Posts

Showing posts from September, 2023

राहुरी ,संगमनेरतुन पिकअप व भंगार चोरी करणारे जेरबंद...

Image
राहुरी ,संगमनेर परिसरातुन पिकअप व भंगार चोरी करणारे 5 जण जेरबंद...   स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. राहुरी विशेष/ प्रतिनिधी  प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन, मिळुन आल्यास कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, चापोहेकॉ/अर्जुन बडे व अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. पथक दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी नगर मनमाड रोडने श्रीरामपूरकडे जात असताना राहुरी फॅक्ट्ररी येथुन एक पिकअप वाहन भरधाव वेगाने राहुरीच्या दिशेने जाताना दिसले. पथकास सदर पिकअपचा संशय आल्याने त्यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर  यांना संशयीत...