दिव्यांगांना विनोद अंत्योदय राशन कार्ड द्या शिवसेना अपंग सेल ची मागणी
- Get link
- X
- Other Apps
दिव्यांगांना दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय चे रेशन कार्ड ७ दिवसाचे आत विनाविलंब देण्यात यावे या या मागणीचे निवेदन राहुरीचे तहसीलदार योग दिन शेख यांना शिवसेना अपंग सहाय्यसेनेचे वतीने देण्यात आले आहे . यावेळी राहुरी तालुका अघ्यक्ष संजय शामराव झांबरे व सौ.सुनिता संजय झांबरे शिवसेना अपंग सहाय्य सेना महिला आघाडी प्रमुख व शिव सैनिक रवींद्र भुजाडी , वैभव भालेराव, राजेंद्र पवार, आशाताई पवार, व शिवसेना अपंग सहाय्य सैनिक उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आपले कार्यालय व पुरवठा विभागात अपंगांचे रेशन कार्ड तयार झाले असुन ते अपंगांना मिळत नसुन अपंग बंधु-भगीनी हे वारंवार पुरवठा विभागात चकरा मारत असुन त्यांना दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय कार्ड बाबत उडवा उडवी ची उत्तरे संबंधित विभागाकडुन मिळत आहेत, सबंघित विभागाकडुन अपंगांची हेळसांड होत असुन सबंघित विभाग अपंगाच्या विविध प्रश्नाबाबत उदासिनता दाखवत आहे.
तरी आपण अपंगाच्या प्रश्नाबाबत स्वतः लक्ष घालून अपंगांना ७ दिवसाच्याआत अपंगांना दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय चे रेशन कार्ड देऊन न्याय द्यावा ,
अन्यथा शिवसेना अपंग सहाय्य सेना द्वारा तीव्र आांदोलन छेडण्यात येईल असा ईशारा दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment