राज्यमंत्री तनपुरे झाले नगरचे पालक मंत्री?
राहुरी/सार्वमथन वेब गेली अनेक दिवसांपासून कथ्थाकुट सुरू असलेल्या नगर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्री निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नावांची चर्चा आहे. मात्र, यात पाथर्डी नगर मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर आले आहे. दरम्यान, आज बुधवारी नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाली, तर नगरची उद्या गुरुवारी होणारी नियोजन समितीची बैठक ही नूतन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगरची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. परंतु, मध्यंत्तरी त्यांनी नगरच्या पालकमंत्री पदाच्या आपल्यावरील जबाबदारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. तेव्हापासून नगरला नवीन पालकमंत्री दिला जाणार, अशी चर्चा सुरू होती. यामध्ये नगरचा अनुभव असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यापाठोपाठ नगरमधून मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके आदी नावांचीही चर्चा होती. मुुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री निवडीबा...