आता तर महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची चर्चा सरकार पावले उचलत आहे.....जिल्हाधिकारी डाॅ भोसले

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
महाराष्ट्रामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे . अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण फैलावले असून रुग्णसंख्या रोज वाढत असताना दिसत आहे . आता तर महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची चर्चा होत असून सरकार पावले उचलत आहे . याच पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी थेट ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे .जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले यांनी गावाचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना विविध मार्गदर्शन करत विविध गोष्टींचे आवाहन देखील केले आहे . ' जूनच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट सक्रीय होईल . पुढील वर्षभर तरी आपल्या तोंडावरील मास्क आणि हातावरील सॅनिटायझर कायम राहील , असा अंदाज सांगत हे गृहीत धरूनच काम करण्याचे आवाहनही त्यांनी केलं . प्रशासनाला सहकार्य म्हणजे गावाने गावकऱ्यांनाच करण्यासारखे आहे . त्यामुळे स्थानिक पातळीवरच सर्वांनी मिळून आता या कोरोनाचा सामना करायला हवा 
जिल्हाधिकारी डॉ . भोसले , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी नगर , नेवासा , श्रीरामपूर , राहुरी , अकोले आणि संगमनेर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच , ग्रामसेवक , तलाठी , पोलीस पाटील यांच्याशी काल दिवसभरात दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला . जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता ग्रामस्तरावरील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत त्यांना या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत गंभीरपणे कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ . भोसले हे कोपरगाव , राहाता , पाथर्डी , शेवगाव , कर्जत , जामखेड , श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील ग्रामस्तरीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशीही संवाद साधणार होते .


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....