Posts

Showing posts from July, 2021

चक्क जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारयाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले...

Image
राहुरी/सार्वमंथन प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांचे बनावट फेसबुक अकाउंट कोणीतरी अज्ञात इसमाने तयार केल्याने पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्याकडुन माहिती घेतली असता त्यांनी म्हटले आहे की माझे नावाचे व फोटो वापरून कोणी तरी बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशाची मागणी करत आहे. तरी कृपया कोणीही पैसे पाठवू नका आगर त्या नवीन  बनावट ची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या सोशल मिडीयावर अनेक नागरीक व तरुण वर्गांच्या फसवणुकीच्या घटना घडत असतांना चक्क अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अनिल कटके यांचे कोणीतरी बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे. जय कोणी या माध्यमातुन कोणी पैसै मागत असेल तर देवु नये अशी माहिती पोलिस निरिक्षक कटके यांनी सार्वमंथनला दिली आहे.

संक्रापुरचा सरपंच रामा पांढरे यांनी दोघांचे डोके फोडले` तर पांढरे टोळीकडुन गावात दहशत पसरविण्याचा प्रकार, पोलिसात 7.जणावर गुन्हा दाखल......

Image
राहुरी /सार्वमंथन प्रतिनिधी संक्रापुर येथिल सरपंच रामा पांढरे टोळीकडुन 8 ते 10 जणांना बेदाम मारहाण झाली आहे. यामधे दोघे जण गंभिर जखमी झाले असुन त्यांच्यावर श्रीरामपुर येथे उपचार सुरु असुन याबाबत 7 जणांवर राहुरी पोलिस ठाणेत सार्वजनिक ठिकाणी लोक जमा करुन दहशत पसरवणे व मारहाण करणे या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिमेंटचे पाईप टाकण्याच्या कारणावरुन संक्रापुरच्या सरपंच रामा पांढरे व त्यांच्या 7 साथीदाराने दोन जणांचे लाकडी दांडे व दगडाने डोके फोडल्याची घटना घडली आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाणेत गु.रजि.नं.556/2021 भादवि कलम 324,337,323,143,147,148,149,504,506 प्रमाणे  राजेंद्र संजय जगताप वय वर्ष 24वर्षे,धंदा शेती राहणार संक्रापुर ता.राहुरी यांनी आरोपी 1) जाफर शेखलाल शेख 2) आखिल युसुफ शेख 3) रामदास बाळासाहेब पांढरे 4) आखिल शेख गारवाले 5) बाबासाहेब अंबिर शेख 6)ऋषीकेश बापु पांढरे सर्व रा.संक्रापुर ता.राहुरी पोपिज नानाभाई शेख रा.दवण गाव ता .राहुरी यांच्या विरोधात फीर्याद दाखल केली आहे. सदर घटना हि  दि.14 जुलै 2021 रोजी लांडेवाडी सक्रापुर शिवारातील फिर्यादीच्या राहते घरा...

वाळू तस्करांचे आगार असलेल्या संक्रापुरचा सरपंच रामा पांढरे यांना कपडे फाटे पर्यंत 8 ते 10 जणांच्या टोळक्याने मारहाण केले आहे.....

Image
राहुरी/सार्व मंथन प्रतिनिधी वाळू तस्करांचे आगार म्हणून ओळख असलेल्या संक्रापुरचा सरपंच रामा पांढरे यांना 8 ते10 जणांच्या टोळक्याने लोखंडी फायटर,लोखंडी गज,लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजी नंबर 555/2021 भादवि कलम 324 ,323,143 ,147 ,148 ,149, 504, 506 प्रमाणे 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामाचा जाब विचारला असता 9 जणांनी गैर कायद्याची मंडळी जमून सरपंच रामा पांढरे यांना  जबर मारहाण करत कुटुंबाला जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी‌ तालुक्यातील संक्रापूर येथे घडली आहे. सदर घटनेमुळे या परिसरात काही काळ तणावाचे  वातावरण निर्माण झाले होते. संक्रापुर लांडेवाडी येथे  दि.14 जुलै रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान रामा पांढरे यांना1)संजय संपत जगताप 2)नबाजी राधाकिसन जगताप 3)सुरेश नारायण जगताप4)बाबुराव संपत जगताप5)ज्ञानदेव संपत जगताप6)गोकुऴ राधाकिसन जगताप7)अर्जुन भाऊसाहेब होण 8)राजेंद्र संजय जगताप9)नारायण गोकुळ जगताप सर्व रा. लांडेवाडी सक्रापुर ता.राहुरी यांनी जबर मारहाण केली. रामा पांढरे व...

