साई संस्थान साठी अरुण पाटील नाईक इच्छुक ' एक व्यक्ति - एक पद ' धोरण राबवा आणि कॉंग्रेस वाढवावी
बेलापूर/सार्वमंथन प्रतिनिधी (शफीक )बागवान.
साई संस्थान विश्वस्त पदावर वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष श्री. अरुण पाटील नाईक यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच कोंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून आपण साई संस्थान चे आजीव सदस्य आहोत. कॉँग्रेस पक्षाशी गेल्या ४० वर्षापासून एकनिष्ठ आहोत. कृषि उत्पन्न बाजार समिति, सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, पंचायत समिति अशा अनेक संस्थांवर दीर्घ काळापासून आपण कार्यरत आहोत. आजवरपर्यंतचा आपला प्रवास हा जिल्ह्यातील प्रत्येक कॉंग्रेस नेत्यांसमोर आहे.
-----‐-----------चौकट --------------
नाईक नावात दबदबा -
कॉँग्रेसचे विद्यमान तालुकाध्यक्ष श्री. अरुण पाटील नाईक यांनी माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे पाटील, स्व. गोविंदराव आदिक, स्व. शंकरराव काळे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार स्व. जयंत ससाणे माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्या बरोबरीने काम केले असून सध्या विद्यमान आमदार लहू कानडे आणि उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या कोंग्रेसचे ते तालुकाध्यक्ष आहेत. निवडणुकीत त्यांचे जेंव्हा कधी कुठे नाव येते तेंव्हा तेंव्हा त्यांच्या नावास पसंती मिळते. तालुक्यात सर्वच जाती धर्मातला तळागाळातला मोठा वर्ग त्यांचा चाहता आहे. नाईक या नावातच खूप मोठा दबदबा आहे.
' एक व्यक्ति एक पद ' या कॉँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार कॉंग्रेस हाय कमांड यांनी साई संस्थान विश्वस्त पदावर एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी द्यावी. सत्ता असो व नसो आपल्यासारख्या कार्यकर्त्याणे पक्षावर निष्ठा ठेवून काम केले आहे. पक्षाशी आपण एकनिष्ठ राहिलो आहोत. पद बदलले गेल्यास इतर कार्यकर्त्यांना काम करण्यास वाव मिळतो.
सगळीच पदे एकाच व्यक्तिला बहाल न करता कॉंग्रेस वाढविण्यासाठी वेगवेगळी पदे ती सर्वांना देण्यात यावी, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली आहे. सदरचे विश्वस्त पद काम करण्यासाठी खूप मोठी संधी समजली जाते. साई संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांनी बाबांची महती साता समुद्रापार पोहोच केली आहे. कॉंग्रेस नेत्यांनी संधी दिल्यास आपणही त्याच धर्तीवर काम करू, असे नाईक यांनी म्हटले म्हणाले.
Comments
Post a Comment