सरपंच पतिची करामत गावातील महिले बरोबर केले हे कृत्य....राहुरीच्या या गावात घडली घटना...


राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील महिला सरपंचाचा पति काशिनाथ ढवण याने एका ४० वर्षीय महिलेला तू मला खूप आवडतेस असे म्हणून तू कोणाला काही सांगितले तर तूला आणि तूझ्या कुटूंबाला संपवून टाकीन अशी धमकी दिली . तसेच शिवीगाळ केली . ही घटना दिनांक ९ मे रोजी सायंकाळी घडली आहे . या घटनेतील ४० वर्षीय महिला ही तिच्या कुटूंबासह राहत आहे . दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ७ वाजे दरम्यान सदर महिला ही तिच्या घरासमोर एकटीच उभी होती . यावेळी कुरणवाडी येथील  आरोपी सरपंच पती " काशिनाथ भागवत ढवण " राहणार कुरवाडी , तालूका राहुरी .हा तेथे आला . आणि त्या महिलेला म्हणाला की , तुझा नवरा कोठे आहे? . त्यावेळी ती महिला म्हणाली माझा नवरा नदीवर माश्याचे जाळे सोडण्यासाठी गेला आहे . त्यानंतर आरोपी काशिनाथ ढवण हा त्या महिलेला म्हणाला तू मला खुप आवडतेस . त्यावेळी महिला त्याला म्हणाली तू असे का बोलतो . मी तुझे नाव माझ्या नवऱ्याला सांगण . असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने आरोपी काशिनाथ ढवण याने तिला शिवीगाळ करत तू जर हे कोणाला सांगीतले तर तूला व तूझ्या कुटुंबाला संपवून टाकीन , असा दम दिला . सदर महिलेने राहुरी पोलिस ठाणे गाठून सरपंच पति  काशिनाथ भागवत ढवण याच्या विरोधात  तक्रार दाखल केली आहे . या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कारेगावकर हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....