प्रसाद शुगर कारखान्याचा हंगाम २०२१-२२ चा रोलर पूजन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न”

Image
वांबोरी/सार्वमंथन प्रतिनिधी गुरुवार दिनांक 8 जुलै  रोजी वांबोरी येथील प्रसाद शुगर अँण्ड अँलाईड अँग्रो प्रोडूक्टस लिमिटेड या कारखान्याचा हंगाम २०२१-२०२२ करिता मिल रोलरपूजन समारंभ झाला.यावेळी  कारखान्याचे जेष्ठ संचालक सुरेश बाफना यांच्या शुभहस्ते पुजन संपन्न झाले.  यावेळी कारखान्याचे  कार्यकारी संचालक सुशीलकुमारजी देशमुख यांनी सांगितले कि मागील हंगाम सन २०२०-२०२१ चे ऊस उत्पादक, उस तोडणी-वाहतूकदार यांची एफआरपी सह संपूर्ण ऊस बिल देणी व तोडणी-वाहतूक देणी वेळेत अदा केली आहेत त्यामुळे उत्पादक,आणि तोडणी-वाहतूकदार यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण असून  गळीत हंगाम २१-२२ साठी शेतकऱ्यांचा ऊस वेळेत ऊसतोड होण्याच्या दृष्टीने सक्षम तोडणी-वाहतुक यंत्रणा करार द्वारे पूर्ण भरती केलेली आहे.  तसेच चालू हंगाम २०२१-२०२२ सुरु करण्याच्या अनुषंगाने मशिनरी रीपेअरिंग,ओवर ऑईलींग, जलद गतीने सुरु असून ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. या गाळप हंगामात 8 लाख में.टन ऊस गाळपाचे उदिष्ट् ठरवलेले असून कारखाना दैनंदिन गाळप क्षमता 5000 में.टन गाळप करण्यास सज्ज आहे तसेच 30 के.एल.पीडी क्षमतेचा...

राहुरी तहसिल कार्यालयातील पी यु पी कोसळला महिला नायब तहसीलदार बालबाल बचवल्या.......उद मांजर सद्रुष्य प्राण्याचा राहुरी तहसील कार्यालयात धुमाकुळ...

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा अचानक राहुरी तहसील कार्यालयातील पी.यु.पी  कोसळल्याने महिला नायब तहसीलदार बालबाल बचावल्या ने महसूल प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. याबाबत सुविस्तर वृत्त राहुरी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पुनम दंडेले या आपल्या टेबल जवळील खुर्चीवर बसल्ता असता अचानक तहसील कार्यालय वरिल असलेला पी.ओ.पी कोसळला.  पी.यु.पी  खुर्ची जवळ पडल्याने त्या काही काळ नायब तहसिल स्तब्ध झाल्या होत्या.अचानक काहीतरी मोठा आवाज आल्याने तहसील मधील बहुतेक सर्वच महिला व पुरुष कर्मचारी यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. सर्वानी  वर बघितले असता उद मांजर सद्रुष्य प्राणी पी.यु.पी वरिल भागात पळापळ करत होते. अनेकांना उदमांजर  पळतांना दिसले नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी तत्काळ वन विभागाची संपर्क करत वन विभागाच्या कर्माचारयास पाचारण केले. वन विभागाचे कर्माचारी लांबे, दत्तु गायकवाड यांनी येवुन पाहणी केली असता  उदमांजर सद्रुष्य प्राणी हे गेली दोन वर्षापासून या ठिकाणी वावरत असून या उद मांजराने तहसीलच्या अनेक कर्मचाऱ्यांना दर्शन दिले आहे. अधिक माहिती अशी समज...

