परप्रांतीय महिलेची छेडछाड प्रकरणी एक जण निर्दोष ..अॅड संसारे
राहुरी/ सार्व मंथन वृत्तसेवा
काही महिन्यांपूर्वी शिर्डी शिंगणापूर दर्शनासाठी आलेल्या एका पर प्रांतीय महिलेला गौतम विनायक दुशिंग यांनी मारहाण करुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप करण्या त येऊन पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . राहुरी न्यायालयात या गुन्ह्याचा नुकताच निकाल लागला असून गौतम दुशिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली . या बाबत सविस्तर हकीकत अशी की , दिल्ली येथील परप्रांतीय महीला तिचे नातेवाईकासह शिर्डी व शिंगणापूर येथे दर्शनासाठी आली होती . सदर महिलेने शिर्डी वरून शिंगनापूर येथे दर्शनाला जाण्यासाठी आरोपी गौतम विनायक दुशिंग यांची गाडी ठरवली होती . त्यानुसार शिंगनापूर येथून परत येताना ब्राम्हणी गावाचे शिवारात शनिशिगंनापूर ते राहूरी रस्त्यावर एका हॉटेल लगत फिर्यादी महीलेने आरोपी चालकास गाडी हायवे रोड ने घे असे म्हटले , याचा राग येउन आरोपीने हायवे ने गाडी घेण्यास नकार देउन फिर्यादी महीलेच्या तोंडात चापट मारुन लाथाबुक्याने मारहान करुन लज्जा उत्पन्न होइल असे वर्तन केले व फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे मारण्याची धमकी दिली . यावरून फिर्यादी महिलेने राहूरी पोलीस स्टेशनला आरोपीचे विरूद्ध फिर्याद दिली होती . त्यानुसार राहूरी यावरून फिर्यादी महिलेने राहूरी पोलीस स्टेशनला आरोपिचे विरूद्ध फिर्याद दिली होती . त्यानुसार राहूरी पोलीसांनी फिर्याद घेतली व आरोपी विरूद्ध भा.द.वि. कलम 354 , 323 , 504 , 506 अन्वये फिर्याद दाखल केली व सदर घटणेचा तपास करून दोशारोप पत्र न्यायालयात दाखल केले त्याला 34/15 हा क्रमांक पडला . सदर खटला राहूरी येथील न्यायमूर्ती सौ . एस . आर . शिंदे यांच्या समोर चालला सरकार पक्षाकडून साक्षिदार तपासले व न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी आरोपी चालकाची निर्दोष मुक्तता केली . आरोपीचे वतीने जेस्ट विधिज्ञ व नोटरी अँड . प्रकाश संसारे यांनी काम बघितले .
Comments
Post a Comment