Posts

Showing posts from July, 2023

राहुरी - गुटख्यासह सुमारे ५४ हजाराचा माल जप्त करत एकजण गजाआड....

Image
राहुरी/सार्वमंथन    July 08, 2023 गुटख्यासह सुमारे ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकजण जेरबंद.... राहुरी पोलिसांची धडक कारवाई...; राहुरी प्रतिनिधी राहुरी पोलीस पथकाने तालुक्यातील गुहा परिसरात छापा टाकून एका तरुणाला गुटखा विक्री करताना रंगेहाथ पकडून त्याला गजाआड केले. तसेच त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  पोलिस नाईक सचिन विठ्ठल ताजणे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ५ जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजे दरम्यान हवालदार ज्ञानदेव गर्जे, पोलिस नाईक आजिनाथ पाखरे, नदिम शेख, ढाकणे आदि पोलिस पथक राहुरी तालूक्यातील गुहा गावामध्ये गस्त घालीत होते.  त्यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळालेल्या गुप्त खबरी वरून त्यांनी सदर पोलिस पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावेळी सिध्दार्थ कैलास लुटे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी. हा मोटरसायकलवर महाराष्ट्रात प्रतिबंध करण्यात आलेले सुगंधी तंबाखु व गुटखा विक्री करत असताना आढळून आला.  पोलिस पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ हिरा, विमल तसेच एक मोटरसायकल असा एक...

जूगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

Image
प्रतिष्ठित घरातील सहा जूगारी गजाआड तर तीन जूगारी पसार. राहुरी‌/ सार्वमंथन  राहुरी तालुक्यातील गुहा शिवारातील हाॅटेल सातबारा येथील शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर राहुरी पोलीस पथकाने छापा टाकून प्रतिष्ठित घरातील जूगारी पकडले. या कारवाईत जुगाऱ्यांकडुन चारचाकी दोन वाहने व दुचाकी पाच वाहने पकडली आहे. तर तिन जुगारी अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची घटना दि. २९ जुन २०२३ रोजी रात्री १२ वाजे दरम्यान घडली आहे. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यामधे चांगलीच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिस पथकाने जुगाऱ्याकडुन सुमारे १२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल व‌‌ रोख रक्कम जप्त केली आहे. या बाबत हवालदार प्रमोद सुखदेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७१३/२०२३ महाराष्ट्र  जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.  या कारवाईत १)अनिल चंद्रभान ओहळ, वय ३० वर्षे, रा. गुहा ता. राहुरी. २) गणेश बाळासाहेब वरखडे, वय ३५ वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता .राहुरी. ३) अजय रामराव जाधव, वय ४० वर्षे, रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी. ४) बाबा निवृत्ती अढागळे, वय ४२ ...