बीएमएस डॉक्टरांची बदनामी, निमा संघटना बदनामी सहन करणार नाही तहसिलदार,पोलिस निरिक्षक यांना निवेदन*



देवळाली प्रवरा/सार्वमंथन वृत्तसेवा
देवळाली प्रवरा येथील आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर चालकांवर सोशल मिडीया वर प्रसिद्धी करुन चिखल फेक करुन बी.ए.एम.एस डाँक्टर्सची बदनामी केल्या बाबत संमधितावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी व तहसिलदार पोलिस निरिक्षक यांना निमा संघटनेच्या वतिने तालुक्यातील डाॅक्टरांच्या वतिने  देण्यात आले आहे.
कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तालुकाभर निषेधात्मक बेमुदत बंद पाळण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देवून तालुक्यातील निमा संघटनेने वतीने निषेध करण्यात आला.
देवळाली प्रवरा येथिल आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यात राजकीय कलगितुरा सुरु असताना राजकीय कलगितुरा बरोबर वैयक्तिक चिखलफेक केल्याने कोविड सेंटर चालक डाँ.भास्कर सिनारे यांच्या अधिपत्याखाली डाँ.सचिन चौधरी, डाँ.भागवत विर, डाँ.प्रविण कोठुळे यांनी आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर सुरु केले.परंतू हे कोविड सेंटरच्या जागी शासकीय कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी करताना आप्पासाहेब ढुस यांनी सोशल मिडीयावर प्रसिध्दी करीत बी.ए.एम.एस पदवीधर व पदव्युत्तर एम.डी व एम.एस डाँक्टर्स बदनामीकारक वक्तव्य केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचा निषेध करुन निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी निमा संघटनेनी  केली आहे.
डाॅक्टर विषय अपमानकारक शब्द वापरणारे  व्यक्तीचा वैद्यकीय क्षेञाशी कोणताही संबध नसताना बी.ए.एम.एस पदवीधर व पदव्युत्तर डाँक्टरांच्या अधिकाराबद्दल सोशाल मिडीया मधुन मानहानीकारक व वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य केले आहे.
अशा लोकांमुळे समाजामध्ये वैद्यकीय क्षेञाविषयी तेढ व वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या वक्तव्यमुळे समाजामध्ये डाँक्टर विषयी गैरसमज निर्माण होतो. अवैद्यकीय व्यक्तीने वैद्यकीय माहिती न घेता वैद्यकीय क्षेञाविषयी कोणतीही विधाने करु नये.
जागतिक कोव्हिड महामारीच्या कठीण प्रसंगी डाँक्टर स्वतःचा जीव धोक्यातघालुन काम करत असताना महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने कार्यरत असलेले बी.ए.एम.एस. डाँक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण बेताल वक्तव्य करणाऱ्यावर दोन दिवसाच्या आत कायदेशीर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तालुकाभर निषेधात्मक बेमुदत बंद पाळण्यात येईल. व दवाखाने बंद ठेवण्यात येईल असा इशारा निमा संघटनेच्या वतीने राहुरी तहसिल कार्यालयात प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप व पोलीस निरीक्षक  नंदकुमार दुधाळ यांना निवेदन देवुन मागणी केली आहे. यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष प्रसाद ढुस,डाँ.जयंत कुलकर्णी, डाँ.भागवत विर, डाँ.प्रविण कोठुळे,डाँ.प्रकाश पवार, डाँ.सचिन चौधरी, डाँ.नरेंद्र इंगळे,डाँ.किशोर पवार, डाँ.मंगेश कुंभकर्ण,डाँ.अनिल तनपुरे,डाँ.किशोर खेडकर,डाँ.अमोल विटनोर,डाँ.किशोर सोनवणे, डाँ.हर्षद चोरडिया,डाँ.रवि घुगरकर,डाँ.किशोर वाघमारे,डाँ.अजय खेडकर, डाँ.भाग्यवान, डाँ.शेकोकर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....