मदुरा मायक्रोफायनांन्स लिमिटेड ब्रंचच्या वतिने कोरोनाच्या संकट काळात झगडणारया पोलिस प्रशासनाचा सन्मान....


राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
मदुरा मायक्रोफायनान्स लि . बॅच राहुरी . यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी अंतर्गत कोरोना संकट काळात जोखीम घेवून लढणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सन्मान म्हणून आज २७ मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यासह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात अन्य ५७ पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ आणि विविध सुरक्षा वस्तूचे ( मास्क , सॅनीटायझर ) वाटप करण्यात आले . यावेळी पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ यांच्यासह पोलिस कर्मचारी शिवाजी खरात , राधिका कोहाकडे , दिपक कुंदे , सचिन ताजने , सोमनाथ जायभाये , तसेच मदुराचे शाखाधिकारी सचिन आल्हाडे आणि सहकरी सचिन हारदे , भुजंग लोखंडे , बचत गटातील लक्ष्मी रांशीणगे , निलिमा पवार आदि उपस्थित होते . आरबी आय मान्यताप्राप्त मदुरा कं . ग्रामीण , शहरी व निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्याकरिता कायमच प्रयत्नशील राहिली आहे . तसेच सामाजिक बांधिलकी अंतर्गत यापूर्वीही रक्तदान शिबीर , वृक्षारोपण ,आरोग्य तपासणी, पुरग्रस्त मदत असे विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....