वृद्धांसाठी समर्पण हा वाघुंडे परिवाराचा आदर्श =सुखदेव सुकळे
वृद्धांसाठी समर्पण हा वाघुंडे परिवाराचा आदर्श =सुखदेव सुकळे
शिरसगाव/सार्वमंथन वृतसेवा
माणसाचे जीवन सुखी व्हावे म्हणून महापुरुषांनी जीवनाची आहुती दिली.असा हा सेवाभावी आदर्श ठेवून सुभाष दशरथ वाघुंडे, सौ. कल्पनाताई सुभाष वाघुंडे व परिवाराने प्रतिकूल परिस्थितीतही वृद्धाश्रम सुरु केला हे वेगळेपण आहे, वाघुंडे परिवाराचे वृद्धांसाठी समर्पण होणे हा आदर्श सेवाभाव असल्याचे मत विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी व्यक्त केले.
येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील माऊली वृद्धाश्रमासाठी सुखदेव विश्वनाथ सुकळे व सौ.पुष्पाताई सुखदेव सुकळे यांनी आपल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने तीन हजार रुपयांचा चेक सुभाष वाघुंडे व सौ. कल्पनाताई वाघुंडे यांना साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या हस्ते प्रदान केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनीही आपली पुस्तके प्रदान केली.याप्रसंगी सुखदेव सुकळे बोलत होते. यावेळी सुयोग बुरकुले, शुभम नाणेकर,एकनाथराव मंडलिक.मिलिंद जोशी, राजेंद्र रासने, तुकाराम गोपाळ मोरे आदी उपस्थित होते.सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी सर्वांना बागेतील गुलाबपुष्पे देऊन स्वागत केले. मिलिंद जोशी यांनी सर्वांचा परिचय करून दिला.विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई.शेळके म्हणाले, सुखदेव सुकळे व सौ.पुष्पाताई हे कुटुंब सर्वसामान्य परिस्थितीत जगतानाही घासातून घास देतात ही माणुसकी त्यांनीजपली आहे.वृद्धाश्रमात माणुसकीची सेवा सुरु आहे त्यासाठी अशी उदारता भूषणावह असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. सुखदेव सुकळे म्हणाले, ही रंजले गांजल्याची सेवा असल्याचे सांगितले तर डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले माऊली वृद्धाश्रम हे खरे मानवसेवेचे तीर्थस्थळ आहे.या कार्यासाठी सर्वांनी सहकार्य केले तर अनाथ,निराधार मातापिता सुखी होतील.सुभाष वाघुंडे यांनी हे कार्य पुढे जाण्यासाठी खूप दानशूरानी मदत केली, करीत आहेत, शिरसगावचे सरपंच आबासाहेब गवारे ग्रामपंचायत, पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ यांनी जागा दिल्यामुळे त्यासाठी राजेश कासलीवाल यांचे मोलाचे योगदान असल्यामुळेच आता हे कार्य अधिक जोमाने करण्यास खरी प्रेरणा मिळाली असे सांगितले.शुभम नाणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment