15 मे नंतर पुन्हा 15,दिवस लाॅकडाउनचा उद्या बुधवारी निर्णय?


मुंबई/सार्वमंथन वृत्तसेवा
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनाची रुग्ण संख्या अजूनही कमी झालेली नाही. दररोज होणारी मोठी वाढ कायम आहे. त्यामुळे राज्यात आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढू शकतो. बुधवारी कॅबिनेट बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळते आहे. अनेक जिल्ह्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे 30 मेपर्यंत हेच निर्बंध कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊनबाबत निर्णय घेतील, असे  काही दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होता. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी अनेक जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर वाढताना दिसतो आहे. त्यामुळं लॉकडाऊन कायम राहणार अशी शक्यता आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही 50 हजारांच्या आसपास आहे. राज्याचा पॉझिटिव्ह रेट कमी झालेला नाही. काही जिल्ह्यात कोरोनाचा वाढता दर कायम आहे. काही शहरात आता कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. रुग्णवाढीला थोडासा ब्रेक लागला असला तरी संकट कायम आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूदर वाढला आहे.   

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....