अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे छापा मारत 5 जुगारयांना जरबेद केले....वांबोरी पोलिसांच्या नाकावर टिच्चुन कारवाई..
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची पुन्हा राहुरीत कारवाई
अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दिनांक २४ मे रोजी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जूगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे . तसेच सुमारे पाच हजार रूपये रोख व जूगार खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले . राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून जूगार अड्डा सुरू होता . याची खबर मिळताच अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने दिनांक २४ मे रोजी साडेचार वाजे दरम्यान अचानक छापा टाकला . यावेळी काही जूगारी गोलाकार बसून स्वतःचे आर्थिक फायद्या करिता तिरट नावाचा हार जीतचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले . तसेच त्यांच्याकडून ४ , ९९ ० रुपये रोख रक्कम व तिरट नावाचे जुगारा साहित्य असा मुद्देमालासह मिळून आला . स्थानिक गुन्हे अन्वेष विभाग पथकातील हवालदार रोहित येमुल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी १ ) अंकुश गंगाधर मकासरे वय ३२ वर्ष २ ) राहुल विठ्ठल धनवटे वय ३० वर्षे ३ ) विकास नारायण कुसमु वय २५ वर्षे ४ ) राजेंद्र पांडुरंग व्यवहारे वय ४७ वर्षे ५ ) अमोल प्रभाकर कुसमुडे वय ३८ वर्षे सर्व राहणार वांबोरी , तालुका राहुरी . या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा रजि . नं . व कलम - 1 397/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12 ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय . या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आव्हाड हे करीत आहेत .
Comments
Post a Comment