वंचित बहुजन आघाडीचा शुक्रवारी राहुरी पोलीस स्टेशन वर आक्रोश मोर्चा....दलित आदिवासीवर अन्याय झाल्याच्या विरोधात अंदोलन...
- Get link
- X
- Other Apps
राहुरी/ सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी तालुक्यातील खडांबे येथे दलित कुटूंबियावर झालेल्या अन्यायच्या विरोधात व आरोपींना पाठिशी घालणारया पोलिस अधिकारयास निलंबित करावे या मागणीसाठी उद्या शुक्रवार दि.25 जुन रोजी राहुरी पोलिस ठाणेवर वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आक्रोश मोर्चाचे अयोजन करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की.
तालुक्यातीर खडांबे गावातील बाळासाहेब लटके नावाच्या राजकीय पुढाऱ्यांकडून दलित कुटुंबावर अमानुषपणे आत्याचार झालेला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे तालुका मार्गदर्शक बाबुराव मकासरे रवींद्र गायकवाड ,गोरख थोरात इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रत्यक्षात या कुटुंबाला भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेले तिथे गेल्यावर कुटुंबातील व्यक्तींनी घडलेली घटना कार्यकर्त्यांना सांगितली. त्यावरुन असे दिसले की या ठिकाणचा बाळासाहेब लटके हा राष्ट्रवादी पक्षाचा पंचायत समिती सदस्य आहे.हा पुढारी नेहमी या कुटुंबाला शेताच्या बांधावरून पाण्यावरुन त्रास देत असतो. या महिन्यातील पाच तारखेला ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी वापरासाठी साळवे कुटुंबाच्या घराशेजारी एक खान आहे त्या खाणीतून आजु बाजुचे लोक पाणी वापरत असतात.या दिवशी या खाणीतून अमोल साळवे व त्याची काकू यांनी त्यांच्या घरच्या गाया पाणी पाजून आणल्या, ही गोष्ट बाळासाहेब लटके व त्याच्या घरातील लोकांना समजल्यामुळे त्यांनी त्या दिवशी दुपारी येऊन आंतवन साळवे, अमोल साळवे व त्याच्या दोन बहिणी त्यामधे एक मतिमंध आहे. यांना जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये साळवे यांच्या घरातील दोन मुलींना मारहाण झाली आहे. त्यामधील एक मुलगी ही अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडलेली असताना देखील राहुरीचे पोलीस यांनी या घटनेकडे राजकीय पुढाऱ्याच्या दबावापोटी कानाडोळा करून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सात तारखेला आंतवन साळवे त्यांची भावजई व समोरील बाळासाहेब लटके यांना राहुरीच्या पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलवले असता राहुरीचे पी.आय.नंदुकमार दुधाळ यांनी साळवे या सेवानिवृत पोलीस अधिकाऱ्याला अपमानित करून उलट त्यांच्यावरच खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व त्यांच्या समोर राहुरीचे पी आय दुधाळ यांनी सांगितले की तुमच्यावर जर या म्हारांणी एट्रोसिटी दाखल केली तर तुम्ही देखील यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करा अशी माहिती आंतवन साळवे,अमोल साळवे व त्याच्या बहिणींनी वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांना दिली आहे. पंधरा दिवस होऊन देखील राहुरी च्या .पी.आय.ने ॲट्रॉसिटीचा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे पिडीत कुटुंबाला भेटून आल्यानंतर राहुरी चे पी आय यांच्यावर कर्तव्यात कसूर केला म्हणून खाते अंतर्गत चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे असे निवेदन देऊन 25 तारखेला मोर्चा काढण्याचे निवेदन दिले तेव्हा हे पोलीस स्टेशन खडबडून जागे झाले व संध्याकाळी आठ वाजता गाडी पाठवून फिर्याद देण्यासाठी साळवे कुटुंबांना विनंती करू लागले. परंतु आता बाळासाहेब लटके व त्यांच्या कुटुंबातील मारहाण करणाऱ्या लोकांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात येत नाही व आरोपींना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर केली म्हणून राहुरीचे पी आय दुधाळ यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही व येत्या 25 तारखेला राहुरीचे पी आय दुधाळ यांच्यावर कारवाई होण्यासाठी राहुरी पोलीस ठाणेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.तरी या मोर्चामध्ये शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी आवाहान वंचितचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांनी केली आहे.
पोलिसांनवर ताशोरे ओढण्यात आल्याने पोलिस प्रशासनात चांगलीच पळापळ होत आहे.
पोलिस अधिक्षक मनोज पाटील यावर काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे
(चौकट)
राहुरी शहरासह तालुक्यात गेली तिन महिन्यापासुन अनेक वेगेवगळ्या घटना घडत असल्याने सर्व सामन्यांचे रक्षण करणारे पोलिसच झाले भक्षक,सर्व सामन्य जनतेची नाराजी?
पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी राहुरी तालुक्यातील पोलिसांच्या कार्यपणालीवर लक्ष घाणल्याची गरज असल्याचे जनतेतुन बोलले जात आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment