देवळालीत चैतन्य विकास प्रतिष्ठान ,सुरेंद्र थोरात मित्र मंडळाच्या वतिने गरिबांसाठी रुग्णवाहिका सुरु..

देवळाली प्रवरा/सार्वमंथन
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सुरेंद्र थोरात मित्र मंडळ, चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान व  चालक मालक संघटनेच्यवतीने मंगळवारी रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न झाले.
सध्या कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असून अनेक रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने हाल सहन करावे लागते.हीच गरज ओळखून देवळाली प्रवरा व परिसरासाठी सुरेंद्र थोरात मित्र मंडळ, चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान व चालक-मालक संघटना यांनी ऑक्सिजनयुक्त व अल्पदरात रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज मंगळवारी देवळाली प्रवरा  बाजारतळावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न झाले. 
यावेळी आ.लहू कानडे, नाशिक म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे,प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप, तहसीलदार एफ. आर.शेख मुख्याधिकारी अजित निकत, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशराव भांड, आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....