वळणमधे ऑक्सिजन बेडसह कोविड केअर सेंटर लवकरच रूग्ण सेवेत...डाॅ.मकासरे

राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण गावामधे ऑक्सिजन बेडसह सुजज्य  कोविड केअर  सेंटर लवकरच रूग्ण सेवेत सुरू होणार असल्याची माहिती येथील डॉक्टर विजय मकासरे यांनी दिली आहे.
शुक्रवार दि. १४ मे  रोजी अक्षय तृतीया,रमजान ईद,धर्मवीर संभाजी महाराज जयंती,परशुराम जयंती या शुभ दिनी वळण (ता राहुरी) परीसरातील रूग्णसेवेसाठी अद्यावत असे मॅक्सकेअर कोविड सेंटर सुरू करण्यात आले  आहे.तसेच याच ठिकाणी सर्व सोई सुविधेसह विलगिकरण कक्ष देखील या वेळी सूरु करण्यात येत आहे.सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर १०  ऑक्सिजन बेड, ५ आयसीयू बेड व उर्वरित २५ जनरल बेड अशा प्रकारे एकूण ४० बेड व्यवस्था करण्यात येणार असून माफक दरात सेवा देण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी २४ तास तज्ञ डॉक्टर्स,प्रशिक्षित सिस्टर व इतर स्पेशालिस्ट डॉक्टर यांच्या भेटी असणार आहे.तसेच शासकीय नियमाप्रमाणे बिले देखील आकारणी होईल त्यामुळे आता  ग्रामीण भागातील रूग्णांना बेडसाठी व उपचारासाठी शहरी भागात जाऊन जी धावपळ करावी लागत होती ती आता करावी लागणार नाही आपल्याच गावात आपल्याला उपचार अल्प दरात व सुव्यवस्थित उपचार मिळणार आहेत.त्यामुळे परिसरातील रूग्णांनी या ठिकाणी अवश्य दाखल व्हावे असे आवाहन वळण येथील मॅक्सकेअर कोविड केअर सेंटर व हॉस्पिटल चे व्यवस्थापक डॉ विजय मकासरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....