राहुरीचे पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांना निलंबित न केल्यास पावसाळी अधिवेशनात काळे झेंडे दाखवणार...शिरिष गायकवाड... साळवे कुटूंबावर अन्याय होत असतांनी राज्याचे आदिवासी मंत्री प्राजक्त तनुपरे यांच्या राहुरी तालुक्यात घटना घडली असतांना त्यांनी लक्ष का घेतले नाही? समाज्यावर अन्याय होत असतांनी अदिवासी मंत्री तनपुरे गप्प का बसले? अनिल जाधव ..


राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
खडांबे येथिल सबंधित साळवे कुटूंबाना न्याय न मिळाल्यास येत्या जुलै दरम्यान होणारया पावसाळी अधिवेशनात काळे झेंडे दाखवण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी इशारा दिला आहे.
राहुरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असुन दलित,अदिवासी समाज्याला न्याय देण्यात कमी पडली असुन संबधित पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांना निलंबित करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या अंदोलन प्रसंगी वंचित बहुजनचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांनी.
आठवडे भरात पोलिस निरिक्षक दुधाळ यांचे निलंबन न झाल्यास पोलिस अधिक्षक,व पोलिस महानिरिक्षकांच्या कार्यालयावर अंदोलन करणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिली आहे.
कायद्याचे पालन करणारेच कायदा मानत नसेल तर अंदोलन करणे गरजेचे असुन गुन्हेगारांना पाठिशा घालणारया अधिकारयास निलंबित करावे.
नविन पदभार घेताच पोलिस निरिक्षक दुधाळ यांनी एक हाॅटसोपवर पोस्ट टाकली की कोणाची काही तक्रार असल्यास कोणाची मध्येस्थीची गरज नाही असे वाचले तेव्हा चांगले झाले असे वाटले.
तालुक्यातील खंडाबे व कुरणवाडी घटना अत्यंत गंभिर असुन छत्रपतीच्या राज्यात शिवाजी महारांजांनी त्यावेळी कोण होता तो अफजल खान?कोण होता तो पाटील हे बघितल नाही तर अन्यायच्या विरोधात उभे राहिले होते.
त्यामुळे आम्हीही अन्यायच्या विरोधात कायम लढा उभरणार असल्याचे वावरथचे सरपंच डाॅ.जालिंदर घिगे हे भाषेणात बोलत होते.
यावेळी बुध्द महासभेचे गौतम पगारे ,बाबुराव मकासरे, अॅड भाउसाहेब पवार,पिंटु (नाना )साळवे यांनी भाषणे केली.
खडांबे येथिल दलित साळवे कुटूंबियावर येथिल राहुरी पंचायत समितिचा सदस्य बाळासाहेब लटके यासह याच्या कुटूंबियाने साळवे कुटूंबियांना मारहाण करुण जातिवाचक शिविगाळ केली होती मात्र राहुरीचे पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी साळवे कुटूंबाची खरी तक्रार न घेता चुकीची फिर्याद घेवुन बोळवण केली.अॅट्रसिटी त्यावेळी का दाखल केली नाही? तब्बल 15.दिवसाने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल का झाला? उशीरा दाखल झाला गुन्हा?निवेदना देताच का लगेच आरोपींना लगेच अटक केली?याचा अर्थ अहा की पोलिस या आरोपींना पाठिशी घालत होते.
यावेळी शिरिष गायकवाड, सलिम शेख,बाळासाहेब बर्डे,ईश्वर खिलारी,सुनिल ब्राम्हणे,रविद्र गायकवाड,गोरख थोरात, खडांबे येथिल पिडीत कुटूंबातील महिला,मुलगा व मुलगी अंदोलनात सामिल झाले होते.
अंदोलन प्रसंगी राहुरी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.


                             (चौकट) 
यावेळी निवेदन स्विकरतांना पोलिस उपधिक्षक राहुल मदने यांनी अंदोलनकांना सांगितले की तुम्हाला पुन्हा अंदोलन करण्याची गरज पडणार नाही.
यावेळी अंदोलकांनी प्रश्न केला की पोलिस निरिक्षकाचे निलंबित कधी करणार ?यावेळी संबधित  घटने बाबत जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे सर्व अहवाल पाठवण्यात येईल व न्याय दिली जाईल.


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....