाने वाहनाचे नेल्याचे समजले आहे. प्रेम युगल हे दोन वेगवेगळ्या समाज्याचे असल्याचे बोलले जात होते. राहुरी शहरातील नगर मनमाड रोड लगत एका लाॅजवर हे प्रेम युगल चाळे करण्यासाठी थांबले असल्याचे मुलीच्या नातेवाईकास खबर लागली असता मुलीचे नातेवाईक त्या ...हाॅटेल लाॅजवर आले. दोघांना रंगेहात पकडले मुलगी हि अल्पसंख्यक तर मुलगा मातंग समाज्याचा असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळु शकते सदर तरुण हा कोल्हार भागातील असल्याचे समजले तर मुलगी हि नगर येथिल रहिवासी असल्याचे माहिती मिळाली आहे. राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्ग रोड लगत एका शाहिन.. असलेल्या लाॅजमधे हि घटना घडल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. या युवक व युवतीच्या जिवीतास धोका तर नाही ?अशी चर्चा सुरु आहे. शहरात आठवड्याभरापूर्वी बसस्थानकासमोरीललॉजवर पोलीस छापा मारत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला व काही ग्राहकांना...

राहुरी तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या स्वयम् अर्थसहाय्यित शाळा संस्थाचालकांची सहविचार सभा खेळीमेळीत पार...

राहुरी/सार्व मंथन वृत्तसेवा राहुरी तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या स्वयम् अर्थसहाय्यित शाळा संस्थाचालकांची सहविचार सभा खेळीमेळीत पार... राहुरी तालुक्यातील सर्व इंग्रजी व मराठी माध्यमाच्या स्वयं अर्थ सहित शाळा संस्थाचालकांचे नुकतीच सहविचार सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते अष्टविनायक स्कुल चे  श्री. मोहिणीराज होन सर यांची निवड करण्यात आली सभेच्या प्रमुख विषयांपैकी एक सर्वप्रथम तालुका कार्यकारणीची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये ज्ञानवर्धिनी स्कूल गुहाचे ज्ञानदेव शेलार यांची अध्यक्ष,  सौ बनकर मॅडम यांची उपाध्यक्ष तर सचिवपदी अष्टविनायक स्कूल तांदुळवाडीचे मोहनीराज होन यांची सचिव तसेच ग्लोबल स्कूल राहुरीचे प्रा. रामकृष्ण ढोकणे सर यांची सहसचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.   या बैठकीत स्वयं अर्थसहाय्यित शाळांना कोरोना काळात आलेल्या विविध आर्थिक अडचणी, शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच 25% आर टी ई ऍडमिशन प्रतिपूर्ती ही गेल्या चार वर्षापासुन दिली गेली नाही. शासन स्तरावरुन कुठल्याही हालचाली दिसत नाही, या कोविड 19 च्या काळामध्ये या प्रति...

आमदार कानाडेंनी दिलेला शब्द पाळला ,पोलिस स्टेशनचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला ./आप्पासाहेब ढुस

Image
देवळाली/सार्व मंथन वृत्तसेवा श्रीरामपूर विधानसभेचे विद्यमान आमदार लहुजी कानडे साहेब यांनी आज विधानसभेत देवळाली प्रवरा पोलिस ठाण्याचा प्रश्न उपस्थित करून दिलेला शब्द  खरा केला त्याबद्दल आप्पासाहेब ढुस यांनी आमदार कानडे यांना दूरध्वनी करून आभार व्यक्त केले.  पुरवणी मागण्या वरील चर्चेत काल विधानसभेत बोलताना आमदार कानडे श्रीरामपूर तालुक्यातील प्रश्न पोट तिडकीने मांडताना दिसले. त्याबद्दल आमदार साहेबांना दूरध्वनी करून  देवळाली प्रवरा सह ३२ गावांच्या प्रश्नाकडे ढुस यांनी लक्ष वेधले होते.  देवळाली प्रवरा साठी स्वतंत्र पोलीस ठाणेस मंजुरी, ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील  भुयारी मार्ग,  तसेच नागरपालिके मागील आणि प्रसादनगर झोपडपट्टी धारकांच्या जागेचा प्रश्न,  एसटी स्टँड, आणि   तुकडेबंदी सारख्या महत्वाच्या प्रश्नांवर आमदार लहुजी कानडे साहेब यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करावेत अशी विनंती ढुस यांनी केली होती.  विधानसभेत पुन्हा बोलण्याची संधी मिळाली तर वरील सर्व प्रश्न नक्की उपस्थित ...

अखेर आमदार कानडे यांनी दिलेला शब्द पाळला..! - आप्पासाहेब ढुस

Image
देवळाली/सार्व मंथन वृत्तसेवा श्रीरामपूर विधानसभेचे विद्यमान आमदार लहुजी कानडे साहेब यांनी आज विधानसभेत देवळाली प्रवरा पोलिस ठाण्याचा प्रश्न उपस्थित करून दिलेला शब्द  खरा केला त्याबद्दल आप्पासाहेब ढुस यांनी आमदार कानडे यांना दूरध्वनी करून आभार व्यक्त केले.  पुरवणी मागण्या वरील चर्चेत काल विधानसभेत बोलताना आमदार कानडे श्रीरामपूर तालुक्यातील प्रश्न पोट तिडकीने मांडताना दिसले. त्याबद्दल आमदार साहेबांना दूरध्वनी करून  देवळाली प्रवरा सह ३२ गावांच्या प्रश्नाकडे ढुस यांनी लक्ष वेधले होते.  देवळाली प्रवरा साठी स्वतंत्र पोलीस ठाणेस मंजुरी, ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरील  भुयारी मार्ग,  तसेच नागरपालिके मागील आणि प्रसादनगर झोपडपट्टी धारकांच्या जागेचा प्रश्न,  एसटी स्टँड, आणि   तुकडेबंदी सारख्या महत्वाच्या प्रश्नांवर आमदार लहुजी कानडे साहेब यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करावेत अशी विनंती ढुस यांनी केली होती.  विधानसभेत पुन्हा बोलण्याची संधी मिळाली तर वरील सर्व प्रश्न नक्की उपस्थित ...

उर्जा मंत्र्यानी राजिनामा द्यावा - क्रान्तीसेनेचे मधुकार म्हसे यांनी केली मागणी..

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर ऊर्जामंत्री पदाचा राजीनामा देऊन पदमुक्त व्हावे,अशी मागणी ईनिवेदनाद्वारे अखिल भारतीय क्रांतीसेना व शेतकऱ्यांनी केली आहे.  ईनिवेदनात म्हटले आहे की,उर्जामंत्री नितीन राऊत यांनी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी ट्विटरवर ट्विट करत महावितरण कंपनीच्या १५ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकाचा संदर्भ देत कृषीपंप धारकांची थकबाकी सप्टेंबर 2020 च्या बिलात गोठवण्यात आली असून,यासाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये,असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही महावितरण कंपनीकडून कृषीपंपाला विद्युत पुरवठा करणारे रोहीत्र बंद करून वीजपुरवठा खंडित केला जात आहे.त्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करत शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीजबिल वसुलीसाठी रोहीत्र बंद करून पठाणी वसुली चालु ठेवलेली आहे.आधीच शेतकरी कोरोना,अतिवृष्टी यामुळे मेटाकुटीला आलेला असताना आता पाणी उपलब्ध असताना देखील विजेअभावी पिके जाळायला लागली आहेत.तसेच महावितरण कंपनीकडुन कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे कृषीपंप चालत नसुन नुकसानीचे प्रमाण ...