राज्य मंत्र्याच्या ताब्यात असलेल्या राहुरी नगरपालिकेत चालतोय मोठा भ्रष्टाचार ..विरोधी गटाचे गट नेते रावसाहेब चाचा तनपुरे यांचा आरोप....सत्ताधारी गटाकडून आमचा आवाज दाबला जात आहे..पण आम्ही विखे पाटील/व आ.कर्डिलेंचे समर्थक आहोत....विरोधी पक्षनेते दाद पाटील सोनवणेनगरसेवकच झाले नगरपालिकेत ठेकेदार.. तनपुरेंचा गौप्यस्फोट मला बदनाम करण्याचे षडयंत्र होते..आर आर तनपुरे

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राज्य मंत्र्याच्या अदिपत्याखाली सत्ताधारी गटाकडुन राहुरी नगर पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप परिवर्तन पॅनलचे रावसाहेब(चाचा )तनपुरे यांनी पत्रकार परिषेदेत आरोप केला आहे.
राहुरी पालिकेत ठेकेदारीत अनेक नगरसेवकांचा हात आहे.सत्ताधरी गटाचा नेत्यामुळे हा सावळा गोधळ सुरु असल्याचे तनपुरे यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात सर्व जिल्ह्यामधे कोरोना सेंटर झाले आहे.
मात्र राहुरी नगर पालिकेने कोविड सेंटर सुरु केले नाही.यांनी निव्वळ जवळचे कार्यकर्ते संभाळण्याचे काम सुरु असल्याचे चाचा तनपुरे यांनी पत्रकार परिषेदेत सत्ताधारी गटावर आरोप केले आहे.
खा.सुजय दादा विखे पाटील व शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहुरीत जनतेची सेवा करत आहे.
मात्र पालिकेत सत्ता ..सत्ताधारी गटाच्या ताब्यात असल्याने आमचा आवाज दाबण्याचे काम राहुरी पालिकेत केले जात असल्याचे विरोधीपक्ष पेते दादा पाटील सोनवने यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की
जिल्हा अधिकारी यांनी कोविड सेंटर सुरु करण्याचा आदेश दिला आहे.
राहुरीत महिला व लहान मुलांसाठी कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी केली आहे.
मात्र यासाठी खो.. घालण्याचे काम केले जात आहे.
पालिकेत नगरसेवकच ठेकेदार झाले असल्याचे सोनवने यांनी म्हटले आहे.
नुकत्याच राहुरी पालिकेने सात घंटा गाड्या घेतल्या आहे.त्यासुध्दा ठेकेदारास वापरण्यास दिल्या जात आहे.याचा काही हिशोब नाही पालिकेत सावळा कारभार होत असल्याचे आर आर तनपुरे यांनी म्हटले आहे.
राहुरी पालिकेचे प्रशासकिय अधिकारी घटकांबळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगरपालिका हददीत लसीकरण हे एकाच केंद्रवर चालू असल्याने त्याठिकाणी मोठयाप्रमाणावर गर्दी होत आहे.त्यासाठी लसीकरण हे वॉर्ड वाईज त्वरीत चालू करण्यात यावे.त्यामूळे नागरीकांची गैरसोय होणार नाही . ,नगरपालिका हददीत सध्या सुरु असलेले नाले सफाईचे काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे. 
मागील वेळेस नाले सफाईचे काम व्यवस्थित न झाल्याने शहरातील व्यापारी पेठेमध्ये पावसाचे व गटारीचे पाणी घुसल्याने दुकानातील मालाचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले होते . तसेच शहरातील व हायवेच्या वरील भागातील वसाहतीतील घरांमध्ये ओढयाचे पाणी घुसल्याने त्या भागातील दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता . तरी या नाले सफाई कामाची चौकशी करुन ठोकेदारावर कार्यवाही करावी,नगरपालिका हददीतील नगरपालिका मालकीचे असलेल्या गाळयांचे कोरोना लॉकडाऊन काळातील सन २०१९ -२० व सन २०२०-२१ मधील भाडे माफ करावे,नगरपालिका हददीतील नागरिकांची कोरोना काळात आर्थिक परीस्थिती बिकट झाली असल्याने नागरिकांना घरपटटी व पाणी पटटी माफ करावी, नगरपालिका हददीतील नगरपालिका मालकीचे असलेल्या गाळयांचे कोरोना काळात लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने नवीन २५ % होणारी भाडे वाढ न करता नवीन करार करून द्यावा, नगरपालिकाचा माहे मार्च -२०२१ या महिन्याचा घान कचरा वाहतुक लॉकडाऊनच्या काळात शहर बंद असतांना शहरात कोठेही घन कचरा उचलण्याचे काम चालू नाही . तरीही हा ठेका रु .१३ लाख ८८ हजार ५७० रुपयांना देवून मोठया प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आला आहे . यावर सविस्तर चर्चा होवून या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी,राहुरी नगरपालिकेस घाण कचरा वाहतुकीसाठी नवीन ७ गाडया आल्या असून त्या गाडया ठेकेदारास बेकायदेशिरपणे वापरण्यास देण्यात आल्या आहे . मा.नगरसेवकांनी याबाबत चौकशी केली असता अधिकारी हे वरिष्ठांच्या दबावाखाली असल्याने सदरची माहिती देण्यास नकार देतात , राहुरी नगरपालिकेचा पिण्याच्या पाण्याचा ठेका रु.३ कोटी आगाऊ रक्कमेस देवून नगरपालिकेस तोटा झाला आहे.
या मोठया कामाचा ठेका ११ % कसा देण्यात आला याची चौकशी व्हावी .शहरातील साई कॉर्नर ते श्री.धोंडे यांच्या निवासापर्यतचा डिव्हायडरचा ठेका हा जवळच्या कार्यकर्त्यास देण्यात आला असल्याने प्रभागातील नगरसेवक , विविध संघटना व व्यापा - यांनी विरोध करुनही देवूनही डिव्हायडरचे काम करण्यात आले . शहरातील स्ट्रीट लाईट गेल्या तीन महीन्यापासून संध्याकाळी बंद व दिवसा चालू असते,
नगरपालिका कार्यालयातील प्रशासकीय अधिका - यांना झालेल्या व न झालेल्या कामाचे बोगस बिले काढण्याकरीता मोठयाप्रमाणावर दबाव टाकत असल्याने अधिकारी हे चूकीचे काम करण्यास विरोध करीत आहे त्यामुळे अधिकारी जास्तीत जास्त दिवस कायम रजेवर असतात . राहुरी नगरपालिकेच्या परीवर्तन आघाडीच्या वतीने हे निवेदन देण्यात येत आहे .परीवर्तन आघाडीचे  रावसाहेब (चाचा)तनपुरे, शिवाजी पाटीलबा सोनवणे ,आर.आर तनपुरे, शाहजी जाधव, सोन्याबापू जगधने,  नमिता शेटे, राखी तनपूरे,अक्षय  तनपुरे,सचिन मेहेत्रे,सुनिल पवार,उमेश शेळके,अफनान आतार ,चंद्रकांत उंडे,  भाऊसाहेब काकडे,प्रदिप भुजाडी, सुरेश भुजाडी, आरती पोपळघट ,सुवर्णा प्रसाद खैरे,सिमा पवार, कविता नवनीत दरक ,अजित सुभाष डावखर मा.श्री.दिपक गुणानाथ मेहेत्रे, प्रफुल्ल सदाशिव शेळके, अतिक बागवान,राहिणी राजेंद्र काळे,मंदाकिनी अरुण साळवे,नारायण धोगडे,दिलीप राका, नयन शिंगी,दादासाहेब तोडमल चांगदेव भोंगळ अदि उपस्थित होते.


