सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......
राहुरी पोलिसात छेडछाड केल्याचा 21 जणांवर गुन्हा दाखल..
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
तु आमच्या घराकडे सारखा चकरा का मारतो व आमच्या मुलीला का त्रास देतो ?असे जाब विचारणारया संजय गरड यांना तब्बल 21 जणांनी गैर कायद्याची मंडळी जमावुन लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच एका महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना राहुरी तालुक्यात केंदळ खुर्द परिसरात घडली आहे.
या बाबत राहुरी पोलिस ठाणेत संजय ज्ञानदेव गरड राहणार केदळ खुर्द वय वर्ष 40 यांनी
आरोपी.1)दिपक गोविंद जाधव 2)किरण बाळा जाधव,
3)कृष्णा बाळा जाधव 4)अमोल गोविद जाधव,
5)बाळु अंकुश बर्डे,6) श्रीकांत बाळु बर्डे 7)अदित्य बाळु बर्डे ,8)मयुर पडोळे 9)संतोश रोहिदास तुपसुंदर10) नवनाथ जाधव11) दिगंबर ज्ञानदेव तारडे 12)अक्षय कचरु जाधव 13 अंदुबंर नामदेव तारडे 14) दिगंबर प्रभाकर भुसे 15) सोमनाथ तुपसुदर 16 दत्ता प्रभाकर भुसे 17 साईनाथ भुसे 18 रामेश्वर विठ्ठल तारडे 19 अशोक रामचंद्र बर्डे 20 शरद रामचंद्र बर्डे 21
बाबासाहेब अशोक बर्डे सर्व राहणार आरडगाव व केंदळ खु.येथिल यांच्या विरोधात गु रजि नं 419/21 भा.द.वी कलम 354,324,427,143,147,148,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकीगत अशी की आरोपी नंबर 21हा फिर्यादी संजय गरड यास म्हणाला की तु सारखा सारखा आमच्या घराकडे का येतो व माझ्या मुलीस त्रास का देतो असे म्हणाल्याचा राग आल्याने वरिल लोकांनी संगनमत करुन गैर कायदा मंडळी जमावुन गरड यांना व साक्षिदार यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन व फिर्यादीच्या घरातील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन फिर्यादीच्या मोटारसायकलची तोडफोड करुन नुकसान करत शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत राहुरी पोलिस घटनेचा छडा लावत आहे.
तब्बल 21जणांनी दोघा पति पत्निस मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment