Posts

Showing posts from January, 2021

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

Image
  मुंबई ,   दि. 20 (रा.नि.आ.) :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार ,   उमेदवार ,   राजकीय पक्ष ,   निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ,   अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. श्री. मदान यांनी सांगितले की ,   महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ,   १९५८ नुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते. त्यादृष्टीने उमेदवारांच्या सोयीसाठी राज्य ‍निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे ;   परंतु याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक खर्च सादर करण्याच्या प्रक...

राज्यातील ३ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

Image
  मुंबई ,  दि. २० :  राज्यातील गोरगरीब ,  शेतकरी ,  मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार  महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी २०२० ते २० जानेवारी २०२१ या कालावधीत तब्बल ३ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन ही महत्त्वाकांक्षी योजना राज्याचे अन्न ,  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी २०२० ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील गोरगरीब ,  शेतकरी ,  मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण...

मुंबई विभागीय पोस्टात ‘ड्रायव्हर’ पदाची भरती

Image
  पदाचे नाव –  स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) एकूण पदे  – १२ शैक्षणिक पात्रता  : १० वी उत्तीर्ण. जड व हलके वाहनचालक परवाना. होमगार्ड किंवा तत्सम कामाचा किमान ३ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य. वयोमर्यादा :  १० मार्च २०२१ रोजी कमाल २७ वर्षे [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट] अर्ज पाठविण्याचा पत्ता :  वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-A,  S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८ अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :  १० मार्च २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) अधिकृत वेबसाईट :   http://www.indiapost.gov.in

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती

Image
  परीक्षेचे नाव :  स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२० एकूण जागा :  ६५०६ पदाचे नाव : गट ब १. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर) २. सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर) ३. सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर) ४. सहायक (असिस्टंट) ६. आयकर निरीक्षक ७. निरीक्षक ८. सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर) ९. उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर) १०. सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट) ११. विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट) १२. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) १३. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी गट क १४. लेखा परीक्षक (ऑडिटर) १५. लेखापाल (अकाउंटेंट) १६. कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट) १७. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक १८. कर सहाय्यक १९. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) शैक्षणिक पात्रता :  कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी. परीक्षा शुल्क –  :  सर्वसाधारण/ इतर मागासवर्ग : ₹ 100/-   [SC/ST/PWD/ExSM/महि...

बिरोबा देवस्थानाची विकासकामे दर्जेदार व्हावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
  मुंबई, दि. २० :-   सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या देवस्थानला दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. आरेवाडी देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बिरोबा देवस्थान विकास आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार पद्धतीनं करण्यात यावीत. विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये. या कामांसाठी लागणारा निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बिरोबा देवस्थान विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे निर्देश दिले. सांगली जिल्ह्यातील आरेवाडीचे बिरोबा देवस्थान ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत देवस्थान आणि परिसराचा विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यांतर्गत अंतर्गत रस्ते, वाहनतळ, स्ट्रीटलाईट,...

खंडकरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

Image
  शिर्डी, दि. २२ :   श्रीरामपूर तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज श्रीरामपूर येथे केले.   श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपुजन समारंभ ग्रामविकास, महसूल, विशेष सहाय्य बंदरे व खार जमिनी विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत येथील पंचायत समिती आवारात आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समिती सभापती संगिता शिंदे, सभापती शरद नवले, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.   यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, कोरोना संकटकाळात राज्य शासनाने नियोजनबद्धरितीने काम करुन कोरोना नियंत्रणात आणला आहे. राज्य हळूहळू पूर्वपदावर येत असून विकास कामांना सुरुवात झाली आहे. श्रीरामपूर शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात येऊन ही...

शेतीसाठी दिवसा वीज देण्यासंदर्भात पालकमंत्री करणार ऊर्जामंत्र्यांशी चर्चा

Image
  अहमदनगर, दि. ०३ -जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळण्यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.   अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसंदर्भात राज्य शासनाने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. जिल्ह्यासाठी  आतापर्यंत ७३ कोटी ५० लाख रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित निधी लवकरच प्राप्त  होऊन वितरित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कोरोना काळात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश आणि कृतज्ञतापत्र प्रदान केले.  राज्य शासनाच्या वर्षपूर्तीच्या काळात ग्रामविका...