पोलिसांना पाहताच राहुरीत सार्वजनिक ठिकाणी दारु पिणारे मद्यपी दचाकी वाहने सोडुन पसार`पोलिस ठाणेत गुन्हा दाखल....पोलिसांनी वाहने केली जप्त.
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी शहरात सार्वजनिक ठिकाणी दारु पिणारयांनवर कारवाई करण्यासाठी पोलिस गेले असता पोलिसांना बघुन मद्यपी आपली दुचाकी वाहेन टाकुन पसार झाली असुन पसार मद्यपींचा शोध ते पोलिस घेत आहे.
राहुरी शहरतील नगर मनमाड रोडवर असलेल्या गाडगे महाराज काॅम्प्लेक्स समोरील मोकळ्या जागेत दिनांक २६ मे रोजी रात्री काही मद्यपी दारु पित बसले होते. यावेळी पोलिस पथक शहरात गस्त घालत होते. या दरम्यान त्यांना गाडगे महाराज काॅम्प्लेक्स समोर काही तरुण दारु पित बसलेले दिसून आले.
पोलिसांना पाहताच ते दारुडे पसार झाले.
मात्र.ज्या ठिकाणी दारुडे दारु पित बसले होते त्या ठिकाणाहून 1) होंडा डियो कंपनीची स्कूटी नंबर एम. एच. 17 सी 9508 2) कावासाकी कंपनीची बॉक्सर मोटरसायकल नंबर एम. एच. 17 एन 8715 3) हिरो होंडा कंपनीची सीडी डॉन मोटरसायकल एम. एच. 17 एस 4926 या तीन दुचाकीसह इंपिरियल ब्लू कंपनीच्या दोन दारुच्या बाटल्या असा एकूण 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत पोलिस हवालदार आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत. पसार झालेल्या त्या दारूड्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Comments
Post a Comment