गावचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास वांबोरी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा.....

वांबोरी/सार्वमंथन वृत्तसेवा 
(राधेशाम कुसमुडे)
 राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत हे लोकवस्ती बाबत तालुक्यात सर्वाधिक मोठी, उत्पन्नाबाबत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांकची ग्रामपंचायत आहे.
 सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छतेचे आवाहन केले जात असले, तरी वांबोरीतील काही भागांत नागरिकांना पाण्याचीच समस्या भेडसावत आहे. मागील आठवड्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वांबोरीत काही भागांतील नागरिक सध्या त्रस्त असून स्वच्छता करणार तरी कशी ? असा प्रश्न त्यांना पडला आहे. 
 वांबोरी गावामध्ये दर आठ दिवसानंतर पाणी सोडले जाते आणि ३६५ दिवसांची पाणीपट्टी सक्तीने वसुली केली जाते. पाण्यासाठी माता भगीनींना कामधंदे सोडुन डोक्यावर हंडे घेऊन पायपीठ करावे लागत आहे. त्यामुळे पाठीचे, मणक्याचे, मानेचे आणि मानसिक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनता अतिशय त्रस्त झाली आहे कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना अशा परिस्थितीत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आणखी रोगराई वाढण्याची शक्यता आहे.
 गावातील नेत्यांचे या गोष्टीकडे अजिबात लक्ष नसल्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. रोगराईचे प्रमाण जास्त वाढले तर याला वांबोरी ग्रामपंचायत आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल तसेच ग्रामपंचायत ने पाणी पुरवठा  ४८ तासांत योग्य दाबाने सुरळीत न केल्यास वांबोरी ग्रामपंचायतीवर लवकरच हंडा मोर्चा काढण्यात येईल असे  सामजिक कार्यकर्ते प्रमोद ससाणे यांनी सांगितले. निवेदनावर प्रमोद ससाणे, राधेश्याम कुसमुडे, राजू शेख, ईश्वर ससाणे आदींच्या सह्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....