नगरपरिषदेचे कोवीड सेंटर तात्काळ सुरु करा - देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीम.*

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे कोवीड सेंटर तात्काळ सुरु करा अशी मागणी आज देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमच्या सदस्यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची नगरपालिकेत भेट घेऊन निवेदन दिले.  या प्रसंगी मेडिकल हेल्प टीम चे दत्तात्रय कडू पाटील, आप्पासाहेब ढुस, अमजद इनामदार ,अनिस शेख. प्रशांत कराळे, ऋषीकेश संसारे,  डाॅ संदीप कदम आदी उपस्थित होते.  प्रसंगी बोलताना दत्तात्रय कडू पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांत देवळाली प्रवरा शहरात कोवीडचे रुग्ण पुन्हा आढळुन येत असल्याने नगरपरिषदेने ते सुरु करत असलेले १०० ॲाक्सीजन बेडचे कोवीड सेंटर तातडीने सुरु करुन रुग्णांची होणारी धावपळ व गैरसोय टाळावी.   दत्तात्रय  कडुपाटील यांचे नेतृत्वाखालील देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या शिष्टमंडळाने देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना आज भेटुन दिलेल्या निवेदनात नगरपरिषदेचे कोवीड सेंटर तात्काळ सुरु करा या देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमच्या मागणी सोबत पुढे म्हंटले आहे की,    सहारा कोवीड सेंटरमध्ये मेड...

खेळा बद्दल उदासीनता व अपरिपक्व नेतृत्वामुळे देवळाली प्रवराच्या खेळाडूंचा खेळखंडोबा - आप्पासाहेब ढुस*

Image
राहुरी फॅक्टरी/सार्वमंथन प्रतिनिधी खेळाविषयी कमालीची उदासीनता न् अपरिपक्व व दुरदृष्टीचा अभाव असलेल्या नेतृत्वाने आज पावेतो देवळाली प्रवरा मध्ये क्रीडा संकुल उभारले नाही. त्यामुळे राज्यकर्तांच्या या अनास्थेने तरुणाईच्या  तंदुरुस्तीचा आणि खेळाचा खेळखंडोबा झाला असल्याचे  शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी प्रतिपादन केले.  येथील शिवनेरी क्लबच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेचा सराव करण्या साठी राहुरी अर्बन  पतसंस्थेच्या वतीने क्रीडा साहित्य प्रदान करणेत आले  त्या प्रसंगी ढुस बोलत होते..    पुढे बोलताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, खेळाविषयी कमालीची उदासीनता न् अपरिपक्व व दुरदृष्टीचा अभाव असलेल्या नेतृत्वाने आज पावेतो देवळाली प्रवरा मध्ये क्रिडागण उभारले नाही. त्यामुळे  राज्यकर्तांच्या या अनास्थेने तरुणाईच्या तंदुरुसुस्तीचा आणि खेळाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान स्पर्धेत  राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेली व एकेकाळी क वर्ग नगरपरिषदे मध्ये राज्यात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या देवळा...

टाकळीमिया येथे ढंपरच्या धडकेत एक तरुण जागिच ठार..राहुरी पोलिसात गुन्हा दाखल....

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील 40 वर्षिय तरुणास भरधाव वेगाने माती वाहतुक करणारया ढंपरने   चिरडल्याची दुर्दवी घटना दि.4 जुलै रोजी दुपारी 3.वाजे दरम्यान  घडली आहे. सदर घटनेमुळे या परिसरात संतपाची लाट पसरली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनेच्या ठिकाणी जावुन पाहणी करत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. टाकळीमिया येथील तरुण परितोष रामचंद्र कुलकर्णी वय वर्ष 40 हे महादेव मंदिर जवळुन आपल्या घराकडुन जात असतांना अचानक मातीने भरलेल्या ढंपर क्रमांक एम एच 17 ऐ जी 5045 पाठीमागुन भरधाव वेगात येवुन ढंपर चालक बाळासाहेब रघुनाथ राउत यांने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हायगईने वाहन चालवत कुलकर्णी यांच्या मृत्युस कारणीभुत ठरला आहे.सदर घटने बाबत राहुरी पोलिस ठाणेत मयताचा भाउ परिमल रामचंद्र कुलकर्णी यांनी 304,279,337,338,134 अ.134 ब,177 प्रमाणे ढंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कुलकर्णी यांच्या डोक्यावरुण गाडीचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेदा झाला होता ते रक्ताच्या थारोळ्यात प...

चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद... पो.नि.नंदकुमार दुधाळ

Image
देवळाली प्रवरा /सार्व मंथन वृत्तसेवा उद्योग व्यवसाय करता असताना  केवळ स्वतःची प्रगती न साधता समाजासाठी अहोरात्र सेवा करणारे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केले. देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहास शुक्रवारी नंदकुमार दुधाळ यांनी भेट दिली प्रसंगी ते बोलत होते.यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, रफिक शेख, अशोक काळे, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ म्हणाले की, समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड ही ठराविक लोकांमध्ये आहे. याच पद्धतीने गणेश भांड यांचे काम आहे. उद्योग व्यवसायाबरोबर सामाजिक, धार्मिक कार्यातील गणेश भांड यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.कोरोना संकट काळातील योगदानाबद्दल श्री.दुधाळ यांनी गणेश भांड यांचा गौरव केला. उद्योजक गणेश भांड यांना महाराष्ट्र औद्योगिक...

राहुरी ग्रामिण रुग्णालयाचे लाखो रुपयचे वैद्यकीय साहित्य चोरी....घटना घडुन चार महिने उलटले असतांना अद्याप पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल नाही....

Image
राहुरी /सार्वमंथन वृत्तसेवा तत्कालिन काली राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयासाठी उपोषण करणारे आत्ताचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या शहरातील बंद अवस्थेत असलेल्या ग्रामिण रुग्णालयातील लाखो रुपयाची वैद्यकीय साहित्याची चोरी  झाल्याने याबाबत चांगलेच चर्चेला उधान आले आहे. राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत ठेवण्यात आलेले वैद्यकीय साहित्य एक्सरे चोरीस गेले आहे. याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती . गोरगरीब रुग्णांना मिळणारी मोफत वैद्यकीय सेवा बंद होऊ नये , यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष प्राजक्त ‌तनपुरे यांनी पुढाकार घेत राहुरी पालिकेच्या मालकीची अभ्यासिका इमारत ग्रामीण रुग्णालयासाठी उपलब्ध करून दिली.पाच वर्षापुर्वी आर पी आय आठशले गटाचे विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामिण रुग्णालयासाठी उपोषण केले होते. ग्रामीण रुग्णालयाचे दोन नोव्हेंब...

मटन बनविण्याचा कारणातुन आईचा खुन करणारा आरोपी राहुरीच्या जलमधे मयत झाला...मयत झाल्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात...

Image
राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील आईला ठार मारल्याच्या गुन्हेत दोन वर्षापासून शिक्षा भोगणारा राहुरीच्या जेलची हवा खात असलेला आरोपी राजेंद्र गोविंद लांडे वय वर्ष ४६ याचा अकस्मात मृत्यू  झाल्याची घटना काल मध्यरात्री  घडली आहे. आरोपी राजेंद्र लांडे यास रात्री दोन वाजे दरम्यान पोटात त्रास जाणवु लागल्याने त्याला राहुरी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असते तो उपचारापुर्वी मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. सदर आरोपी हा न्यायालयीन कोठडीत असल्याचे सुत्राकडुन समजले. या घटनेमुळे रात्रभर पोलिस व महसुल प्रशासनात चांगलीच पळपळ झाली होती. या बाबत सुविस्तर दोन वर्षापुर्वी तांभेरे राजेद्र लांडे याने एकादशीच्या दिवशी माळकरी आईला मटण बनवण्यासाठी हट्ट धरला होता.मात्र एकदशी असुन मी माळकरी आहे.मी बनवणार नाही असे म्हणल्याचा राग राजेंद्र याने येवुन आईच्या डोक्यात जबर मारहाण करुन खुन केला होता. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात मयताचा दुसरा  मुलगा दिगंबर लांडे यांनी ३०२ प्रमाणे खुनाची फीर्याद दिली होती. आरोपी हा गेली महिन्याभरापासुन आजारी होता. त्यास दोन आठवडेभरापुर्...