सोलापुर जिल्हातील बार्शी येथिल वाहन चालकाला राहुरीत लुटले...भाडोत्री वाहन घेवुन तिन भांमटे पसार झाले....


राहुरी/ सार्वमंथन वृतसेवा
सोलापुर जिल्ह्यातील बार्शी येथून राहुरी येथे भाडे घेऊन आलेल्या चारचाकी वाहन चालकाला तिघां भामट्यांनी मारहाण करत एका झाडाल बांधुन पसार झाले.
चावकाने कशीबशी सुटका करत पोलिस ठाणे गाठत सर्व हाकिगत कथन केली. 
चालकाच्या ताब्यातील  सियाज कंपनीची चारचाकी व. रोख रक्कम असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल घेऊन ते भामटे लंपास झाल्याची घटना २६ जून रोजी रात्री ११ वाजे दरम्यान घडली . राहुरी शहरातील व्यापारी संतोषकुमार लोढा यांचे व्याही अतुल माणिकचंद राठोड हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रहिवाशी आहेत . त्यांच्याकडे एम एच १३ बी एन ६३५५ क्रमांकाची होंडा सियाज कंपनीची चारचाकी कार आहे . त्या गाडीवर नवाब मोहम्मद पठाण राहणार बार्शी हा चालक म्हणून काम करतो . दिनांक २६ जून रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान बार्शी बस स्थानक परिसरात तिघेजण राहुरीकडे येण्यासाठी वाहन शोधत होते . त्यावेळी त्यांनी तेथील एका रिक्षा चालकाला चौकशी केली . त्या रिक्षा चालकाने नवाब पठाण याला बोलावून घेतले . राहुरी येथून एका महिला पेशंटला घेऊन यायचे आहे असे सांगून त्यांनी किलो मीटर प्रमाणे गाडी ठरवुन नवाब पठाण याच्या ताब्यातील सियाज गाडी भाडोत्री घेतली . सायंकाळी तेथून निघाल्यावर रात्री ११ वाजे दरम्यान ते राहुरी येथे आले . सदर भामट्यांनी चालकाला गाडी मल्हारवाडी रोडने घेण्यास सांगितले . दरम्यान घोरपडवाडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात गेल्यावर त्या तिघा भामट्यांनी नवाब पठाण या चालकाला मारहाण करून त्याला रूमाल व चार्जरच्या केबलने एका झाडाला बांधून ठेवले . त्याच्या जवळील  काही रोख रक्कम व गाडी असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार झाले . चालक नवाब याने कशीबशी स्वतःची सुटका करून जवळच असलेल्या शेजारी असलेल्या लहु थोरात या शेतकर्याच्या  वस्तीवर गेला . आणि बार्शी येथील त्याच्या भावाला फोन करुन घटनेची माहिती दिली . त्याने गाडी मालक अतुल माणिकचंद राठोड यांना सांगितले . अतुल राठोड यांनी त्यांचे राहुरी येथील व्याही संतोषकुमार लोढा यांना खबर केली . संतोषकुमार लोढा व अतुल राठोड यांनी चालक नवाब याला घेऊन राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.घटनेच्या ठिकाणी तत्काळ पी एस आय मधुकर शिंदे यांनी जावुन पाहणी केली. व सदर घटने बाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....