राहुरीत परप्रातिंय तस्काराकडे सापडले असे काही`पोलिसही गेले चक्रावुन.या सिंघम पोलिस उपधिक्षकाची धडक कारवाई...
नगर कडुन शिर्डी मार्गी मध्येप्रदेश राज्यात चंदनाची लाकड भरुन चाललेला अयशार टेंम्पो नगर- मनमाड रोड राहुरी फाॅक्टरी परिसरात पोलिस उपधिक्षक संदिप मिटके याच्यासह पोलिस पथकाने पकडला.
यामधे दोन परप्रांतिय चंदन तस्कारांना जेरबंद करण्यात पोलिस पथकाला यश आले आहे.
राहुरी तालुक्यासह शहरात अनेक छोट्या.. मोठ्या चोरया, घरफोड्या,लुटमार हाणामारी, मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली असतांना तोच श्रीरामपुर विभागाचे पोलिस उपधिक्षक संदिप मिटके यांनी चंदन तस्कारी करणारणारे रॅकेट उघड केले आहे.
या गाडीत सुमारे 35 ते 40 लाखाचे चंदन असल्याचा अंदाज पोलिस प्रशासनाकडुन व्यक्त केला आहे.
आज शनिवार दि.11जुन रोजी दुपारी 12.वाजे सुमारास पारनेर तालुक्यातील सुपा येथुन आयशार टेंम्पो क्रमांक एम.एच 16.बी सी 7999 यामधे दोघे परप्रातिय चंदन तस्कर चंदनाची लाकडे घेवुन जात असल्याची खबर पोलिस उपधिक्षक संदिप मिटके यांना लागताच त्यांनी तत्कळ एक गुप्त पथक तयार केले व राहुरी फाॅक्टरी येथे सापळा रचला, पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अलगदपणे परप्रांतिय चंदन तस्कर अब्दुल फकुरुद्दिन रहेमान वय वर्ष 41अब्दुल मोहम्मद निसाद वय वर्ष 39 दोघे तालुका बैदडका जिल्हा कासारगुड राज्य केरळ सदर कारवाई पोलिस उपधिक्षक संदिप मिटके यांच्या पथक पो.काॅ किशोर जाधव,राहुल नरवडे,पो.काॅ सुनिल दिघे,राजेद्र आरोळे,पकडलेली चंदनाची गाडी हि नगर सुपा येथुन भरुन बुर्हानपुर कडे मध्यप्रदेश राज्यात चालली होती.
Comments
Post a Comment