राहुरी पोलिस ठाणेच्या हकेच्या अंतरावर मद्यपी टारगटांचा हौदोस ...... पोलिस प्रशासनाचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष.....छापा मारल्या अनेक दारुच्या बाटल्या व मद्यपी सापडतील

राहुरी /सार्वमंथन वृत्तसेवा
शहरातील धाडगे इस्टेट सय्यद बाबा दर्गा परिसरातील वावरात चालतोय मद्यपींचा राडा या ठिकाणी अनेक गुन्हेगारांचे आश्रय स्थान झाले असल्याने पोलिस प्रशासनाने या ठिकाणी छापेमारी करुन कारवाई करावी अशी मागणी येथिल स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

कोरोनाच्या काळात मद्यपीने येथे सुरु केला दारु आड्डा.

राहुरी पोलिस स्टेशनच्या समोर हकेच्या अंतरावर असलेल्या धाडगे इस्टेट परिसराततील सय्यद बाबा दर्गा जवळ दररोज सायंकाळी ५.वाजे नंतर टारगटांचा राडा सुरु असतो या ठिकाणी हे तरुण मद्य प्रशान करुन जुगार खेळतात व एकमेकांना  शिविगाळ व आरडा ओरड करुन येथिल नागरीकांनवर दहशत करत असल्याच्या घटना घडत आहे.
कोणी काही समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना या तरुणांकडुन शिविगाळ व दमबाजी केली जाते
या परिसरात अनेक हाणामारयाच्या घटना घडत असतात यामधे एखादी मोठी दुर्घटना होवु शकते?
येथे काही बाहेरील तरुणांना आणुन मद्यपी टारगटांनकडुन मारहाणही करण्यात येते ? मोबाईल चोरी होते?शहरात एकीकडे भुरट्या चोरट्यांनी व बाईक स्वरांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे.
मात्र खमके पोलिस अधिकारी म्हणुन स्वताला समजत असलेले पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी राहुरीपोलिस ठाणेचा पदभार घेतल्या पासुन तालुक्यासह शहरात गुन्हेगारी व भुरट्या चोर्या, हाणामारयाच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसत आहे.
ते राहुरीतील कायदा सुव्यवस्था स्थिर ठेवण्यात सपशेल फोल ठरले आहे.
पोलिस निरिक्षक दुधाळ यांनी शहरातील धुमस्टाईलने दुचाकी चालवणारयावर व धाडगे इस्टेट परिसरातील सय्यद बाबा दर्ग्या जवळ छापेमारी करावी यामधुन काही भुरट्या चोरया करणारयांचे धागेदोरे पोलिसांना मिळु शकते? व येथिल नागरीकांचीही डोकेदुखी पण बंद होईल.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....