रेखा जरे हत्याकांडातील फरार बोठेला अखेर पोलिसांनी केले जेरबंद..

अहमदनगर/सार्वमंथन वृत्तसेवायशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. हैद्राबाद येथील गुहेतून त्याला शनिवारी पहाटे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. गत तीन महिन्यापासून बोठेने पोलिसांना गुंगारा दिला होता. पोलिसांनी बोठे यास ताब्यात घेतले असून नगरच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, बोठे याच्या संपर्कात असलेल्या पाईपलाईन रस्त्यावरील लॉटरी विक्रेता महेश तनपुरे याच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
सुमारे साडेतीन महिन्यांपासून बोठे फरारी होता. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकूनही पोलिसांना तो सापडत नव्हता. शेवटी हैद्राबाद भागात तो असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके स्थापन करून त्या भागात पाठविली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला. मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यामध्ये एक महिलाही आहे.

बोठे याला घर भाड्याने मिळवून देणे, मोबाईल फोन उपलब्ध करून देणे, पैसे पुरविणे अशा प्रकारची मदत या संशयित आरोपींनी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बोठे याच्यासोबत त्यांनाही अटक होत आहे. आरोपीला घेऊन पोलिस नगरकडे निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्या भागात ही कारवाई सुरू होती. अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांनी ही कामगिरी केली.

Comments

Popular posts from this blog

सारख्या चकरा मारुन मुलीला त्रास का ? देतो याचा जाब विचारयाणारास 21जणाकडुन मारहाण व विनयभंगाचा पोलिसात गुन्हा दाखल .......

निर्पेक्ष सामाजसेवा कशी असावी ?..शौकत भाई शेख

राहुरी फाॅक्टरी येथे गुटखा विक्री करणारयावर कारावाई.. गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाले कसे ? पोलिस कारवाई संशयाच्या भोवरयात....