राहुरीच्या या भागात महिलेची छेडछाड पोलिसात गुन्हा दाखल ..आरोपी पसार
- Get link
- X
- Other Apps
राहुरी/सार्वमंथन वृत्तवेध
तु मला फार आवडते असे म्हणुन विवाहित असलेल्या ३० वर्षिय शिक्षिकेच्या अंगावर पडुन तिच्या तोंडाचे चुंबन घेवुन विनयभंग केल्याची घटना राहुरीत घडली असुन पोलिस ठाणेत ३० वर्षिय महिलेने गुन्हा रजि नंबर
२४९/२०२१ भादवी कलम ३५४ ब,४५२ प्रमाणे संतोष शिवलाल धनवडे राहणार जोगेश्वरी आखाडा याच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेचे कळताच आरोपी फरार झाला.
फिर्यादी हि आपल्या घराच्या किचन मध्ये स्वयपाक करीत होती तसेच फीर्यादीची सासु ,जाव,मुले हे घराच्या वरील खोली मध्ये होते . त्यावेळी फिर्यादी. किचन मध्ये कामात असताना तिस आवाज आला की घरात कोणी आहे का असा आवाज आल्याने पडित किचन मधुन घराच्या दरवाज्यात आले . तेव्हा पाहीले असता आमच्या गावातील ओळखीचा संतोष शिवलाल धनवडे राहणार जोगेश्वरी आखाडा हा आमच्या घराच्या दरवाज्यात उभा दिसला . त्यावेळी पिडीताने त्यास विचारले की काय काम आहे तेव्हा आरोपी म्हणाला की तुझा नवरा व दिर कोठे आहे. असे म्हणाला असता ती त्यास म्हणाले की ते बाहेर गेले. आहे . तुझी सासु कोठे आहे ? तेव्हा पिडित त्यास म्हणाली की ,त्या वरील खोलीत आहे . तेव्हा तो दारु पिलेचा वास येत होता . तो घरात आला व मला म्हणाला की, बरे झाले घरात कोणी नाही असे म्हणुन तो तिस म्हणाला की, तु मला फार आवडतेस असे म्हणुन त्यांने तिची साडी ओढुन साडीत हात घालुन तिस कवळी घातली . तेव्हा तिने त्यास प्रतिकार करीत असताना त्याने पिडीतास घरातील सोफ्यावर ढकलुन देवुन तिच्या अंगावर पडुन त्याने तिची छाती दाबून तोडांचे चुंबन घेतले . त्यावेळी तिने आरड ओरडा करीत असताना तेथुन आरोपी पळून गेला . त्यावेळी पिडीताची सासु व जाव व लहान मुले असे आले. तेव्हा तिने त्यांना झालेला प्रकार सांगितला.त्यानंतर फीर्यादीचे पती घरी आले असता त्यांना घडलेला प्रकार सांगितला असता पिडीत महिलेने राहुरी पोलिस ठाणेत गुन्हा दाखल केला असुन घटनेचा तपास पोलिस निरिक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment