राहुरी कृषी विद्यापिठ धर्मडी गेस्ट हाउस परिसरातुन 6.लाखाचा मुद्देमालाची भंगारने भरलेली गाडी पळविणारया लुटारुंना अहमदनगर जिल्हा अन्वेशन पथकाकडुन जेरबंद..



राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
आठवडे भरापुर्वी नगर कडे चाललेल्या 6.लाखाच्या भंगारसह चारचाकी गाडी राहुरीतुन पळविणारे श्रीरामपुरचे लुटेरे अहमदनगर जिल्हा अन्वेशन विभागाच्या पथकाकडुन जेरबंद करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्राकडुन समजली आहे.
मात्र यामधे किती आरोपी आहेत ? व त्यांचे नाव गाव अद्याप पोलिस सुत्राकडुन जाहिर करण्यात आले नाही.
दि.27 मे 2021 रोजी सकाळी 6.वाजे दरम्यान श्रीरामपुरकडुने नगर कडे अशोक लेलंड कंपनीच्या चारचाकी वाहनातुन चालक श्रीधर जंगलु सोनवने राहणार एकलहरे ,श्रीरामपुर हे जात असतांनी पाठीमागुन चारचाकी वाहनात आलेल्या 5 ते  6.अज्ञात लुटारुंनी राहुरी खुर्द परिसरातील धर्मडी गेस्ट हाउस परिसर लगत वाहन आडवे लावुन वाहन चालकास खाली आढत आपल्या वाहनात बसवले व ताहाराबाद येथाल डोंगर परिसरात सोडुन दिले. तब्बल दिड टन असलेले भंगार वाहनासह त्याची सूमारे किंमत  6 लाख लुटारुंनी पळवुन नेली. वाहन चालक  सोनवने हे कसेबसे राहुरी पोलिस स्टेशन दाखल झाले व पोलिसा समोर सर्व फैफियत मांडत राहुरी पोलिस ठाणेत 363,327 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदर घटना हि आठवडेभरापुर्वी घडली होती याचा तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक निरज बोकिल हे करत होते.
याबरोबरच जिल्हा पोलिस प्रमूख मनोज पाटील यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्हा अन्वेशन विभागाचे पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक याचा छडा लावत होते.
या पथकास गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली असता  एल सी बी पथकाने राहुरी भागातुन पळुन नेलेले  वाहन व काही मुद्देमालासह आरोपींना जेरबंद केल्याचे समजले आहे.


Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....