राहुरीतील त्या तरुणीच्या खुनाचा उलगडा तब्बल चार महिन्याने लागला....सोशल मिडीयातुन दोघांची झाली ओळख..




सोशल मिडीयातुन तिची ओळख पटली आण दोघांचे सुत जुळले

राहुरी/सार्वमंथन वृत्तसेवा
राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ १४ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात तरुणीच्या डोक्यात दगड घालून केलेल्या निघृण खून झाला होता . त्या खुनाला चार महिन्यांनी वाचा फुटली . या घटनेतील आरोपीने पंधरा दिवसांपूर्वी आणखी एक खून केला . त्यात , पोलिसांच्या जाळ्यात अडकला . मग मागील खुनाचा उलगडा झाला पोलीस चौकशीत आरोपीने राहुरी फॅक्टरी येथे मित्राच्या मदतीने केलेल्या खुनाची कबुली दिली . 
घटनाक्रम सांगितला . आणि पोलिसही चक्रावून गेले . मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड व केतन लोमटे ( दोघेही रा . शिरुर कासार , जि . बीड ) अशी आरोपींची नावे आहेत .शीतल भामरे ( रा.गाडेकर मळा नाशिक ) असे मृत तरूणीचे नाव असल्याचे समोर आले .आरोपी ज्ञानेश्वर मूळचा भातकुडगाव ( ता . शेवगांव ) येथील रहिवासी . गावात मुलींची छेड काढत असल्याने घरच्यांनी त्याला  मामाकडे शिरूर कासार येथे पाठवले . त्याची सोशल मीडियातून शीतल भामरे या विवाहितेची ओळख झाली . तिला दोन मुले . तिचे ज्ञानेश्वर सोबत प्रेम जमल्याने सहा महिन्यांपूर्वी तिने शिरूर कासार गाठले . दोघे " लिव्ह इन रिलेशनशिप " मध्ये राहू लागले . चारित्र्याच्या संशयावरून त्रास सुरू झाल्याने तिने परत नाशिकला सोडण्यास सांगितले . ज्ञानेश्वरने नाशिकला जातांना मित्र केतन लोमटेच्या मदतीने राहरी फॅक्टरी गुंजाळ नाक्या जवळ प्रेयसी शीतलचा डोक्यात लोमटेच्या मदतीने दगड घालून खून केला . मागील अडीच महिन्यांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके खुनाचा तपास करीत होते . परंतु , तरुणीची ओळख पटत नव्हती . त्यामुळे तपास थंडावला होता . दरम्यान , आरोपी ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न केले . पत्नीला दागिने खरेदी केले . सराफ व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे ( वय २५ , राहाणार शिरुर कासार ) याला दागिने घेऊन घरी बोलावले . त्याचा पंधरा दिवसांपूर्वी खून केला . मृत विशालला वडील नाहीत . वृद्ध आजोबा सुधाकर जगन्नाथ कुलथे ( वय ७० ) नातवाच्या खुनाच्या धक्काने मृत्यू पावले.विशालचा मृतदेह आरोपीने मामाच्या दुचाकीवरून भातकुडगाव ( ता . शेवगाव ) येथे स्वतःच्या शेतात नेऊन पुरला . मामाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला . भीतीपोटी आरोपीचे मामा अजिनाथ गायके ( रा . शिरुर कासार ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली . आरोपी दोन खून व दोन मृत्यूस कारणीभूत ठरला. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने प्रेयसी शीतल भामरे हिचा राहुरी फॅक्टरी येथे खून केल्याची कबुली दिली आहे. शिरूर कासार ( जि . बीड ) येथे विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणात आरोपी पोलीस कोठडीत आहे. 
दोन दिवसांनी कोठडी संपल्यावर आरोपीला राहुरी फॅक्टरी येथील खून प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला जाणार आहे .



Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....