एकाच आठवड्यात शेख दाम्पत्यांच्या निधन..
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राहरी शहरातील बालाजी रोड परिसरात राहत असलेले नबीभाई शेख व आशाबी शेख या वयोवृद्ध दाम्पत्यांचे एकाच आठवड्यात अल्पशा आजाराने निधन झाल्याची घटना घडली . नबीभाई शेख हे मुळा प्रवरा मध्ये स्थापने पासूनचे प्रथम वाहन चालक होते . काही वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह राहुरी शहरातील बालाजी रोड परिसरात आपल्या राहत्या घरात सेवानिवृत्त जिवन जगत होते . काही दिवसांपूर्वी ते आजारी पडले . या अल्पशा आजारात त्यांचे शनिवार दि . १ मे रोजी निधन झाले . याच दरम्यान त्यांची पत्नी आशाबी नबीभाई शेख ह्या आजारी पडल्या . एकीकडे पती सोडून गेल्याचे दुःख तर दुसरीकडे अल्पशा आजाराने त्यांना ग्रासले . या अल्पशा आजारातच त्यांनी दि .८ मे रोजी अखेरचा श्वास घेतला . मृत्यू समयी नबीभाई शेख यांचे वय ८१ वर्षे तर आशाबी शेख यांचे वय ७४ वर्षे होते . एकाच आठवड्यात या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने राहुरी परिसर , मित्र , नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यांच्या मागे चार मुली चार जावई असा मोठा
Comments
Post a Comment