अल्पवयीन विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका‌ फरार.... कोरणामुळे शाळा बंद झाल्याने घरीच घेत होती ती` शिक्षिका शिकवणी..

शिक्षिकेने 17 वर्षाच्या विद्यार्थ्याला पळून नेले.... 
कोरणामुळे शाळा बंद झाल्याने घरीच घेत होती ती शिक्षिका शिकवणी..

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
हरियाणामधील पानिपत येथील देशराज कॉलनीमध्ये एक खाजगी शिकवणी घेणारी शिक्षिका अकरावीत शिकणाऱ्या एका आपल्या 17  वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्याला च घेऊन फरार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विद्यार्थी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षिके विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक या गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे.कोरोणामुळे ही शिक्षिका घरीच विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होती. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
हरियाणा मधील पानिपत येथील देशराज कॉलनीमध्ये  राहणारी व खासगी शाळेत टीचर म्हणून काम करत असलेली ही महिला शिक्षिका घटस्फोटीत आहे. ती आपल्या माहेरीच राहत होती.कोरोनामुळे सर्व काम थांबले,त्यामुळे तिने घरीच शिकवणी घेण्यास सुरुवात केली होती. या शिक्षिकेकडे एक सतरा वर्षाचा असणारा 11 वीचा विद्यार्थी शिकण्यासाठी येत होता.  मागील दोन वर्षापासून या महिलेकडे शिकवणीसाठी तो जात होता.कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी चार ते पाच तास शिकवणीसाठी जात होता.ती शिक्षिका त्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली. त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की ती त्या विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली.  
रोजच्याप्रमाणे‌  ‌ट्युशनसाठी गेला होता. मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही. त्याच्या घरच्यांनी सुरुवातीला बराच वेळ वाट पाहिली. त्याच्या कुटुंबातील सदस्यांना चिंता वाटू लागली. त्यामुळे ते सर्वजण त्याला पाहण्यासाठी महिला शिक्षिकेच्या घरी गेले. पण तिथे विद्यार्थीही व शिक्षिका पण नव्हती. शिक्षिकेच्या वडिलांनीही आपली मुलगी देखील गायब असल्याचे सांगितले. काही वेळानंतर  त्या महिला  शिक्षिके विरोधात विद्यार्थ्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली. शिक्षिकेने आमच्या अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याचा आरोप त्या महिला शिक्षिकेवर कुटुंबाने केला आहे.तसेच जेव्हा आमचा मुलगा घरी उशीरा यायचा  तर आम्हाला वाटायचं की मुलगा अभ्यासासाठी थांबला आहे.
पण ती महिला शिक्षिका आमच्या मुलाला फसवत होती,असे कुटुंबाने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून त्या दोघांचाही शोध घेण्यात येत आहे. गायब झाल्यापासून शिक्षिकेचा फोन स्विच ऑफ येत आहे.विशेष म्हणजे घरून निघून जाताना दोघांनी सोबत काहीही सामान नेलेले नाही. महिला शिक्षिकेच्या हातात केवळ सोन्याची अंगठी आहे.महिला शिक्षिका चार-चार तास शिकवणी सांगून त्या विद्यार्थ्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करायची,असे विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटले आहे. 

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....