वाळु तस्करी मुळा धरण धोक्यात/इम्रान देशमुख
इमरान देशमुख/सार्वमंथन वृत्त नुकत्याच झालेल्या बारागाव नांदूर येथील वाळू लिलावामध्ये मुळा धरणाच्या भिंतीलगत 200 मीटर अंतरावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. महसूल प्रशासनाने निर्देशित केलेला वाळू लिलाव वेगळा आणि आणि ज्यांनी वाळूचा ठेका घेतला आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने वाळू उपसा करत असल्याचे चित्र मुळा नदी मध्ये दिसत आहे. उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन संजीवनी असलेले मुळा धरणाच्या भिंती लगतच 200 मीटर अंतरावर ठेकेदारांनी नदीमध्ये वाळू उपसा करण्यासाठी अवैध बोटी लावल्या आहेत. 26000 टीएमसी पाणी क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या भिंती लगतच हा प्रकार चालू असल्यामुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो असे मत बारागाव नांदूर येथील ग्रामस्थ बोलत आहे. एका अर्थाने मुळा धरणाला सुरुंग लावण्याचे काम वाळूठेकेदारांची कडून महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे मत एम आय एम चे जिल्हाध्यक्ष बारागाव नांदूर येथील इमरान देशमुख यांनी व्यक्त केले आहे. महसूल प्रशासनाने जर वेळीच या प्रकरणाची दखल घेऊन अवैध रीत्या सुरु असलेला लिलाव बंद केला नाही तर आंदोलनाच्या पवित्र्यात ग्रामस्थ राहतील...