निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख
श्रीरामपूर / सार्वमंथन
कुठलेही सामाजिक कार्य हे निर्पेक्ष असले पाहिजे,त्यात कुठलाही स्वार्थ,जोर-जबरदस्ती किंवा मी म्हणेल तसेच न करता व वागता सामाजिक कार्य एक कार्यशिलतेने परीपूर्ण निस्पृह असले पाहिजे,जसे एखादे विशाल वटवृक्ष असते,भर उन्हात त्याच्या सावलीखाली अनेक गरजवंत पशु,पक्षी,मानव येतात, बसतात,जरासा विसावा घेतात तथा उन कमी झाले अथवा मार्गस्थ होण्याची वेळ आल्यावर मार्गस्थही होतात,त्या बदल्यात त्या विशाल वटवृक्षास त्या सावली घेणाऱ्यांकडून काय अपेक्षा असते ?
तसेच एक थंड पाण्याच्या विहिरीचेही असेच काही असते ज्यावेळी मानव,पशू,पक्षी यांना तहान लागते तेव्हाच ते या थंड पाण्याच्या विहिरीजवळ येतात आणि पाणी पेऊन आपली तहान भागवितात त्याबदल्यात ती विहिरी त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवते ?
असेच निस्पृह समाजसेवेचेही असते,ज्यावेळेस लोकांना तुमची गरज वाटते,आवश्यक्ता भासते त्यावेळी ते आपल्याकडे येतात, आवश्यकतेनुसार थांबतात आणि मार्गस्थही होतात,जसे विशाल वटवृक्षाकडे गार सावली असते,विहिरीकडे थंड पाणी असते त्याप्रमाणेच एका समाज सेवकाकडे निस्पृह समाजसेवा असते,कधी स्वत:हुन तर कधी समुहाच्या माध्यमातून तो आपल्या निस्पृह समाजसेवेतून सामाजाची सेवा करत असतो आणि या समाजसेवेबद्दल त्यास समस्त जनांकडून काय अपेक्षा असते ?,
उत्तर -
- १) विशाल वटवृक्षाला कधी तरी मानवाने पाणी टाकावे व तेथे झाडझुड करुन स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करावा,जेणे करुन इतरांनाही त्याचा फायदा पोहोचेल !
- २) विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलेल्या मानवाने तेथेच बसुन तोंड,हात,पाय,कपडे धुवू नये अथवा अंघोळ करु नये जेणेकरुन घाण पाणी विहिरीत जाऊन संपूर्ण पाणी दुषित होईल,विहिरी पासून जरा अंतरावर धुतले ते चालेल मात्र घाण पाणी विहिरीत जाता कामा नये याची दक्षता घेणे गरजेचे असते,
- ३) याप्रमाणेच निस्पृह समाजसेवेचेही देखील असेच असते,जर कोणी स्वत: अथवा समुहाच्या माध्यमातून निर्पेक्षतेने सामाजिक कार्य करत असेलतर त्याने कोणाकडूनच कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवणे हे चुकीचे व गैरच असते,कारण समाजसेवा आपल्याला करायची असते त्याचे निर्णय इतरांवर थोपून अथवा जोर-जबरदस्ती करुन चालत नाही,तर शांतता आणि समन्वयाने निर्णय घ्यावे लागतात, एकदा आपल्या निस्पृह समाजसेवाचा आरसा जनमानसापूढे गेला की आपोआपच लोकं तुमच्यासोबत जोडले जातात,मात्र आधी आपले निर्पेक्ष कार्य त्यांच्यासमोर गेले पाहिजेत तरच सर्वकाही शक्य होऊ शकतं, विना कुठलेही विधायक कार्य नुसती पाठबळाची अपेक्षा करणे हे तीतकेच चुकीचे आणि गैर ठरते,याकरीता प्रथमतः आपण आपल्या जवळच्या मित्रांना घेऊन एक छोटासा समुह बनवत सामाजिक कार्य हाताशी घ्यायचे असते,त्यात निर्पेक्षतेने स्वत:हास वाहून घ्यायाचे असते, आपणास तथा आपल्या निस्पृह कार्यास लोकं बघतच असतात त्यांना आपले कार्य/कामे पसंत पडल्यास ते हमखास आपल्याबरोबर येणारच तथा आपलं हे समाजसेवेचं रोपटंही ऐकेदिवशी विशाल वटवृक्ष होणार यासाठी सर्वाधिक मोठे असे केवळ निर्पेक्षता आणि धैर्ये हेच आपणास यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते, अशाप्रकारे ही सामाजिक कार्याचे स्वरुप वाढत जाते.मात्र इतरांनी किमान जो निर्पेक्षतेने समाजसेवा करत आहे त्यास नाही काही देऊ शकत तर त्याचे मनोबल न खचविता किमान त्यास शब्दश:पाठबळ देऊन त्याचे मनोबल वाढीचे प्रयत्न करणे गरजेचे व क्रमप्राप्त ठरते.
- शौकतभाई शेख
अध्यक्ष : समता फाऊंडेशन, श्रीरामपूर
मोबा.नं. 9561174111
Comments
Post a Comment