आमदार निधीतून देवळाली प्रवरा साठी अद्ययावत रुग्णवाहिका मिळावी - आप्पासाहेब ढुस*

देवळाली प्रवरा/सार्वमंंथन वृत्तसेवा
देवळाली प्रवरा साठी आमदार निधीतून अद्ययावत  कार्डियाक अँबुलन्स मिळावी असे निवेदन देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब  ढुस यांनी श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहुजी कानडे यांना दिले आहे. 
 ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा शहर हे जवळपास ४० हजार लोकसंख्येचे मोठे शहर आहे.  सध्या कोरोनाचा कहर सुरू असून काही खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची अक्षरशः लूट सुरू आहे. काही खाजगी रुग्णवाहिका रुग्णांना वेठीस धरीत असून रुग्णांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. तसेच देवळाली प्रवरा शहरामध्ये अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णालयात पोहचण्या अगोदरच उपचाराआभावी काही रुग्ण दगावत आहेत. 
      तरी आपणास विनंती की, देवळाली प्रवरा शहराला सर्व सुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका अत्यंत गरजेची आहे. तसेच  देवळाली प्रवरा शहर हे आपल्या मतदारसंघात येत असल्याने कृपया कोरोनासाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या स्वतंत्र निधीतून किंवा आपल्या स्थानिक विकास निधीतून सर्व सुविधांनी युक्त अशी  कार्डियाक अँबुलन्स देवळाली प्रवरा शहराला मिळावी अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी आमदार लहू कानडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे. 

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....