राहुरीत दोन व्यापारी संघटनेचा कलगितुरा...........कोणी म्हणे.... बंद कोणी म्हणे सुरु...... संघटने बाबत तहसिलदार अनभिज्ञ....


राहुरी /सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी शहरात दोन व्यापारी संघटनेच्या अंतर्गत वादामुळे सर्व सामन्य छोटे व्यवसायिक भरडले जात असल्याने छोटे दुकानदारांचे मोठे अर्थिक नुकसान  होत आहे.
मोठे व्यवसायिक व्यापरयांनी यापुढे कोणताही निर्णय घेयचा असल्यास छोट्या व्यवसायिकांना विश्वासात घेवुन निर्णय घ्यावा अशी मागणी छोट्या व्यापारी वर्गातुन करण्यात आली आहे.
पुर्वीपासुन पहिली राहुरी व्यापारी संघटनेचे नेत्रृत्व व्यापारी  संघटनेचे प्रकाश पारख हे करत होते
मात्र गेली दोन वर्षापासुन पारख हे मनमानी करत असल्याचा आरोप दुसरया संघटने कडुन होत होता.याकारणाने व्यापारयात एकमत होत नव्हते यामुळे दुसरे व्यापारी अनिल भट्टड यांनी व्यापारयांची वेगळी संघटना तयार केली व एक हाॅटसोप ग्रुप तयार केला.
पुर्वी शहरात व्यापारी संघटना म्हटली की प्रकाश पारख यांचे नाव पुढे येत होते. पोलिस, महसुल व राहुरी नगरपालिका प्रशासनाकडुन व्यापारया बाबत काही बंद चे निर्णय घेयचा असल्यास प्रकाश पारख यांना बोलवणे होत होते.असाच प्रकार काल दि.9 जुन रोजी झाला कोरानाच्या पार्श्वुभुमिवर जिल्हा अधिकारी डाॅ राजेद्र भोसले यांनी दि.7.जुन रोजी नियमित पणे सर्व व्यवहार सुरु करण्याचा आदेश दिला होता.
यापुर्वी मात्र राहुरीचा बाजार गुरुवारी असल्याने हा दिवस जनता कर्प्यु म्हणुन घोषित केला होता.
याबाबत काल बुधवार रोजी तहसिल कार्यालयात तहसिलदार यांच्या अदिपत्याखाली प्रकाश पारख यांच्यासह अदि बोटावर मोजण्या इतक्या व्यापारयांची बैठक झाली. यामधे गुरुवार जनता कर्प्युचे त्या व्यापारयांच्या मागणी नुसार तहसिलदर यांनी बंद ठेवण्याचे आवाहान केले.
तसेच राहुरी नगरपालिकेच्या भोंग्यावर दुपारच्या दरम्यान शहरातील नागरीकांना पालिकेने सुचना केली. की उद्या गुरुवार दि.10 जुन रोजी जिल्हा अधिकारयाच्या आदेशाने जमाव बंद लावण्यात आली आहे.
तरी शहरातील सर्व व्यापारी व नागरीक यांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहान करण्यात आले.तसेच तहसिलदार यांच्या बैठकीस उपस्थित असलेल्या काहींनी हि पोस्ट हाॅटसोप , सर्व सोशल मिडियावर व्हायरल केल्याने यामुळे अनिल भट्टड यांची दुसरी व्यापारी संघटना बंदच्या आवाहाना बाबत सोशल मिडीयावर आक्रमक झाली. व संताप व्यक्त करत नुकतेच दोन दिवसापुर्वी सर्व दुकाने जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने खुली करण्यात आली आणि पुन्हा तिसरया दिवशी बंद चे आवाहान केले आपले जगने मुश्कील झाले?कामगारांना संभाळायचे कसे? असे अनेकी चर्चा सुरु झाली .यामधे दुसरया गटातील व्यापारी संघटनेने तहसिलदार फसियोद्दिन शेख यांची भेट घेवुन आम्हाला का विश्वासात घेतले नाही ?आम्ही व्यापारी आहोत आमची पण संघटना आहे ?आमच्याशी चर्चा करणे गरजेचे होते?
हा बंद आम्हाला मान्य नाही?असे म्हणताच तहसिलादर यांनी डोक्याला हात लावत तुमच्या शहरात दोन संघटना आहे.हे मला माहिती नव्हते तुम्ही जर म्हणत असेल तर जनता कर्प्यु नका करु तुमचे व्यापारयांचे मत नसले तर माझी काही हरकत नाही.असे म्हणालयाने दुसरया व्यापारी संघटनेने पुन्हा रात्री उशीरा सोशल मिडीयावर फोस्ट व्हायरल करत उद्याचा जनता कर्प्यु रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे सुर्व व्यापारी वर्गाने आप.. आपली दुकाने सुरु ठेवण्याची  पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल अशी पोस्ट पसरवली आणि अनेकांनी सुटक्याचा निश्वास सोडला.
मात्र राहुरी शहरात व्यापारयांच्या दोन संघटनेच्या वादात सर्व सामन्य हातगाडी,टपरी धारक छोटे.. मोठे व्यवसायिक भरडले जात असल्याने काहींनी नाराजगी व्यक्त केली.यानंतर या दोनही संघटनेने छोट्या व्यवसायिकांना विश्वासात घ्यावा अशी मागणी होत आहे.
मात्र दोन संघटनेच्या या सोशल मिडीयावर झालेल्या कलगीतुरयामुळे काहींची चांगलीच करमणुक झाल्याचे दिसुन आले.   

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....