पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांना खडांबे प्रकरणात सह आरोपी करुन निलंबीत करा.......या मागणीसाठी वंचित बहुजन व आर पी आयच्या वतिने नासिक महासंचालकाच्या दालनासमोर प्राणांतिक उपोषणाचा इशारा..
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी तालुक्यातील खंडाबे येथे दलित कुटुंबावर झालेल्या अन्याय अत्याचाराची दखल न घेता कर्तव्यात कसुर करून जातीय द्वेषाने आरोपींना पाठिशी घालणाऱ्या पोलीस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांना सहआरोपी करुन निलंबित करावे या मागणीसाठी पोलीस महानिरिक्षक कार्यालयासमोर प्रांणातिक उपोषणाचा इशारा रिपाइं व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि.१३जुलै रोजी नाशिक या ठिकाणी करण्यात येणार आहे. पोलीस महानिरीक्षक , नाशिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , राहुरी तालुक्यातील खंडाबे येथील बौद्ध दलित साळवे कुटुबांतील मुली सार्वजनिक पानवठ्यावरील खाणीत जनवारांना पाणी पाजल्याच्या कारणाने जातीय द्वेषातुन मारहाण केली. मुलीपैकी एक मुलगी मंती मंद होती तरी तिलाही अमानुष बेदम मारल्याने ती गंभीर जखमी झालेली आहे. या दरम्यान राहुरी पोलीसांनी फिर्याद नोदवुन न घेता आरोपींना पाठीशी घालुन जातीय द्वेषाने अत्याचारीत कुटुंबाला अपमानास्पद वागवणुक देऊन खोटया गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील आरोपी बाळासाहेब लटके हा पंचायत समीती सदस्य अ...