                           चौकट
मी बाहेर का पडलो याबाबत मला बदनाम करण्याचे काम यांनी केले,
निवडणुकीत मला पाडण्याचे षडयंत्र रचले होते.आमच्या बरोबर राहाणारया उमेदवाराला सांगितले की तुम्ही तुमची फुली मागा आणि आर आर ला पाडा असे षडयंत्र रचल्याचे कळल्याने मीच यांना सोडले आहे.
आणि बोभाटा केला की ठेका दिला नाही म्हणुन ते गेले पण तसे नाही? कोरोना काळात आमच्या भागात काहींनी खिसकीच्या मार्गाने लसी विकल्याचेही पत्रकार परिषेदेत आर.आर. तनपुरे यांनी आरोप केला आहे. 




                          (चौकट)
राहुरी पालिका हद्दित सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेमधे  सरकारने ठरवुन दिलेल्या कोणत्याही नियम व अटीचे होत नाही,यामुळे कोरोना रोगाचा प्रदुर्भाव वाढु शकतो, शहरात एकच लसिकरण केंद्र असल्याने  जेष्ठ नागरीकांना केंद्रावर रात्री येवुन बसावे लागते,तसेच नागरीकांना संपर्कासाठी जो  मोबाईल नंबर देण्यात आला आहे.तो कायम स्वरुपी व्यस्त असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहे.यामुळे प्रत्येक वार्ड वाईज लसिकरण होवा अश्या मागणीचे निवेदनाचे पत्र खा.सुजय दादा विखे पाटील यांनी दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....