राहुरी कृषी विद्यापीठात कारकुन पदावर काम नोकरी लावून देतो म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केली..
राहुरी कृषी विद्यापीठात कारकुन पदावर नोकरी लावून देतो म्हणून लाखो रुपयांची फसवणूक केली..
राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात कारकून म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगत एका भामट्याने दोघांकडून साडे सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे . याप्रकरणी दिपक बापू जाधव ( रा . वासखेडी , ता . साक्री , जि.धुळे ) याला शनिपेठ पोलिसांनी आज मंगळवारी अटक केली . वंदना अशोक मराठे उर्फ वंदना सचिन बुचडे ( वय 31 , रा.जोशी पेठ , जळगाव , ह.मु.मुंबई ) यांनी तसेच त्यांचे चुलत भाऊ वाल्मीक सुरेश पाटील यांनी दीपक जाधव याला 2018 व 2018 या दोन वर्षात 6 लाख 40 हजार 100 रुपये वेळोवेळी दिलेले आहेत . काही रक्कम बँक खात्यात तर काही रक्कम ऑनलाईन वर्ग केली . राहुरी कृषी विद्यापीठात दोघांना लिपिक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष जाधव याने दिले होते , तीन वर्षात त्याने ना नोकरीला लावले ना पैसे परत केले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वंदना यांनी शनि पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली . त्यानुसार जाधव याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला .
Comments
Post a Comment